नागपूर : विदर्भात (Orchard Farmers) फळबागायत क्षेत्र मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, त्यातुलनेत उत्पादन शेतकऱ्यांच्या पदरी पडत नाही. यामध्ये अनेक घटक जबाबदार आहेत. फळबागांचे उत्पन्न हे लाखोंच्या घरात असल्याने फळांच्या दर्जाकडेही शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होते. ( Fruit Exports) त्यामुळे शेतकऱ्यांना जीवनात आर्थिक सुबत्ता आणायची असेल तर ज्या फळांची निर्यात अधिक प्रमाणात होते त्याचीच लागवड करणे आवश्यक आहे. याकरिता रोपवाटिका व्यवस्थापन सुधारुन नव्या तंत्रज्ञानाचा वापर कसा करायचे याचे मार्गदर्शन घेण्याचे आवाहन केंद्रीय मंत्री (Nitin Gadkari) नितीन गडकरी यांनी फळबागायत शेतकऱ्यांना केले आहे.
फळबागायत उत्पादक संघाकडून शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शन शिबाराचे आयोजन करण्यात आले होते. विदर्भात फळबागांचे मोठे क्षेत्र आहे. त्यामुळे केवळ उत्पन्नाकडे लक्ष दिले जाते तर उत्पादनाच्या दर्जाकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितले. फळबागांसाठी पोषक वातावरण हीच मोठी जमेची बाजू आहे. त्यामुळे हंगामी पिके घेणाऱ्यांपेक्षा येथील शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती ही चांगली आहे. मात्र, यावरच समाधान न मानता येथील फळांची निर्यात कशी होईल यावर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला यावेळी त्यांनी उपस्थित शेतकऱ्यांना दिला आहे.
फळबागांचे उत्पन्न हे लाखोंमध्ये असते. त्यामुळे शेतकऱ्यांचे फळांच्य दर्जाकडे संपूर्ण दुर्लक्ष होते. मात्र, जर एखाद्या हंगामात मागणीच नसली तर दर निम्म्यानेच घटतात. त्यावेळी दर्जा असलेल्या फळांनाच अधिकची मागणी असते. शेतकऱ्यांनी फळांचा दर्जा राखण्यात सातत्य ठेवले पाहिजे. त्यात कोणतीही तडजोड न केल्यास हंगामात स्थानिकस्तरावर दर कमी असतील अशावेळी देशाच्या इतर राज्यात किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्यात करून जादा दर मिळविणे शक्य होणार असल्याचे सांगत फळांचे निर्यात वाढवण्याचा सल्ला शेतकऱ्यांना दिला आहे.
विदर्भातील सर्वच फळबागांची फळगळती ही सुरु आहे. विदर्भातील कॅलिफोर्निया अशी ओळख वरुड तालुक्यातही नैराश्यातून शेतकऱ्यांनी संत्रा बागेची तोडणी केली आहे. त्यामुळे या सबंध गोष्टींचा परिणाम आता संत्रा उत्पादनावर होणार आहे. दरवर्षी जिल्ह्यात 5 लाख टनाचे उत्पादन होत असते पण यंदा ते निम्म्यावर येण्याचा धोका आहे. अशा प्रकारे नुकसान होत असतानाही केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्था किंवा डॅा. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाकडून पूरक उपाययोजनांबाबत कोणत्याही शिफारशी आलेल्या नाहीत हे विशेष
फळबागा अंतिम टप्प्यात असल्यावर फळगळती तसेच इतर संकटांना सामोरे जावे लागते. त्यामुळे उत्पादन क्षेत्र वाढविण्यापेक्षा कमी क्षेत्रावरीलच बाग चांगल्या पध्दतीने जोपासल्यास उत्पन्न मिळणार आहे. शिवाय किडीचा प्रादुर्भाव झाला तरी क्षेत्र कमी असल्याने नुकसान टाळता येते. त्यामुळे शेतकऱ्यांनी फळबागांच्या दर्जावर भर देणे आवश्यक असल्याचे मत पंजाबराव कृषी विद्यापीठाते माजी कुलगुरु डॅा. सी. डी माळी यांनी व्यक्त केले आहे.
…म्हणून सोयाबीनची घटत आहे आवक, लातूर बाजार समितीमध्ये केवळ 8 हजार क्विंटलची आवक
थंडी वाढताच लाळ्या-खुरकूताचा प्रादुर्भाव ; दूध उत्पादनावरही परिणाम, अशी घ्या जनावरांची काळजी