वाशिम : खरिपाची पेरणी करावी घाईने…अशी म्हण आजही ग्रामीण भागात प्रचलित आहे. त्यामुळे कधी एकदा चाढ्यावर मूठ ठेवतोय असे शेतकऱ्यांना झाले आहे. पण (Increase Production) उत्पादनवाढीसाठी आणि योग्य नियोजनासाठी (Agricultural Department) कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला दिला जात आहे. दरवर्षी 100 मिमी पावसाची नोंद झाल्याशिवाय पेरणी करुन नये असा सल्ला दिला जात होता. पण योग्य प्रमाणात जमिनीत ओल आणि 75 मिमी पाऊस झाला तरी चाढ्यावर मूठ ठेवण्यास हरकत नसल्याचे कृषी विद्यापीठ आणि दस्तुरखुद्द कृषी आयुक्त धीरज कुमार यांनी देखील सांगितले आहे. सध्याचा पाऊस हा मान्सूनपूर्व आहे. मान्सूनच्या पावसाला अद्याप सुरुवात झालेली नाही. राज्यात मान्सून अद्याप दाखल झालेला नाही. त्यामुळे शेतकरी बांधवांनी (Kharif Sowing) पेरणीची घाई करू नये असे आवाहन करण्यात आले आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार जिल्ह्यात 13 जून रोजी हलकासा पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविला आहे. 22 जूनपासून जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.त्यामुळे कृषी विद्यापीठाच्या संदेशानुसार 75 ते 100 मिलिमीटर पाऊस पडून जमिनीतील ओल चार ते सहा इंच खोल जाणे आवश्यक आहे. शेतकर्यांनी पेरणी करण्यापूर्वी पुरेसा पाऊस पडल्यानंतर जमीनीत पुरेशी ओल निर्माण झाल्याची खात्री करूनच पेरणी करावी. अन्यथा आगोदरच उशिर आणि त्यात पुन्हा पावसाने ओढ दिली तर दुबार पेरणीचे संकट निर्माण होऊ शकते.
शेतकऱ्यांनी जमिनीत ओलावा नसताना पेरणीची घाई केल्यास जमिनीतील उष्णतेमुळे पेरलेल्या बियाण्यांचे अंकुरण होणार नाही व शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावेल. त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ वाया जाईल व आर्थिक नुकसान होईल. धूळ वाफ पेरणी कापूस या पिकाची काही शेतकरी करीत आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी कोणत्याही पिकाची धूळ वाफ पेरणी करू नये. खरीप हंगामातील सर्व पिके जमिनीत पुरेशी ओल चार ते सहा इंच खोल जमीन ओली झाल्याची खात्री करूनच पेरणी केली तरच फायद्याचे राहणार आहे.
पाऊस लांबणीवर गेला असला तरी गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला आहे. त्यामुळे शेतकरी बी-बियाणे आणि खत खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी करीत आहेत. भविष्यात खत-बियाणांची टंचाई निर्माण होईल अशी धास्ती असल्याने शेतकरी हे गडबड करीत आहेत.असे असले तरी खत आणि बियाणांबाबत शेतकऱ्यांनी काळजी करु नये असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. उत्पादन वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहेत.