उस्मानाबाद : पुनर्वसनाची मागणी करीत इर्ला ग्रामस्थांनी अडविले पालकमंत्र्यांना

| Updated on: Sep 29, 2021 | 1:52 PM

शेतशिवारात तसेच पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी हेलिकॅाप्टर पचारण करावे लागले होते. बुधवारी मात्र, पावसाने विश्रांती घेतलेली असून पाच दिवसानंतर आज सुर्यदर्शनही झाले असून जनजीवन हे पुर्वपदावर येत आहे.मात्र, केवळ मदत नको तर इर्ला ग्रामस्थांचे पुनर्वसन करणय्याची मागणी केली आहे.

उस्मानाबाद : पुनर्वसनाची मागणी करीत इर्ला ग्रामस्थांनी अडविले पालकमंत्र्यांना
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

उस्मानाबाद : गेल्या दोन दिवसांमध्ये जिल्ह्यात पावसाने थैमान घातले होते. शेती पिकं तर पाण्यात गेलीच शिवाय पावसाचा जोर वाढल्याने जनजीवन देखील विस्कळीत झाले होते. मांजरा व तेरणा नदी पट्ट्यात असलेल्या गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने अनेकांचा जीव धोक्यात होता. शेतशिवारात तसेच पुरात अडकलेल्या नागरिकांची सुटका करण्यासाठी हेलिकॅाप्टर पचारण करावे लागले होते. बुधवारी मात्र, पावसाने विश्रांती घेतलेली असून पाच दिवसानंतर आज सुर्यदर्शनही झाले असून जनजीवन हे पुर्वपदावर येत आहे.मात्र, केवळ मदत नको तर इर्ला ग्रामस्थांचे पुनर्वसन करणय्याची मागणी केली आहे.

मराठवाड्यात दोन दिवसांपासून पावसाचा जोर वाढलेला होता. उस्मानाबाद जिल्ह्यात तर ढगफुटीसदृश्य परस्थिती निर्माण झाली होती. मांजरा आणि तेरणा प्रकल्प हे तुडुंब भरले आहेत त्यामुळे पाण्याचा विसर्ग होण्यासाठी दरवाजे हे उघडण्यात आले असल्याने मंगळवारी या दोन्ही नदी लगतच्या गावांमध्ये पाण्याचा शिरकाव झाला होता. तेर, जागजी, ढोकी, शिराढोण या गावांना पाण्याने वेढले होते. मात्र, सध्या या ठिकाणचे जनजीवन हे पुर्वपदावर येत आहेत. नदी लगतच्या गावातील घरांची ही पडझड झाली असून बुधवारी सकाळपासूनच प्रशासकीय अधिकारी हे पाहणी करीत आहेत. दरम्यान, इर्ला येथे पालकमंत्री शंकरराव गडाख हे दाखल होताच ग्रामस्थांनी त्यांना अडविले मदत नको पुनर्वसन करण्याची मागणी त्यांनी केली.

निम्न तेरणाच्या 14 दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग

उस्मानाबाद जिल्ह्यातील माकणी येथील निम्न तेरणा प्रकल्प हा पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे 14 दरवाज्यातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे लगतच्या शेतामध्ये पाणी शिरत असल्याने पिके तर पाण्यात आहेत शिवाय शेत जमिनही खरडून जात आहे. 10 सेंटीमिटरने हे दरवाजे उघडण्यात आले आहेत. बुधवारी पावसाने विश्रांती घेतली असून आता गावालगतचेही पाणी कमी होत आहे.

या गावात शिरले होते मांजरा नदीचे पाणी

मांजरा प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. त्यामुळे मात्र, कळंब तालुक्यातील वाकडी येथील काही घरांना पाण्याचा विळखा पडला होता. भयभित झालेले नागरिक हे घराच्या छतावर जाऊन बसले होते. दरम्यान, याची माहिती तहसीलदार यांना देण्यात आली होती. अखेर एनडीआरएफ च्या टीमला पाचारण करावे लागले होते. त्यांच्या मदतीने घराच्या छतावर अडकलेल्या नागरिकांना सुखरुप काढण्यात आले. तर कळंब-ढोकी, कळंब अंबाजोगाई हे मार्ग सोमवारी सकाळी बंद होते. पावसाने पिकाचे तर नुकसान झाले आहेच शिवाय आता जनजीवनही विस्कळीत होऊ लागले आहे.

जिल्हा प्रशासनाकडून 439 नागरिकांचे स्थलांतर

नदी लगतच्या गावांना पुराचा धोका लक्षात घेता जिल्हा प्रशासनाने 439 नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवले होते. आता पुराचे पाणी ओसलरले असले तरी जिल्हा प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. नागरिकांना योग्य त्या सुचना करुन गरज असेल तरच बाहेर पडण्याचे अवाहन केले जात आहे.

ग्रामस्थांचा रोष, पालकमंत्र्याची अडवणूक

पावसाने झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्यासाठी अधिकारी, लोकप्रतिनीधी हे शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचत आहेत. बुधवारी पालकमंत्री शंकरराव गडाख, खा. ओमराजे निंबाळकर, आ. कैलास पाटील तसेच जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दाऊतपूर, इर्ला, रामवाडी येथे पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी केली. दरम्यान, पालकमंत्री गडाख यांना ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जावे लागले. इर्ला गावकऱ्यांनी त्यांची अडवणूक करुन येथील ग्रामस्थांचे पुनरर्वसन करण्याची मागणी केली.