मुंबई: महाराष्ट्रासाठी चांगली बातमी असून पुढील 2-3 दिवसांमध्ये मान्सून महाराष्ट्रात सक्रिय होईल, अशी माहिती ज्येष्ठ हवामानतज्ज्ञ के.एस.होसाळीकर यांनी दिली आहे. मान्सून वेगानं पुढे सरकत असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे. पुढील पुढील 2-3 दिवसात मान्सून पुढे मध्य अरबी समुद्राच्या काही भागांमध्ये, महाराष्ट्र व गोव्यातील भागांमध्ये व आणखी काही भागांमध्ये जाण्याची शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. (Monsoon Update IMD officer K S Hosalikar said Monsoon will reach at Maharashtra within next two or three days)
भारतीय हवामान विभागाची माहिती शेअर करत के.एस.होसाळीकर यांनी मान्सून कुठे पोहोचला आहे हे सांगितलंय. मान्सून पुढे सरकत असून हवामान विभागाच्या अंदाजानुसार त्यासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आहे. मान्सून अरबी समुद्रातून पुढे सरकत असून लक्षद्वीप, केरळ, किनारपट्टीचा काही भाग, दक्षिण कर्नाटक, उत्तर कर्नाटक, आंध्र प्रदेशातील काही भाग आण तामिळनाडूचा काही भाग आणि बंगालच्या उपसागरात मान्सून पुढे सरकला असल्याचं त्यांनी सांगितलं.
GOOD NEWS for Maharashtra:
पुढील 2-3 दिवसात मान्सून पुढे मध्य अरबी समुद्राच्या काही भागांमध्ये, महाराष्ट्र व गोव्यातील भागांमध्ये वआणखी काही
भागांमध्ये जाण्याची शक्यता.
– IMD @CMOMaharashtra— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 4, 2021
पुढचे 2, ३ दिवस राज्यामध्ये बहुतेक ठिकाणी गडगडासहित पावसाची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. ठाणे, रायगड, दक्षिण कोकण, पुणे, कोल्हापूर,सातारा, सांगली जिल्ह्यामध्ये जोरदार पाऊस असण्याची शक्यता आहे.
पुढचे 2, ३ दिवस राज्यामध्ये बहुतेक ठिकाणी गडगडासहित पावसाची शक्यता
ठाणे, रायगड, द. कोकण, पुणे, कोल्हापूर,सातारा, सांगली जिल्ह्या मध्ये जोरदार असण्याची शक्यता .
IMD pic.twitter.com/JiYxtl0K5P— K S Hosalikar (@Hosalikar_KS) June 4, 2021
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार मान्सून 3 जूनला केरळमध्ये दाखल झाला आहे. भारतीय हवामान विभाग म्हणजेच आयएमडीने यंदाचा मान्सून सरासरीच्या 101 टक्के असेल असा अंदाजानुसार यंदा मान्सून सामान्य राहणार आहे. यंदा पाऊस सरासरीच्या 101 टक्के पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. 96 टक्के ते 104 टक्क्यांपर्यंतच्या पावसाला सामान्य मान्सून म्हटलं जातं
भारतीय हवामान विभागनं वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनचा पाऊस उत्तर पश्चिम भारतात 92-108 टक्के होण्याती शक्यता आहे. तर, दख्खनच्या पठारावर 93-107 टक्के पाऊस होऊ शकतो. उत्तर पूर्व भारतात 95 टक्के तर मध्य भारतात 106 टक्के पेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. भारतीय हवामान विभाग जून महिन्याच्या शेवटी जुलै महिन्याचा पावसाचा अंदाज व्यक्त करणार आहे.
संबंधित बातम्या:
Weather Update: महाराष्ट्रावर मान्सूनपूर्व पाऊस बरसणार?, राज्यातील आजचं वातावरण कसं राहणार?
केरळमध्ये मान्सून दाखल झाला हे कसं ठरवलं जात? हवामान विभागाचे नेमके निकष काय?
(Monsoon Update IMD officer K S Hosalikar said Monsoon will reach at Maharashtra within next two or three days)