मुंबई : देशात तीन ठिकाणी कृषी स्टॅक हे विकसित करण्यासाठी प्रायोगिक तत्वावर प्रकल्प उभारले जाणार आहेत. यामधून शेतकऱ्यांचा डेटाबेस तयार होणार असून याकरिता नेएमएलने सरकारशी करार केला आहे. त्याअनुशंगाने एनसीडेक्स ई मार्केट्स, वस्तू आणि अमूर्त वस्तूंसाठी एकात्मिक ई-मार्केट प्लॅटफॉर्म, कृषी-स्टॅक विकसित होणार आहे. या संदर्भात एनईएमएलने म्हटले आहे की, केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाबरोबर झालेल्या सामंजस्य करारानुसार गुंटूर (आंध्र प्रदेश), देवनाग्रे (कर्नाटक), आणि नाशिक (महाराष्ट्र) येथे कृषी-स्टॅक विकसित करण्यासाठी प्रायोगिक प्रकल्प हाती घेणार आहेत. या माध्यमातून तंत्रज्ञान-सक्षम सोल्यूशन्सअंतर्गत डिझाइन विकसित आणि कार्यान्वित केले जाणार आहे. यामुळे शेतकरी हे सक्षम होण्यास मदत होईल.
कृषी-स्टॅक तंत्रज्ञान आणि डिजिटल डेटाबेसचा असा संग्रह आहे जो शेतकरी आणि कृषी क्षेत्रावर लक्ष केंद्रित करतो. सामंजस्य करारांतर्गत वर्षाच्या शेवटी ओळखले गेलेले कुशल उपाय देशभरात वाढविण्यास उपयोग होणार आहे.
शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करुन सरकारचा हेतु साध्य करणे हेच आमचे ध्येय आहे. यामध्ये आम्ही काम करणार ही अभिमानास्पद बाब असल्याचे एनईएमएलचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मृणालक परांजपे यांनी सांगितले आहे. भारतीय शेतीचे डिजिटलीकरण करण्यात नेएमएल आघाडीवर असून आमच्या अस्तित्वाच्या गेल्या १५ वर्षांत देशभरातील लाखो शेतकऱ्यांच्या जीवनावर त्याचा सकारात्मक परिणाम झाला असल्याचेही त्यांनी यावेळा नमूद केले.
कृषी मंत्रालयाने मंगळवारी ५ करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. हे सरकार शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली कृषी क्षेत्रावर लक्ष केंद्रित करून शेतकऱ्यांसाठी सुविधा सातत्याने वाढवत आहे. त्याच अनुषंगाने केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाने प्रायोगिक प्रकल्प चालवण्यासाठी पाच कंपन्यांशी सामंजस्य करार केला आहे. यामध्ये सिस्को, ६३आयडिया इन्फोलॅब्स प्रायव्हेट लिमिटेड, जिओ प्लॅटफॉर्मलिमिटेड (रिलायन्स), एनसीडीईएक्स ई-मार्केट्स लिमिटेड. (एनईएमएल) आणि आयटीसी लिमिटेड यांनी करार केला आहे.
कृषी क्षेत्रात आणखी चांगली कामगिरी करण्याचे सरकारचे उद्दीष्ट आहे, याकरिता खासगी क्षेत्र सहकार्य करण्यास तयार आहे. समोर येणाऱ्या आव्हानांचा सामना करणे आणि रोजगाराची साधने देखील वाढविणे शक्य होणार आहे. यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी योग्य किंमत दिली जाईल त्यामुळे कृषी क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून येईल असा आशावादही कंपनीने व्यक्त केला. जिओ आणि संलग्न डिजिटल तसेच आयटी सेवाअंतर्गत “जिओ कृषी” प्लॅटफॉर्मद्वारे सेवा देतात. हे शेतकऱ्यांच्या कृषी भूखंडाच्या मातीच्या स्थितीचे विश्लेषण करण्यास सक्षम आहेत. या प्रकल्पामुळे शेतकऱ्यांना शैक्षणिक व्हिडिओ उपलब्ध होईल आणि त्यांना कृषी तज्ञांशी संपर्क साधण्यास मदत होणार आहे. (NeML’s agreement with government to benefit farmers, farmers to get data)
मिस्टर इंडिया मनोज पाटीलचा आत्महत्येचा प्रयत्न, साहिल खानचा जॅकी श्रॉफच्या बायकोशी काय वाद होता?
मिस्टर इंडिया मनोज पाटीलचा आत्महत्येचा प्रयत्न, साहिल खानचा जॅकी श्रॉफच्या बायकोशी काय वाद होता?
GST ची मीटिंग लखनऊला का, आमचे आधी 30 हजार कोटी द्या, अजित पवार आक्रमक