परभणीतही सुरु होणार ‘न्युट्री स्मार्ट व्हिलेज’ ; कुपोषण हटवण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय

| Updated on: Nov 11, 2021 | 3:54 PM

केंद्रीय कृषी महिला संस्था भुवनेश्वरच्या पोषण अभियानाअंतर्गत देशातील 13 राज्यांच्या 23 जिल्ह्यांमध्ये 75 'न्युट्री स्मार्ट व्हिलेज' उभे केले जाणार आहेत. ही संस्था भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत कार्य करीत आहे. यामध्ये महाराष्ट्रातील परभणी येथेही हे 'न्युट्री स्मार्ट व्हिलेज' उभारले जाणार आहे.

परभणीतही सुरु होणार न्युट्री स्मार्ट व्हिलेज ; कुपोषण हटवण्यासाठी केंद्र सरकारचा निर्णय
'न्युट्री स्मार्ट व्हिलेज' कार्यक्रम सुरु करताना केंद्रीय कृषी मंत्री
Follow us on

मुंबई : ( Central Agricultural Women’s Institute)केंद्रीय कृषी महिला संस्था भुवनेश्वरच्या पोषण अभियानाअंतर्गत देशातील 13 राज्यांच्या 23 जिल्ह्यांमध्ये 75 ‘न्युट्री स्मार्ट व्हिलेज’ उभे केले जाणार आहेत. ही संस्था (Indian Agricultural Research Institute) भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत कार्य करीत आहे.  (Maharashtra)यामध्ये महाराष्ट्रातील परभणी येथेही हे ‘न्युट्री स्मार्ट व्हिलेज’ उभारले जाणार आहे. याबाबत केंद्र सरकारचा उद्देश आणि पोषण आहारावर कसे लक्ष केंद्रीत करता येईल याबाबत केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्रसिंह तोमर यांची बुधवारी बैठक घेतली शिवाय या अनोख्या कार्यक्रमाला सुरवातही केली. बदलत्या परस्थितीमुळे पोषण आहाराचा विसर सर्वांनाच पडत आहे. मात्र, सर्वोत्तम भारत निर्माण करायचा असल्यास पोषणावर लक्ष केंद्रीत करणेही तेवढेच महत्वाचे असल्याचे तोमर यांनी स्पष्ट केले.

कोणत्याही माता-भगिनी आणि मुलांनी कुपोषित राहू नये. ही सर्वांची संयुक्त जबाबदारी आहे. लोकांच्या चांगल्या आरोग्याच्या उद्देशाने पिकांमध्ये पोषण मूल्य वाढविण्यावर भर दिला जात असल्याचेही त्यांनी सांगितले. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवांतर्गत आयोजित कार्यक्रमात बोलताना केंद्रीय मंत्री तोमर म्हणाले की, पोषक द्रव्ये वाढविण्यात आपले देशातील धान्याचे महत्व सांगितले. हे धान्य आरोग्यासाठी पोषक असून आता त्याचे प्रमाण कमी होत आहे. मात्र, ते पुन्हा वाढविणे आवश्यक असल्याचेही ते म्हणाले.

पोषणाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे

पोषण आहाराच्या संवर्धनासंदर्भात न्यूट्री स्मार्ट व्हिलेज कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे. तोमर म्हणाले की, निसर्गाने आपल्याला मानवी शरीर आणि मानवी जीवनात आवश्यक ते सर्व काही प्रदान केले आहे. कुपोषणाचा सामना सर्वांनी मिळून करावा लागेल. ही 75 न्युट्री स्मार्ट व्हिलेज पोषण वाढीच्या मालिकेद्वारे तयार केली पाहिजेत. या गावांमध्ये निसर्गाने दिलेल्या वस्तूंना प्रोत्साहन देण्याबरोबरच नैसर्गिक सुधारित बियाण्यांचे वितरण केले पाहिजे जेणेकरून पुढील सर्व उत्पादनांमध्ये पोषक द्रव्येदेखील समृद्ध होतील.

पौष्टिक अन्न हाच पर्याय

तोमर म्हणाले की, त्यांनी पीडीएसला (सार्वजनिक वितरण प्रणाली) पौष्टीक धान्याच्या वितरणासंदर्भात राज्य स्तरावर जागरूकता निर्माण करण्याचे आवाहन केले. आयसीएआर आणि कृषी मंत्रालयाच्या सहकार्याने आपण उद्दिष्टे साध्य करू असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी म्हणाले की, पोषक तत्त्वांचा वापर सर्वांसाठी आवश्यक आहे. कुपोषणाच्या समस्येवर तोडगा काढण्याचे लक्ष्य सरकारने ठेवले आहे. पोषक द्रव्यांचे नवीन प्रकार आणण्यासह इतर कार्यक्रम आणि योजनांद्वारे काम सुरू आहे. कृषी राज्यमंत्री शोभा करंडलाजे, कृषी सचिव संजय अग्रवाल, आयसीएआरचे उपमहासंचालक डॉ. आर. सी. अग्रवाल आणि भुवनेश्वरच्या केंद्रीय कृषी महिला संस्थेचे संचालक डॉ. अनिल कुमार यावेळी उपस्थित होते.

या जिल्ह्यांमध्ये ‘न्युट्री स्मार्ट व्हिलेज’ सुरू

ओरिसा मधील पुरी, खोर्धा, कटक आणि जगतसिंगपूर तर बिहारमधील समस्तीपूर आणि मुझफ्फरपूर, आसामधील जोरहाट, मेघालयमधील पश्चिम गारोहिल्स, राजस्थान मधील उदयपूर, महाराष्ट्रातील परभणी, पंजाबमधील लुधियाना, हरियाणातील हिसार, फतेहाबाद आणि अंबाला, उत्तराखंडमधील नैनिताल, हिमाचल प्रदेश मधील मंडी, कांगदा आणि हमीरपूर, कर्नाटकमधील बेंगळुरू ग्रामीण, धारवाड आणि बेळगाव, तामिळनाडू येथील मदुराई तर तेलंगणा येथील रंगारेड्डी येथे ‘न्युट्री स्मार्ट व्हिलेज’ सुरु केले जाणार आहे.

संबंधित बातम्या :

सोयाबीनला माफक दर तरीही साठवणूकीवरच ‘भर’, शेतकऱ्यांचा दराबाबत आशा उंचावल्या

शेतकऱ्यांना दिलासा : नविन तुरीला मिळणार योग्य दर, मात्र, संवर्धनाची घ्यावी लागणार काळजी

कामगंध सापळ्यातून कीडीचे व्यवस्थापन नेमके होते कसे? व्यवस्थापनात सापळ्यांची भूमिका काय?