औरंगाबाद : रब्बी हंगामातील (Chickpea Crop) हरभऱ्याला किमान आधारभूत किंमत मिळावी याअनुशंगाने (Maharashtra) राज्यात खरेदी केंद्र सुरु करण्यात आली आहेत. मात्र, हरभरा विक्री करताना शेतकऱ्यांना उत्पादकतेची अडचण निर्माण होत होती. (Agricultural Department) कृषी विभागाने ठरवून दिलेल्या उत्पादकतेनुसारच खरेदी केंद्रावर हरभरा खरेदी केली जात होती. ही उत्पादकताच विक्रीसाठी अडचणीचा मुद्दा ठरली होती. त्यामुळे आता सोलापूर, वाशिम आणि औरंगाबाद जिल्ह्यासाठी ठरवून देण्यात आलेल्या हरभरा उत्पादकतेमध्ये बदल करण्यात आला असून या तिन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा हरभरा विक्रीचा मार्ग मोकळा झाला आहे. शेतकऱ्यांना आता खरेदी केंद्रावर हरभऱ्याची विक्री करता येणार आहे.
उत्पादन काढण्यापूर्वीच कृषी विभागाकडून शेती पिकाची उत्पादकता ही ठरवली जाते. आणि त्या उत्पादकतेनुसारच हमीभाव केंद्रावर शेतीमलाची खरेदीही केली जाते. कृषी विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार प्रत्यक्षात अधिकचे उत्पादन मिळाल्याने शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रावर अडचणीचा सामना करावा लागत होता. ठरवून दिलेल्या उत्पादकतेपेक्षा अधिकचा माल आल्यास तो खरेदी केला जात नव्हता. त्यामुळे काय करावे असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर होता. गेल्या अनेक दिवसांपासून यावर तोडगा निघत नसल्याने शेतकरी अडचणीत होते. अखेर औरंगाबाद, वाशिम आणि सोलापूर जिल्ह्यासाठी हरभऱ्याची उत्पादकता वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सरकारच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या खरेदी केंद्रावर सध्या हरभऱ्याला 5 हजार 230 रुपये क्विंटल असा दर ठरवून देण्यात आला आहे. तर खुल्या बाजारात हरभऱ्याला 4 हजार 600 रुपये दर मिळत आहे. उत्पादकता अधिक असल्यामुळे शेतकऱ्यांना खरेदी केंद्रावर हरभऱ्याची विक्री करता येतन नसल्याने क्विंटलमागे 600 रुपयांचे नुकसान होत होते. अखेर उत्पादकता वाढवल्याने हा प्रश्न निकाली निघाला आहे. शेतकऱ्यांना आता अधिकच्या दराचा फायदा होणार आहे.
राज्यात मार्च महिन्यापासून हरभरा खरेदी केंद्राला सुरवात झाली आहे. असे असले तरी येथील नियम आणि अटींमुळे शेतकऱ्यांनी खुल्या बाजारपेठेतच हरभरा विक्रीला पसंती दिली होती. मात्र, दरातील तफावत ही दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकऱ्यांनी खरेदी केंद्रांचा आधार घेतला पण येथील उत्पादकतेच्या नियमामुळे शेतकऱ्यांची अडचण झाली होती. हीच अडचण आता पणन मंडळाने दूर केली असल्याने आता केंद्रावरील आवक वाढणार आहे.
Vineyard Damage : हंगाम संपल्यानंतरही अवकाळीची अवकृपा सुरुच, द्राक्षानंतर आता बागाच उध्वस्त
Success Story : नांदेडच्या शिवारात फुललीय फणसाची बाग, 7 वर्षाची मेहनत यंदा आली कामी
Pune : मशागतीविना शेती, तरुण शेतकऱ्याचा अभिनव उपक्रम पाहण्यासाठी परदेशी पाहुणे माळवाडीच्या शिवारात