यवतमाळ – वणी (Vani) तालुक्यातील कोळसा खाणीतील (Coal mine) धुळीचा शेतकऱ्यांच्या (Farmer) पीकावर परिणाम झाला आहे. रस्त्याच्या शेजारी अनेक शेतकऱ्यांची शेती असल्याने पीकांवरती धूळ उडाली आहे. कोळसा तिथून इतर ठिकाणी नेण्यासाठी गाड्यांची कायम रस्त्याला वर्दळ असते. परिसरातल्या असलेल्या शेतीवर अधिक परिणाम झाला असून कमी उत्पन्न होत असल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. विशेष म्हणजे शेतकऱ्यांच्या शेतातला पांधरा कापूस काळा झाला आहे. शेतकऱ्यांना झालेल्या पिकाची नुकसानाची भरपाई द्यावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा भाजप आमदार संजीव बोडकूलवार यांनी दिला आहे. अनेक नागरिकांच्या आरोग्यवरती सुध्दा परिणाम होत असल्याचे तिथल्या स्थानिकांचे म्हणणे आहे. लोकाच्या घरापर्यंत कोळशाची धूळ जात असल्याने रस्त्यांच्या बाजूला घरं असणारे लोक सुध्दा चिंतेत आहेत.
कोळशाच्या तेरा खाणी असल्यामुळे धूळ
वणी परिसरामध्ये वेकोलिच्या 13 कोळसा खाणी आहे. सोबतच कॉल वाशरी सुद्धा शहराच्या लगत ग्रामीण भागात आहे.वणी परिसरातून कोळशाची वाहतूक होत असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शेतातील पांढरा कापूस काळा होत आहे. तर इतर पिकांची ही उत्पादकता कमी होत आहे. त्यामुळे हा प्रश्न तातडीने मार्गी लावावा नाहीतर वेकोलिच्या एक सुद्धा गाडी या रस्त्यावरून जाऊ देणार नाही, असा इशारा वणी मतदार संघाचे भाजप आमदार संजीवरेड्डी बोदकुलवार यांनी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना एका निवेदनात दिला आहे.
नागरिकांच्या आरोग्यावरती परिणाम
आत्तापर्यंत तिथल्या स्थानिक नागरिकांनी अनेकदा मोर्च काढले आहेत. त्याचबरोबर प्रशासनाला वारंवार निवेदने सुध्दा दिली आहेत. परंतु अद्याप प्रशासनाकडून कोणतंही उत्तर किंवा मागणी पुर्ण झालेली नाही. धुळीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसान व रोड लगतच्या घरात ही धूळ जाऊन नागरिकांचे आरोग्य बिघडत आहे. मात्र याची कुठलीच दखल अद्याप घेण्यात आली नाही. वेकोलिच्या असलेल्या कोळसा खदान यांनी आपला स्वतंत्र रस्ता तयार करावा अशीही मागणी यावेळी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी तातडीने या विषया संदर्भात बैठक लावण्याचे आश्वासन दिले. या बैठकीमध्ये कुठलाच मार्ग न निघाल्यास वणी परिसरातील सर्व कोळसा खदान मधून एकही वाहन रस्त्यावरून जाऊ देणार नाही असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे.