मुबंई : (Pantpradhan Kisan Sanman Yojna) पीएम किसान योजनेअंतर्गतच्या 10 व्या हप्त्याची तारीख जशी जवळ येत आहे त्याप्रमाणात नियमांमध्ये बदल होत आहेत. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी म्हणून (Cenral Government) केंद्र सरकारच्यावतीने ही विमा योजना सुरु करण्यात आली आहे. मात्र, काळाच्या ओघात यामध्ये अनियमितता आढळून आल्याने वेळोवेळी योजनेचा लाभ घेण्यासाठी यामध्ये बदल करण्यात आलेला आहे. आता नव्याने एक बदल करण्यात आला असून त्याचे पालन केले तरच या 10 व्या हप्त्याचा लाभ मिळणार आहे.
त्यामुळे जे शेतकरी योजनेचा लाभ घेत आहेत. त्यांच्यासाठी ही बातमी महत्वाची आहे.
सरकारने अनेक महत्त्वाकांक्षी योजनाही राबविल्या आहेत, जेणेकरून शेतकऱ्यांना शेती करताना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये आणि त्यांचे उत्पन्नही दुप्पट होऊ शकेल. अशाच एका योजनेचे नाव आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी मात्र अलीकडेच केंद्र सरकारने या योजनेच्या नियमांमध्ये मोठा बदल केला आहे.
प्रधानमंत्री किसान योजनेत देशातील कोट्यावधी शेतकऱ्यांचा समावेश आहे. मात्र, काळाच्या ओघात या योजनेत अनियमितता आल्याने कोणीही याचा लाभ घेऊ लागले होते. योजनेच्या लाभासाठी एक नियामवली ठरवून देण्यात आली आहे. त्याची अंमलबाजावणी होत नसल्याने सरकारचे यामध्ये नुकसान होऊ लागले होते. त्यामुळे आता योजनेचा लाभ घ्यावयचा असल्यास तुम्हाला रेशनकार्डही जमा करावे लागणार आहे. आता रेशनकार्डचा क्रमांक आल्यानंतरच पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार आहे. आता या योजनेअंतर्गत नवीन नोंदणी करताना रेशनकार्ड क्रमांक देणे बंधनकारक आहे. या दस्तऐवजाची सॉफ्ट कॉपी तयार करून पोर्टलवर अपलोड करावी लागेल.
जर तुम्ही पंतप्रधान किसान योजनेअंतर्गत पहिल्यांदा नोंदणी केली तर तुम्हाला रेशनकार्ड क्रमांक देखील अपलोड करावा लागेल. यासोबतच पीडीएफही अपलोड करावी लागणार आहे. आता सातबारा उतारा, आधार कार्ड, बँक पासबुक आणि घोषणापत्राच्या हार्ड कॉपी जमा करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामुळे पीएम किसान योजनेत होणारी फसवणूक कमी करता येईल, असा सरकारचा विश्वास आहे. त्यामुळे नोंदणीची प्रक्रिया सोपी होणार आहे.
नोंदणीची प्रक्रिया ही आपण घरी बसूनही करु शकता. ऑनलाईनद्वारे तुम्हाला ही माहिती भरावी लागणार आहे. याशिवाय पंचायत समिती किंवा ग्राहक सेवा केंद्रामध्येही नोंदणी करता येणार आहे. नोंदणी करिता कार्यालय किंवा ग्राहक सेवा केंद्रामध्ये जाण्याची आवश्यकता नाही. तुम्ही घरी बसूनही ही नोंदणी करु शकणार आहात. केवळ पात्र शेतकऱ्यांनाच ही नोंदणी करता येणार आहे.
* तुम्हाला प्रथम पंतप्रधान किसान सन्मान योजना या अधिकृत वेबसाइटवर जावे लागणार आहे.
* आता ‘फार्मर्स’ कॉर्नरला जा.
* येथे आपल्याला ‘नवीन शेतकरी नोंदणी’ या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.
* आधार क्रमांक समाविष्ट करावा लागणार आहे.
* त्याच वेळी कॅप्चा कोड घालून राज्याची निवड करावी लागते आणि मग पुढची प्रक्रिया ही करावी लागणार आहे.
* आपल्याला आपली संपूर्ण वैयक्तिक माहिती या स्वरूपात भरणे आवश्यक आहे.
* बँक खात्याचा तपशील आणि शेतीशी संबंधित माहिती देखील भरावी लागेल.
* मग तुम्ही फॉर्म सादर करू शकता. (P.M. to avoid irregularities in the scheme. A change in the kisan scheme)
सोयाबीनचा दर स्थिर पण विक्री करायची कुठे ? शेतकऱ्यांकडे आहेत हे पर्याय
रब्बीचा ‘श्रीगणेशा’ केलाय, मग ‘ही’ काळजी घेतली तरच होईल पीकांचे उगवण..