Monsoon Update: चांगली बातमी, 24 तासात मान्सून केरळमध्ये दाखल होणार, पश्चिमी वारे वाहण्यास सुरुवात

| Updated on: Jun 02, 2021 | 4:33 PM

मान्सुून पाऊस येत्या 24 तासात केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज हवामानतज्ज्ञ के.एस. होसाळीकर यांनी वर्तवला आहे. Monsoon Update K S Hosalikar

Monsoon Update: चांगली बातमी, 24 तासात मान्सून केरळमध्ये दाखल होणार, पश्चिमी वारे वाहण्यास सुरुवात
मान्सून अपडेट
Follow us on

मुंबई: भारतीय हवामान विभागाचे अधिकारी के.एस.होसाळीकर यांनी येत्या 24 तासात मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागानं यापूर्वीचं मान्सून केरळमध्ये 3 जून रोजी दाखल होईल, असं सांगितलं होते. मान्सून दाखल होण्यासाठी आवश्यक असणारं वातावरण तयार झालं आहे. मान्सून दाखल होण्यासाठी आवश्यक असे बदल वातावरणात होण्याची अपेक्षा आहे.(Monsoon Update K S Hosalikar predicted monsoon will reach at Kerala during next 24 hours )

होसाळीकर काय म्हणाले?

मान्सूनच्या वाटचालीविषयी के.एस.होसाळीकर यांनी मान्सूनच्या वाटचालीबद्दल माहिती दिली. 2021 मधील मान्सून केरळ मध्ये येत्या 24 तासात मान्सून दाखल होण्याची अधिक शक्यता असल्याचं त्यांनी सांगितलं. मान्सूनच्या वाटचालीसाठी परिस्थिती मध्ये अपेक्षित अनुकूल बदल होत आहेत. ढगाळ वातावरण, पश्चिमी वारे जोरदार, अनुकूल पाऊस होत असल्यानं चोवीस तासात मान्सून केरळमध्ये दाखल होईल, असं के.एस. होसाळीकर म्हणाले.

यंदाच्या मान्सूनमध्ये 101 टक्के पाऊस

आयएमडीने यंदाचा मान्सून सरासरीच्या 101 टक्के असेल असा अंदाज वर्तवला आहे. यानुसार यंदा मान्सून सामान्य राहणार आहे. यंदा पाऊस सरासरीच्या 100 टक्के पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. भारतात जून ते सप्टेंबर या काळामध्ये मान्सून सरासरीच्या सामान्य राहणार आहे, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. 96 टक्के ते 104 टक्क्यांपर्यंतच्या पावसाला सामान्य मान्सून म्हटलं जातं

कोणत्या विभागात किती पाऊस पडणार?

भारतीय हवामान विभागनं वर्तवलेल्या अंदाजानुसार मान्सूनचा पाऊस उत्तर पश्चिम भारतात 92-108 टक्के होण्याती शक्यता आहे. तर, दख्खनच्या पठारावर 93-107 टक्के पाऊस होऊ शकतो. उत्तर पूर्व भारतात 95 टक्के तर मध्य भारतात 106 टक्के पेक्षा कमी पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. भारतीय हवामान विभाग जून महिन्याच्या शेवटी जुलै महिन्याचा पावसाचा अंदाज व्यक्त करणार आहे.

जून महिन्यातील पावसाचा अंदाज

भारतीय हवामान विभागनं जून महिन्यात देशभरातील विविध भागांचा सर्वसाधारण अंदाज वर्तवला आहे. पूर्व भारत, मध्य भारत, हिमालय आणि मध्य भारताचा पूर्वेकडील भागामध्ये मान्सूनचा पाऊस सर्वसाधारण राहिल. उत्तर पूर्व भागात, दक्षिण भारतातील दख्खनचं पठार, उत्तर पूर्वेकडील काही भागात सरासरीच्या सर्वसाधारण स्थितीपेक्षा कमी पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे.

संबंधित बातम्या:

Weather Alert Monsoon prediction : विदर्भात 100 टक्के, मराठवाड्यात 98 टक्के, यंदा कोणत्या विभागात किती पाऊस?

Weather Update: महाराष्ट्रावर मान्सूनपूर्व पाऊस बरसणार?, राज्यातील आजचं वातावरण कसं राहणार?

केरळमध्ये मान्सून दाखल झाला हे कसं ठरवलं जात? हवामान विभागाचे नेमके निकष काय?

(Monsoon Update K S Hosalikar predicted monsoon will reach at Kerala during next 24 hours )