Milk Price Hike: अमूल, गोकूळ पाठोपाठ मदर डेअरीचा मोठा निर्णय, दूध विक्री दरात 2 रुपयांची वाढ

| Updated on: Jul 10, 2021 | 11:17 AM

देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती बरोबरच आता दूध दरांमध्ये देखील वाढ होत आहे. अमूल पाठोपाठ मदर डेअरीने देखील दूध विक्री दरामध्ये दोन रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली आहे. (Milk Rate Hike)

Milk Price Hike: अमूल, गोकूळ पाठोपाठ मदर डेअरीचा मोठा निर्णय, दूध विक्री दरात 2 रुपयांची वाढ
दूध
Follow us on

Milk Price Hike नवी दिल्ली: देशात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमती बरोबरच आता दूध दरांमध्ये देखील वाढ होत आहे. अमूल पाठोपाठ मदर डेअरीने देखील दूध विक्री दरामध्ये दोन रुपयांची वाढ करण्याची घोषणा केली आहे. आता मदर डेअरीच्या (Mother Dairy) दूध उत्पादनाच्या वेगवेगळ्या पदार्थांची देखील 2 रुपयांची दरवाढ करण्यात आली आहे. आता ग्राहकांना मदर डेअरीचे दूध खरेदी करण्यासाठी दोन रुपये जादा द्यावे लागतील. मदर डेअरीचे नवीन दर आजपासून लागू होणार आहेत. (Mother Dairy increased price of all milk products by two rupees after Amul and Gokul)

अमूल पाठोपाठ मदर डेअरीचं दूध महागलं

इंधन दर आणि विजेचे दर वाढल्यामुळे दूध उत्पादक संघाचा देखील खर्च वाढला आहे. हे कारण देत दूध संघांकडून दूध दरांमध्ये वाढ करण्यात आली आहे. यापूर्वी एक जुलै रोजी अमूलने दूध दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला होता. आता दिल्ली, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश आणि गुजरात येथे एक जुलैपासून अमूलचे दूध उत्पादन महागले आहे. अमूलने तब्बल दीड वर्षानंतर दूध विक्रीचे दर वाढवले आहेत. त्या पाठोपाठ आता मदर डेअरीने देखील दूध विक्री दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोरोना संकटाच्या काळात महागाईला तोंड देणाऱ्या ग्राहकांना एकामागून एक धक्के बसत आहेत. पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढीबरोबरच बँकिंगचे चार्ज देखील वाढले आहेत.

महागाईचे चटके

दररोज सकाळी पेट्रोलचे नवे दर जाहीर होतात गेल्या महिन्यामध्ये तब्बल सोळा वेळा पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले आहेत. वाढलेली महागाई देशातील नागरिकांना त्रस्त करत आहे. वाढलेल्या महागाईमुळे सर्वसामान्य माणसाला मोठा फटका बसत आहे. दूध आणि तेलाच्या किमती सोबतच किराणा वस्तूंचे भाव देखील गेल्या वर्षामध्ये 40 टक्‍क्‍यांनी वाढले आहेत तर खाद्य तेलाचे दरही जवळपास 50 टक्क्यांनी वाढले आहेत.

गोकुळ कडूनही दूध विक्री दरात वाढ

कोल्हापूरमधील गोकुळ दूध संघाकडून शेतकऱ्यांना 11 जुलैपासून म्हैशीच्या दूध खरेदी दरात दोन रुपये आणि गायीच्या दुधाच्या दरात 1 रुपयाची वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. तर, कोल्हापूर वगळता राज्यातील इतर भागात दूध विक्री दरातही 2 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईसह राज्यात जिथं जिथं गोकुळच्या दुधाची विक्री केली जाते, तिथल्या ग्राहकांना दूध खरेदीसाठी अधिकचै पैसे मोजावे लागणार आहेत.

इतर बातम्या:

गोकुळची सत्ता हाती येताच दूध उत्पादकांसाठी भेट, हसन मुश्रीफ-सतेज पाटलांचं ‘ठरलंय’!

‘गोकुळ’ जिंकताच सतेज ऊर्फ बंटी पाटलांची मोठी घोषणा, शेतकऱ्यांना थेट 2 रुपये दरवाढ

(Mother Dairy increased price of all milk products by two rupees after Amul and Gokul)