कांद्याचे भाव पडणार, शेतकऱ्यांचं वाटोळं? मध्यमवर्गीयांचं बरं होणार?

| Updated on: Dec 18, 2020 | 8:48 AM

केंद्र सरकारने कांद्याच्या आयातीच्या नियमांमध्ये दिलेल्या शिथिलतेला पुढील वर्षी 31 जानेवारी 2021 पर्यंतची मुदतवाढ दिली आहे.

कांद्याचे भाव पडणार, शेतकऱ्यांचं वाटोळं? मध्यमवर्गीयांचं बरं होणार?
Follow us on

नवी दिल्ली : केंद्र सरकारने कांद्याच्या आयातीच्या नियमांमध्ये दिलेल्या शिथिलतेला (Onion Rates Will Not Increase) पुढील वर्षी 31 जानेवारी 2021 पर्यंतची मुदतवाढ दिली आहे. कांद्याचा देशांतर्गत पुरवठा वाढवण्यासाठी आणि त्याच्या किरकोळ किंमतींवर अंकुश ठेवण्याच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेतला आहे (Onion Rates Will Not Increase).

कांद्याच्या आयातीसाठी सरकारने 31 ऑक्टोबरला प्लांट क्वॉरंटाईन ऑर्डर (PQ) 2003 अंतर्गत ध्रुवीकरण आणि झाडांशी संबंधित फायटोसॅनेटरी प्रमाणपत्रवर (PSC) अतिरीक्त घोषणेतून सूट देत 15 डिसेंबरपर्यंत त्याला आयात करण्याची परवागनी दिली आहे.

काही अटी-शर्तींसह सूट

कृषी मंत्रालयाने दिलेल्या अधिकृत माहितीनुसार, बाजारात कांद्याच्या गगनचुंबी किमतींबाबत सामान्य जनता चिंतेत आहे. ते लक्षात घेता कांद्याच्या आयात नियमांमध्ये देण्यात आलेल्या शिथिलता 31 जानेवारी 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. मात्र, यासाठी काही अटीही आहेत.

क्वॉरंटाईन अधिकारी तपास करतील

अधिकारी आयात केलेल्या कांद्यांची तपासणी करतील आणि कीटकनाशक मुक्त असल्याचं समाधान झाल्यावरच ते जारी करतील. आयात केलेला कांदा केवळ वापरासाठी आहे, असं शपथपत्र आयातदारांकडून घेतलं जाईल. वापरासाठी कांद्याची तपासणी केल्यावर पीक्यू ऑर्डर 2003 अंतर्गत आयातीच्या अटींचे पालन न केल्यास चार पट अतिरिक्त तपासणी शुल्क लागू होत नाही (Onion Rates Will Not Increase).

नवीन पिक बाजारात आल्यानंतर देशातील काही भागांमध्ये कांद्याचे भाव नियंत्रणात आले आहेत. राजधानी दिल्लीत सध्या कांद्याचा भाव 40 रुपये प्रती किलो आहे. ऑक्टोबर महिन्यात तो 65-70 रुपये प्रती किलो होते. तर मुंबईतही सध्या एपीएमसी बाजारात कांदा 25 रुपये किलोने विकले जात आहेत. तर मुंबईत ते 35-40 रुपये किलोने विकले जात आहेत.

Onion Rates Will Not Increase

संबंधित बातम्या :

‘…नाहीतर शेतकऱ्यांच्या घरीदेखील धाडी टाकतील’, उद्धव ठाकरेंचा केंद्र सरकारला मिश्किल टोला

कांद्याचे भाव पडल्यानं साठे दाम्पत्य उद्विग्न, ‘तो’ व्हिडीओ व्हायरल करत मोदींकडे आयात थांबवण्याची मागणी