नंदुरबार : शेतकरी घटक हा संघटीत नसल्यामुळे पीकलेल्या मालाला योग्य दर मिळत नाही. शेतकऱ्यांच्या शेती मालाचा दरही त्याला ठरवण्याचा अधिकार नाही. त्यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनीधी हे शेतकऱ्यांप्रती तत्परता दाखवण्यात दिरंगाई करतात. हे सर्व असले तरी नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी एकत्र आल्यावर काय होऊ शकते हे दाखवून दिले आहे. 15000 शेतकऱ्यांनी एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून जिनिंग फक्टरीच उभी केली आहे. त्यामुळे अनेकांच्या हाताला काम तर मिळालेच आहे. पण अशा प्रकारे शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून जिनिंग फक्टरीसारखा प्रकल्प उभा राहण्याची ही पहिलीच वेळ आहे.
उत्पादन मोठ्या प्रमाणात मात्र, बाजारपेठ उपलब्ध नसल्याने नंदुरबार जिल्ह्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांची परवड सुरु होती. कमी किमतीने विक्री आणि साठवणूक केल्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्यायच नव्हता. जिल्ह्यातील शहदा, तळोदा या भागात कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे. याच उत्पादनाचा फायदा परिसरातील ग्रामस्थांना होण्याच्या दृष्टीने नांदरखेडा शेतकरी उत्पादक कंपनीने वनश्री जिनिंग फॅक्टरी सुरु केली आहे. त्यामुळे कापसापासूनचे उत्पादन तर सुरु झाले आहे. शेतकरी उत्पादक कंपनीने राबवलेल्या अनोख्या उपक्रमाचे कौतुक होत असून जिल्ह्याती शेकडो बेरोजगारांच्या हाताला काम मिळणार आहे.
शेतकरी उत्पादक कंपनीच्या माध्यमातून जिनिंग प्रोजेक्ट उभारण्याचा हा राज्यातला पहिलाच प्रयोग आहे. कृषी विभागांच्या योजनांचा लाभ तसेच शेती व्यवसायात नाविन्यपूर्ण उपक्रम राबण्याच्या दृष्टीने या उत्पादक कंपनीची स्थापना करण्यात आली होती. या कंपनीचा विस्तार आज वाढला असून यामध्य1500 शेतकऱ्यांचा सहभाग झाला आहे. एवढेच नाही तर या कंपनीचा कारभार पाहून थेट जिनिंग फॅक्टरी उभारण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. त्यामुळे कापसाला योग्य दर तर मिळणारच आहे. अनेकांना आता रोजगारही उपलब्ध होणार आहेत. कंपनीमुळे मध्य प्रदेश व गुजरात या ठिकाणी विक्रीसाठी द्यावा लागणारा कापूस आता स्थानिक जागेवरच विकता येणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यात कापसाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन आहे. मात्र, स्थानिक पातळीवर बाजारपेठच नसल्याने येथील शेतकऱ्यांना मध्यप्रदेश, गुजरात याठिकाणी विक्रीसाठी जावे लागत होते. शिवाय दरही कमी मिळत होता. मात्र, आतात जिल्ह्यातच जिनिंग फॅक्टरी उभारण्यात आल्याने वाहतूक, दर हा प्रश्नच राहिलेला नाही. जिनिंग व सुतगिरणीच्या माध्यमातून कापसाला चांगला दर मिळेल असा आशावाद कंपनीचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी सांगितले आहे.
एका कंपनीची स्थापना करण्यासाठी कमीत-कमी 10 शेतकरी असणे आवश्यक आहे. याशिवाय दोन वेगवेगळ्या कंपन्याही एकत्र येऊन शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करु शकतात. याकरीता ठरवून दिलेल्या कागदपत्रांची पुर्तता करणे आवश्यक आहे. कंपनीचे रजिस्ट्रेशन संधी लेखापाल, कंपनी सेक्रेटरी कींवा वकीलामार्फत करता येणार आहे. शेतकरी उत्पादक कंपनीत महिला शेतकऱ्याचा सहभाग असल्यास योजनांचा लाभ अधिक प्रमाणात घेता येणार आहे. कंपनी स्थापनेचा प्रस्ताव संबंधित सी.ए. संधी लेखापाल यांच्यामार्फत मिनीस्टर ऑफ कोर्परेट अफेअर्स यांच्याकडे वर्ग होतात आणि त्यानंतर कंपनी स्थापन करण्याची म्हणजेच सर्टिफिकेट ऑफ इनकॅार्पेरेशन चे परवानगी पत्र हे आठ दिवसामध्ये दिले जाते. संबंधित माहीती कृषी अधिकारी जुबेर पठान यांनी दिली असून ते बीड येथील कृषी विभागाच्या आत्मा विभागात कार्यरत आहेत.
1 पॅन कार्ड
2 आधार
3 मतदान ओळखपत्र,
4 ड्राइविंग लायसन्स
4 बँक स्टेटमेंट किंवा बँक पासबुक
5 कंपनीच्या डायरेक्टरचे लाईट बिल
6 10 सभासद त्यापैकी 5 डायरेक्टर
7 10 शेतकऱ्यांचे पासपोर्ट आकाराचे फोटो व मोबाइल नंबर (it-was-the-farmers-who-set-up-ginning-factories-cotton-markets-and-work-in-the-hands-of-the-youth)
24 लाख खर्चून पॉलिहाऊस उभारलं, लॉकडाऊनमुळे फुलांची विक्रीच नाही, शेतकऱ्याने फुलबागेवर नांगर फिरवला!
आहो खरंच..! कांद्याचीही चोरी, नैसर्गिक संकटावर मात केली पण….
वारे बहाद्दर ! 10 हजार सोयाबीनला भाव, तरच व्यापाऱ्यांना गावात ‘एंन्ट्री’