पेरु लागवडीतून 32 लाखांची कमाई, मुंबई ते दिल्लीच्या बाजारपेठेत विक्री, दिनेश बागड यांनी करुन दाखवलं

| Updated on: Oct 10, 2021 | 3:23 PM

मध्य प्रदेशात पेरू उत्पादक शेतकरी म्हणून दिनेश बागड यांची ओळख प्रस्थापित झाली आहे. जेव्हा तुम्ही त्यांच्या फळबागेला भेट द्याल तेव्हा तुम्हाला शेकडो मोठ्या आकाराचे पेरू झाडांवर लटकलेले दिसतील.

पेरु लागवडीतून 32 लाखांची कमाई, मुंबई ते दिल्लीच्या बाजारपेठेत विक्री, दिनेश बागड यांनी करुन दाखवलं
पेरु
Follow us on

भोपाळ: मध्य प्रदेशात पेरू उत्पादक शेतकरी म्हणून दिनेश बागड यांची ओळख प्रस्थापित झाली आहे. जेव्हा तुम्ही त्यांच्या फळबागेला भेट द्याल तेव्हा तुम्हाला शेकडो मोठ्या आकाराचे पेरू झाडांवर लटकलेले दिसतील. त्यांची बाग मोठ्या क्षेत्रावर पसरलेली आहे. काही वर्षांपूर्वी दिनेशच्या बागा आज जशा दिसतात तशा नव्हत्या. एक काळ असा होता जेव्हा साजोद-राजोद गावातील रहिवासी दिनेशने आपल्या 4 एकर वडिलोपार्जित जमिनीवर परंपरेने मिरची, टोमॅटो, भेंडी, करडई आणि इतर हंगामी भाज्या पिकवल्या. मात्र , वाढते कष्ट, खर्च तसेच कीड आणि बुरशीचा प्रचंड प्रादुर्भाव यामुळे त्यांचा नफा आणि उत्पन्न कमी झाले. उत्पादन खर्चाच्या तुलनेत बाजारात किंमत उपलब्ध नव्हती. म्हणूनच त्यांनी पारंपारिक शेती सोडून मन पेरून पेरू शेती केली.

फळबाग लावण्याचा मित्राचा सल्ला

दिनेश बागड यांना 2010 मध्ये, त्यांच्या मित्राने फळबाग लावण्याचा सल्ला दिला आणि पेरूच्या थाई जातीबद्दल माहिती दिली. दिनेश यांनी द बेटर इंडिया या वेबसाईटला सांगितले की, “फोटो आणि व्हिडीओमध्ये थाई पेरू मोठा दिसत होता. मी शेजारच्या राज्यातील एका बागेतही गेलो आणि ते पाहून प्रभावित झालो. कारण प्रत्येक फळाचे वजन किमान 300 ग्रॅम होते. “पेरूच्या या जातीला व्हीएनआर -1 म्हटले जाते. हा पेरु झाडापासून तोडल्यानंतर सहा दिवसांपर्यंत चांगला राहू शकतो. त्यामुळं दूरवरच्या बाजारपेठांमध्ये याची विक्री करता येते. यामुळे थाई पेरु लावण्याचा नि्रणय घेतल्याचं दिनेश बागड म्हणाले.

वर्षाला 32 लाखांची कमाई

आज दिनेशच्या बागेत पेरुची 4,000 झाडं आहेत. त्यामुळं त्यांना वर्षाला 32 लाख रुपये उत्पन्न मिळते. त्यांच्या यशापासून प्रेरणा घेऊन, मध्य प्रदेशातील सुमारे 400 शेतकऱ्यांनी देखील पेरुची लागवड केली आहे. दिनेश म्हणतो. सुरुवातीला दिनेश बागड यांना पेरुचा आकार पाहन संशय निर्माण झाला होता. रासायनिक खतांद्वारे याचा आकार वाढवला असावा, असं त्यांना वाटलं. मात्र, त्यांनी त्यांच्या शेतात काही रोपे लावल्यानंतर पारंपारिक शेती तंत्राचा अवलंब केल्यावर मला 11 महिन्यांत प्रथम पहिल्यांदा उत्पादन मिळालं. सर्वात मोठ्या फळाचे वजन 1.2 किलो होते. मग त्यांनी आपल्या भावांसोबत 10 वर्षात 4,000 झाडे लावण्यासाठी 18 एकर जमीन भाडेतत्वावर घेतली. गेल्या काही वर्षांत त्यांच्या उत्पन्नात पाच पटीने वाढ झाली आहे. दिनेश बागड यांनी त्यांच्या भागात पहिल्यांदा पेरुची लागवड केली होती.

“झाडांची कमीत कमी देखभाल आणि थोडे लक्ष देणे आवश्यक आहे, परंतु जेव्हा दिनेश यांनी फळांचे मार्केटिंग सुरू केले तेव्हा ती एक समस्या बनली. बर्‍याच लोकांना मोठ्या आकाराचे पेरू खरेदी करण्याबद्दल शंका होती. त्यानंतर त्यांनी भीलवाडा, जयपूर, उदयपूर, अहमदाबाद, वडोदरा, सुरत, पुणे, मुंबई, बेंगळुरू, भोपाळ, दिल्ली आणि इतरांसह भारतातील 12 बाजारपेठांमध्ये आपले उत्पादन विकण्याचा प्रयत्न केला. 2016 मध्ये दिनेश यांनी मुंबईत पेरू 185 रुपये किलोने विकले. दिल्ली आणि मुंबईतील ग्राहकांनी त्यांच्या पेरुचे कौतुक केले. येत्या वर्षात आपली लागवड पाच एकरांनी वाढवण्याची दिनेशची योजना आहे.

इतर बातम्या:

संत्र्याच्या फळगळतीला नुकसानभरपाईच नाही, बागायतदारांचे कोट्यावधींचे नुकसान

ऊसाची योग्य लागवड देईल भरघोस उत्पादन, शेतकऱ्यांनी ‘ही’ काळजी घ्यावी

Madhya Pradesh guava farmers earns 32 lakh per annum benefits of guava farming