Weather update : मान्सून एक दिवस आधीच केरळमध्ये दाखल होणार, महाराष्ट्रात कधी पोहोचणार?

| Updated on: May 28, 2021 | 12:22 PM

भारतीय हवामान विभागानं येत्या 31 मे रोजी मान्सून केरळमध्ये दाखल होणार असल्याचं सांगितलं आहे. monsoon Kerala IMD

Weather update : मान्सून एक दिवस आधीच केरळमध्ये दाखल होणार, महाराष्ट्रात कधी पोहोचणार?
पाऊस
Follow us on

नवी दिल्ली: भारतीय हवामान विभागानं नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून 31 मे रोजी केरळमध्ये दाखल होईल, असा अंदाज वर्तवला आहे. हवामान विभागानं यापूर्वी मान्सून 1जून रोजी केरळमध्ये दाखल होईल, असं सांगितलं होते. मात्र, मान्सूनवर यास चक्रिवादळाचा सकारत्मक परिणाम झाल्यानं यापूर्वी वर्तवलेल्या अंदाजपूर्वी म्हणजेच 31 मे रोजी केरळात मान्सून दाखल होईल. (monsoon will arrive at Kerala on May 31 predicted by India Meteorological Department IMD )

31 मे रोजी केरळात मान्सून

मान्सून गुरुवारी बंगालच्या उपसागराच्या दक्षिण पूर्वेकडील भागात पोहोचला असल्याचं समोर आलं होतं. सद्यस्थितीत मान्सून मालदीव आणि कोमोरिन भागात सक्रिय होणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मान्सूनची हीच गती कायम राहिल्यास केरळात सोमवारी म्हणजेच 31 मे रोजी पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे.

यास चक्रीवादळाचा सकारात्मक परिणाम

दरवर्षी केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची तारीख 1 जून अशी असते. यावर्षी देखील हवामान विभागानं मान्सून दाखल होण्याची तारीख 1 जून अशी सांगितली होती. मात्र, बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या यास चक्रिवादळामुळे मान्सून वेगानं पुढं सरकरण्यास मदत झाली आहे. त्यामुळे मान्सून एक दिवस अगोदर केरळमध्ये पोहोचेल. आणि वेळेआधीच इतर भागातही मान्सून पोहोचेल, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

महाराष्ट्रात मान्सून कधी पोहोचणार?

सध्या मान्सूनच्या प्रगतीसाठी वातावरण पोषक आहे. त्यामुळे 31 मे रोजी केरळात मान्सून दाखल होईल. त्याप्रमाणे 9-10 जूनपर्यंत मान्सून तळकोकणात दाखल होईल. त्यानंतर 15 ते 20 जून दरम्यान उर्वरित महाराष्ट्र व्यापून टाकेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला होता.

यंदाचे पर्जन्यमान कसे असेल?

स्कायमेटच्या अंदाजानुसार जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर चार महिन्यांत सरासरीच्या बीबीएम .6 मिमीच्या तुलनेत 2021 मध्ये 103 टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामध्ये 5 टक्के कमी किंवा अधिक असू शकते. पावसाळ्याच्या प्रादेशिक कामगिरीवर स्कायमेटचा अंदाज आहे की उत्तर भारत आणि ईशान्य भारतातील काही भागांत संपूर्ण हंगामात पाऊस पडण्याची शक्यता आहे


संबंधित बातम्या:

कसा असेल यावर्षीचा मान्सून, पाऊसकाळ? स्कायमेटचा हा अंदाज वाचा

ऐन कोरोना काळात गूड न्यूज! यावर्षी चांंगला पाऊसकाळ, सामान्य मान्सूनचा हवामान विभागाचा पहिला अंदाज

monsoon will arrive at Kerala on May 31 predicted by India Meteorological Department IMD