अहमदाबाद: गुजरात राज्यातील नवसारी जिल्ह्यातील जयंतीभाई पटेल यांनी 20211-12 मध्ये आंब्याची बाग लावली. सुरुवातीच्या काळात आलेल्या अपयशानंतर जयंतीभाई जैविक आणि शास्त्रीय पद्धतीनं शेती करु लागले. सध्या एका वर्षाला ते सुमारे जवळपास 7 लाख रुपयांचं उत्पन्न मिळवत आहेत. जयंतीभाई यांच्या आंबा बागेत इतर भाज्या देखील घेतल्या जातात. (Jayantibhai Patel get profit into mango farming)
जयंतीभाई पटेल यांनी आंब्याची बाग लावल्यानंतर सुरुवातीच्या दोन वर्षांमध्ये त्यांना म्हणावं असं उत्पन्न मिळत नव्हते. यानंतर त्यांनी वैज्ञानिक पद्धतीनं शेती करण्याचा निर्णय घेतला. जयंतीभाई पटेल यांनी प्रशिक्षण घेतले. प्रशिक्षणानंतर त्यांनी पारंपारिक पद्धत सोडून देत आधुनिकतेची कास धरली. आंबा बाग लागवड आणि शेती तंत्र बदलण्याचा निर्णय घेत चांगल्या जमिनीची निवड, आंब्याची उच्च प्रतीची रोपं, चांगली माती, कलमी रोपांची निर्मिती, जैविक औषधांचा वापर केल्यानं जयंतीभाई पटेलांना चांगला फायदा होत आहे.
कलमी रोपांपासून अधिक उत्पन्न
जयंतीभाई पटेलांनी चांगल्या उत्पन्नासाठी कलमी रोपांची निवड केली, त्यासाठी त्यांनी सरकारी नर्सरीतून रोपं आणून लागवड केली. कलमी रोपांना एका बाजूनं लाकडांचा आधार देण्यात आला. यासह आंब्याच्या झाडावार थेट सूर्यप्रकाश पडू नये म्हणून दुसरी रोप लावण्यात आली. आंब्यावर रोग पडू नये यासाठी जयंतीभाईन आधुनिक पद्धतीनं ट्रॅक्टरचा वापर करत किटकनाशक फवारणीला सुरुवात केली. आंबा तोडणीसाठी प्रसंगी मशीनचा देखील वापर करण्यात आला.
ग्रेडिंगचा वापर
बाजारात आंब्याची चांगल्या दरात विक्री व्हावी यासाठी फळाची वर्गवारी करण्यात आली. वर्गवारी केल्यानं जयंतीभाईंचा नफा देखील वाढला. चांगल्या प्रतीचे आंब्याची विक्री केल्यानं जवळपास 70 टक्के आंबे बाजारात नेण्यापूर्वीच विकले जातात, अशी माहिती जंयतीभाई पटेलांनी दिली.शैतीमध्ये वैज्ञानिक पद्धतीचा वापर केल्याबद्दल जयंतीभाई पटेलांना बेस्ट एटीएम अवार्ड देण्यात आला. 2013-14 मध्ये त्यांना हा पुरस्कार मिळाला.
नफा वाढू लागला
जंयतीभाई पटेलांना 2010-11 मध्ये 15 हजार किलो आंब्यांचं उत्पन्न मिळालं त्यातून त्यांना 2 लाख 25 हजार मिळाले तर त्यासाठी 75 हजार रुपयांचा खर्च आला. 2012-13 मध्येही जयंतीभाईंना चांगलं उत्पन्न मिळालं. एका एकरात 24 हजार किलो आंबे मिळाले. यासाठी त्यांना 1.5 लाख रुपये खर्च आला तर 5 लाख 10 हजार रुपये मिळाले.
संबंधित बातम्या:
सांगलीत हळद सौद्यांना सुरुवात, सेलम हळदीवर पहिल्याच बोलीला मिळाले….
पाणी कमी असलं म्हणून काय झालं, शेतकरी किसन भोसलेंचा ‘हा’ प्रयोग देऊ शकतो लाखोंचा नफा
(Jayantibhai Patel get profit into mango farming)