प्रत्येक बाजार समितीने अनुकरण करावे असा लातूर स्टेशनच्या ‘कृऊबा’ चा उपक्रम, शेतकऱ्यांनाही फायदा

| Updated on: Dec 11, 2021 | 11:19 AM

शेतकऱ्यांच्या हीतासाठी उभारण्यात आलेल्या बाजार समित्यांनी जर योग्य ती भूमिका घेतली तर काय होऊ शकते हे लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने दाखवून दिले आहे. जिल्ह्यातील लातूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने कापसाचा खुला लिलावच सुरु केला आहे.

प्रत्येक बाजार समितीने अनुकरण करावे असा लातूर स्टेशनच्या कृऊबा चा उपक्रम, शेतकऱ्यांनाही फायदा
संग्रहित
Follow us on

औरंगाबाद : पिकाचे उत्पादन काढणे, त्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे या सर्व बाबी शेतकरी करतो. मात्र, आपणच उत्पादित केलेल्या मालाचा दर तो ठरवू शकत नाही. आता (Agricultural Income Market Committee) बाजार समित्यांमध्येही व्यापाऱ्यांची मनमानी वाढत आहे. त्यामुळे कष्ट करुन तरी पदरी निराशाच हे ठरलेले आहे. शेतकऱ्यांच्या हीतासाठी उभारण्यात आलेल्या बाजार समित्यांनी जर योग्य ती भूमिका घेतली तर काय होऊ शकते हे लातूरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीने दाखवून दिले आहे. जिल्ह्यातील लातूर स्टेशन येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने कापसाचा खुला लिलावच सुरु केला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना कापूस विक्रीसाठी वेगळा पर्याय निर्माण झाला असून उद्घाटनाच्या पहिल्याच दिवशी या बाजारात कापसाला 8 हजार 430 रुपये क्विंटलला दर मिळाला आहे.

यामुळे बाजारपेठेचे वेगळेपण टिकून

औरंगाबाद जिल्ह्यात नंबर दोनची बाजारपेठ म्हणून या लातूर स्टेशन कृषी उत्पन्न बाजार उल्लेख केला जातो. या बाजार समितीमध्ये जिल्हाभरातून शेतीमालाची आवक ही सुरु असते. पण चर्चा असते ती नाविन्यपूर्ण उपक्रमाची. यापूर्वीही कांद्याचे दर घटलेले असताना बाजार समितीच्या आवारातच मोकळ्या कांद्याचा लिलाव करण्यात आला होता. (Open Cotton Market) खुल्या मार्केटमुळे कांद्यालाही (Good Rate) चांगला दर मिळाला होता. आता कापूस पिक हे अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला दर मिळावा म्हणून हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. शेतीमालाच्या दर्जानुसारच दर ठरला जातो. शिवाय येथे व्यापाऱ्यांची मनमानी नाही तर संचालक मंडळाकडूनच दर काढले जातात.

शेतकऱ्यांमध्ये म्हणून घेतला निर्णय

मराठवाड्यात कापसाचे क्षेत्र हे घटत असले तरी उत्पादित कापसाला योग्य दर हा मिळालाच पाहिजे. पण येथील बाजार समितीमध्ये व्यापारी मनमानी दर ठरवून शेतकऱ्यांची फसवणूक करतात. यासंबंधी तक्रारीही संचालक मंडळाकडे दाखल झाल्या होत्या. त्यामुळे बाजार समिती उभारण्याचा उद्देशच साध्य होत नसेल तर काय उपयोग म्हणून असा खुला बाजार सुरु करण्याचा निर्णय घेतल्याचे संचालक वाल्मीक चव्हाण यांनी सांगितले आहे.

शेतकऱ्यांमध्येही समाधान

कृषी उत्पन्न बाजार समितीने कापसाचा खुला लिलाव सुरु केल्याने शेतकऱ्यांसमोर नवे पर्याय निर्माण झाले आहेत. त्यामुळे येथील दराप्रमाणेच आता व्यापाऱ्यांनाही दर ठरवावे लागणार आहे. यामध्ये स्पर्धा निर्माण झाली तर त्याचा फायदा हा शेतकऱ्यांनाच अधिकचा होणार आहे. शुक्रवारी खुल्या लिलावात कापसाची आवक कमी झाली असली तरी सोमवारपासून आवक वाढणार असल्याचे वाल्मीक चव्हाण यांनी सांगितले आहे.

संबंधित बातम्या :

आता आस्मानी नव्हे सुलतानी संकट, रब्बीचे पीक बहरात असतानाच केंद्र सरकारच्या निर्णयाचा फटका

ऊसातील तणामुळे दुहेरी नुकसान, वेळीच बंदोबस्त केला तर उत्पादनात होणार वाढ

थंडीमध्ये जनावरांची ‘अशी’ काळजी घ्या, गोष्टी छोट्याच पण आरोग्याच्या दृष्टीने महत्वाच्या..!