नांदेड : नांदेड जिल्ह्यातील (Nanded district) अतिवृष्टीबाधित शेतकऱ्यांना जिल्हा बँकेच्या (District Bank) माध्यमातून आतापर्यंत 238 कोटी रुपयांचे अनुदान (Grants) वाटप करण्यात आले आहे. यामुळे शेतकऱ्यांना काहीप्रमाणात दिलासा मिळाला आहे. गतवर्षी मार्च ते सप्टेंबर दरम्यान जिल्ह्यातील 66 हजार 464 हेक्टरवरील पिकांचे अतिवृष्टीमुळे नुकसान झाले होते. त्याचे अनुदान म्हणून जिल्ह्याला 424 कोटी रुपयांचा निधी जिल्हा मध्यवर्ती बँकेला प्राप्त झाला आहे. त्या निधीपैकी आतापर्यंत 238 कोटी रुपयांचे वाटप झाले आहे. गेल्या दीड महिन्यामध्ये हा निधी वाटप करण्यात आला आहे. दरम्यान आतापर्यंत 238 कोटी रुपयांच्या अनुदानाचे वाटप करण्यात आले असून, उर्वरित अनुदानाची रक्कम येत्या 15 दिवसांमध्ये वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा बँकेच्या वतीने देण्यात आली आहे. या अनुदानामुळे काहीप्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या वर्षी पावसाळ्यात अतिवृष्टी झाली होती. अतिवृष्टीमुळे खरीप पिक हातचे गेले. जिल्ह्यात खरीप हंगामात मोठ्याप्रमाणात सोयाबीनचे पीक घेतले जाते. मात्र ऐन सोयाबीन काढणीचा हंगाम आणि अतिवृष्टी झाली. अतिवृष्टीचा मोठा फटका सोयाबीनला बसला होता. पावसामुळे पीक खराब झाले, पिक खराब झाल्याने उत्पन्नात देखील मोठी घट झाली होती. नुकसानग्रस्त शेतकरी मदतीच्या प्रतिक्षेत होते. अखेर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. उर्वरीत अनुदानाची रक्कम देखील येत्या 15 दिवसांमध्ये वाटप करण्यात येणार असल्याची माहिती बँकेच्या वतीने देण्यात आली.
दरम्यान अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील सोयाबीनचे पीक वाया गेले. उत्पन्नामध्ये घट झाल्याने सोयाबीनला चांगला भाव मिळाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आता मोठ्याप्रमाणात उन्हाळी सोयाबीनची लागवड केली आहे. उन्हाळी सोयाबीनचा उपयोग हा प्रामुख्याने बियाण्यांसाठी केला जातो. उन्हाळी सोयाबीनला आता शेंगा लागायला सुरूवात झाली आहे.
Onion: बाजार समितीच्या निर्णयाचा शेतकऱ्यांना फटका, कांदा उत्पादक संघटनेच्या पत्रात दडलंय काय?
Latur Market: सोयाबीनचा हंगाम अंतिम टप्प्यात, दर घटूनही शेतकऱ्यांवर ‘ही’ नामुष्की..!
फडातले वास्तव आयुक्तांसमोर : एफआरपी, ऊसाच्या प्रश्न बाजूलाच तोडणी अन् वाहतूकीमधूनही शेतकऱ्यांची लूटच