मुंबई : (Farming) शेती व्यवसयात नव-नवे प्रयोग राबवले जात आहे. अत्याधिनिक पध्दतीमुळे उत्पादनात तर वाढ होतेच पण वेळेची बचत आणि नुकसानही कमी होत आहे. काळाच्या ओघात कमी मनुष्यबळात अधिकचे काम हा उद्देश महत्वाचा आहे. केवळ मुख्य पीकांसाठीच नाही तर आता भाजीपाल्यासाठीही ही प्रणाली वापरली जात आहे. (vegetable production) ‘स्टॅकिंग’ यामुळे भाजीपाल्याचे उत्पादन तर वाढतच आहे शिवाय नुकसानही कमी होत आहे. ‘स्टॅकिंग’ ही पध्दत जरी वेगळी वाटत असली तरी कोणत्याही शेतकऱ्यांसाठी सोपी पध्दत आहे. नेमके ‘स्टॅकिंग’ म्हणजे काय आणि त्याचे फायदे काय याची माहिती आपण घेऊ…
मुख्य पीकाबरोबर जर भाजीपाल्याची लागवड केली जात असली तर अशा शेतकऱ्यांसाठी ही पध्दत उपयोगी ठरणार आहे. यातून शेतकऱ्याचे उत्पन्न नक्की वाढेल. ही पध्दत वेगळी वाटत असली तरी आपल्याकडील शेतकऱ्यांसाठी सहज शक्य आहे.
‘स्टॅकिंग’ पद्धतीत बांबूचा वापर करून वायर आणि दोरीचे जाळे तयार केले जाते. यावर वनस्पतींच्या वेली पसरवल्या जातात. या पध्दतीचा अवलंब करुन शेतकरी वांगी, टोमॅटो, मिरचीसह भोपळ्याची लागवड करु शकतात. बऱ्याच गावातील शेतकरी स्टॅकिंग पद्धतीने शेती यशस्वीरित्या करत आहेत. या पद्धतीमुळे पिके सुरक्षित राहतात. एका विशिष्ट अंतारावर ही भाजीपाला सुरक्षित शिवाय किडीचा प्रादुर्भाव नसल्याने उत्पादनात वाढ होते. वेळेत बाजारपेठेत माल दाखल झाल्यावर योग्य दरही मिळतो.
‘स्टॅकिंग’ या पध्दतीने जर भाज्यांची लागवड करायची असेल तर प्रथम बांबूचे 10 फुट उंच लाकूड हे 10 फुटाच्या अंतरावर बांधाला गाडावेत. 10 बाय 10 फुटावर हे बांबू गाडावे लागणार आहेत. त्यानंतर या बांबूच्या लाकडावर 2-2 फुट उंचीवर तार बांधावी लागणार आहे. त्यानंतर वेलींना किंवा झाडांना सुतळीच्या मदतीने त्या तारांवर बांधावे लागणार आहे. जेनेकरुन वेली किंवा झाडे त्या बाजूने वाढतील. याप्रमाणे झाडांची उंचीही 8 फूट होत असते आणि त्यानंतर झाडे मजबूत होत उत्पन्न अधिक देतात.
या पिकांच्या झाडांना आधार मिळाल्याने हे झाडे खाली वाकत नाहीत. यामुळे पद्धतीच्या मदतीने टोमॅटो, वांगे, मिरची, सडण्यापासून वाचू शकते. वेली फळ भाज्यांचा अधिक भार सहन करु शकत नाहीत. त्यामुळे या पद्धतीमुळे वेलींना आधार मिळतो. जर फळ भाज्या खाली ओलाव्यात पडून राहतील तर त्या सडून जात असतात. परंतु या पद्धतीमुळे तो धोका टळतो. यासह फळ भाज्यांच्या वजनामुळे झाडे वेली तुटून जात असतात. पण स्टॅकिंगमुळे मात्र हाही धोका टळत असतो. (Now adopt stacking method to increase vegetable production; Beneficial method to farmers)
सोयबीनचे दर घटूनही का वाढत आहे आवक ? सोयाबीनच्या दराचा भरवासाच राहिला नाही
ऊस कारखानेच करीत आहेत एकरकमी ‘एफआरपी’ ची घोषणा, काय आहे पडद्यामागची गोष्ट ?