हिंगोली : गत (Sugarcane Sludge) गाळप हंगामात ऊसाचे विक्रमी उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडले होते. असे असतानाही (Sugarcane) ऊस उत्पादकांच्या पदरी निराशाच पडत आहे. साखर कारखाने आता शेतकऱ्यांना कात्रीत पकडत आहेत. साखर कारखान्यांनी एफआरपी प्रमाणे बीले अदा करावीत असा नियम आहे. असे असताना देखील कारखानदारांकडून अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याचा प्रकार (Hingoli District) हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील शिऊर साखर कारखाना लिमिटेडने केल्याचा आरोप शेतकरी करीत आहेत. या कारखान्यात प्रतिटन केवळ 2 हजार 100 रुपये शेतकऱ्यांची हाती टेकवले जात आहेत. किमान 2 हजार 560 या प्रमाणे दर मिळावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत. कारखान्याच्या या भूमिकेवरुन शेतकऱ्यांनी उपोषणाला सुरवात केली आहे.
कळमनुरी तालुक्यातील शिऊर साखर कारखाना लिमिटेडने यावर्षी ऊसाला केवळ एकेविससे रुपये दर दिला आहे, 2 हजार चारशे रुपये प्रति टन असा भाव जाहीर केलाय,पण एफआरपी प्रमाणे नाही तर नाही किमान 2 हजार 560 रुपये प्रति टन येवढा तरी भाव द्यावा या मागणीसाठी आज कारखाना परिसरात शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केलं आहे. एफआरपी सोडा किमान घोषणा केल्याप्रमाणे दर मिळावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांची आहे.
साखर कारखान्यानुसार ऊसाच्या दरातही तफावत आढळून येत आहे. मध्यंतरी गाळप अधिक आणि कारखाने कमी अशी अवस्था झाल्याने शेतकऱ्यांनी सोय होईल त्या कारखान्यावर ऊसाचे गाळप केले होते. पण आता बीलावरुन शेतकऱ्यांची लूट केली जात आहे. विदर्भातील गुंज येथील साखर कारखान्याने 2 हजार 560 प्रतिटन असा दर दिला आहे. तर याप्रमाणेच दर न मिळाल्याने शेतकरी आता उपोषणाला बसले आहेत.जोपर्यंत मागण्या पूर्ण केल्या जात नाही तोपर्यंत उपोषण हे सुरुच राहणार असल्याचे शेतकऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
ऊसाला किमान दर मिळावा ही शेतकऱ्यांची मागणी राहिलेली आहे. केवळ एकाच कारखान्यावर शेतकऱ्यांची लूट होतेय असे नाही तर या परिसरातील चार साखर कारखान्यात हीच स्थिती आहे. त्यामुळे या चार कारखान्यांसमोर दररोज एका गावातील शेतकरी उपोषणाला पाठिंबा म्हणून सोबत बसणार आहेत. आता यंदाचा हंगाम काही दिवसा येऊन ठेपला असताना देखील गतवर्षीच्या बिलाचा प्रश्न अद्याप कायम आहे.