सांगली: मोठमोठ्या ऑटोमोबाईल कंपन्यामध्ये दहा वर्षे काम केल्यानंतर सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील अंत्रळ गावच्या काकासाहेब सावंत यांनी आंब्याची बाग आणि नर्सरीमध्ये जम बसवला आहे. काकासाहेब सावंत यांना आता नर्सरीतून वार्षिक 50 लाखांचं उत्पन्न मिळतं. दहा वर्षापूर्वी आंब्याची बाग लावली तेव्हा लोक हसायचे, असं काकासाहेब सावंत सांगतात. काकासाहेब सावंत यांचं गाव सांगली जिल्ह्यातील दुष्काळी भागात येते. (Kakasaheb Sawant Earn 50 lakh Rupees from mango production and Nursery )
सांगलीच्या जत तालुक्यातील अंत्रळ गावात 280 कुटुंब आहेत. या गावात वर्षाला एकूण 570 मिमी पाऊस होतो. गावातील बहुतांश शेतकरी द्राक्ष आणि डाळिंबाची शेतीक करतात. या भागात आंब्याची झाडं लावणाऱ्यांची संख्या कमी आहे. ज्वारी, बाजरी, मका आणि गहू यासारखी पिकं देखील घेतली जातात. काकासाहेब सावंत यांनी पारंपारिक शेतीला पर्याय देत आंब्याची बाग लावली.
काकासाहेब सावंत द बेडर इंडिया वेबसाईटशी बोलताना सांगितलं की ते सांगली येथे एका कंपनीत काम करत होते, त्यांची बदली झाल्यानंतर त्यांनी गावाकडे जाऊन शेतकी करण्याचा निर्णय घेतला. सावंत यांनी 2010 मध्ये त्यांच्या शेतीमध्ये आंब्याची बाग लावली. 2015 मध्ये तांनी नर्सरी सुरु करण्याचा निर्णय घेतला. शेतीला पाणी देण्यासाठी काकासाहेब सावंत यांनी 4 किलोमीटर वरुन पाईपलाईनकरुन पाणी यांनी आणलं आहे. कृष्णा नदीच्या म्हैसाळ पाणी योजनेचा काकासाहेब सावंत यांना फायदा झाला. राज्य सरकारच्या अनुदानातून त्यांनी शेततळ्याची निर्मिती केली आहे.
काकसाहेब सावंत यांनी त्यांच्या 20 एकर शेतीचे दोन भागात विभाजन केलं आहे. एका भागात आंब्याची केसर जातीची झाडं आहेत. तर, दुसऱ्या भागात चिक्कू, डाळिंब आणि चिंचेची झाडं आहेत. सावंत यांनी एक एकर क्षेत्रावर नर्सरी स्थापन केली आहे. काकासाहेब सावंत यांना प्रति एकरामध्ये दोन टन आंबे मिळतात. दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसाठी काकासाहेब सावंत प्रेरणा स्थान बनले आहेत. ते त्यांच्या नर्सरी आणि आंब्याच्या बागेतील कामातून 25 लोकांना रोजगार उपलब्ध करुन देतात. महाराष्ट्र सरकारकनं त्यांना पुरस्कारानं गौरवलं आहे. परिसरातील शेतकरी काकासहेब सावंत यांच्या शेतात येतात. काकासाहेब सावंत यांना एका आंब्याच्या झाडावर कलम बनवली आहेत. तिथे एका झाडावर 22 प्रकारची कलम करत आहेत.
नवी मुंबईत कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचा रुग्ण? https://t.co/5H9aKyILGa #coronavirus #DeltaVariant #navimumbai
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 21, 2021
संबंधित बातम्या:
मेळघाटसारख्या अतिदुर्गम भागात पालेभाज्यांची लागवड, दीड एकर शेतीतून लाखो उत्पन्न
Kakasaheb Sawant Earn 50 lakh Rupees from mango production and Nursery