पाऊस, अतिवृष्टी नंतर आता बुरशीचा प्रादुर्भाव, फळबागांच्या उत्पादनात निम्म्याने घट

| Updated on: Oct 24, 2021 | 5:43 PM

निसर्गाच्या चक्रातून यंदा शेतकऱ्यांची सुटका होताना दिसत नाही. यापूर्वी अतिवृष्टी सततचा पाऊस आणि आता बुरशीजन्य किटकांचा प्रादुर्भाव फळबागांवर झालेला आहे. त्यामुळे पावसाचा आणि बदललेल्या वातावरणाचा परिणाम केवळ सोयाबीन, कापूस या खरीपातील पिकांलवरच नाही तर संत्री, पपई या फळबागांवरही झालेला आहे.

पाऊस, अतिवृष्टी नंतर आता बुरशीचा प्रादुर्भाव, फळबागांच्या उत्पादनात निम्म्याने घट
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

मुंबई : निसर्गाच्या (Cycle of Nature ) चक्रातून यंदा शेतकऱ्यांची सुटका होताना दिसत नाही. (Nagpur) यापूर्वी अतिवृष्टी सततचा पाऊस आणि आता बुरशीजन्य किटकांचा प्रादुर्भाव फळबागांवर झालेला आहे. त्यामुळे पावसाचा आणि बदललेल्या वातावरणाचा परिणाम केवळ सोयाबीन, कापूस या खरीपातील पिकांलवरच नाही (Damage to orchards)तर संत्री, पपई या फळबागांवरही झालेला आहे. याचा अधिकचा प्रादुर्भाव हा अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात झालेला आहे. येथे फळबागांचे नुकसान झाले असून शेतकरी आता संकटात आहेत. तर नंदुरबार येथेही पपईला बुरशीजन्य किटकांनी ग्रासलेले आहे.

एकंदरीत यंदा अधिकच्या पावसामुळे ना खरीप हंगामातील पीके शेतकऱ्यांच्या पदरी पडली आहेत ना फळांचे उत्पादन मिळालेले नाही.
पारंपारिक शेती पध्दतीमध्ये बदल करुन लाखो रुपये खर्ची करुन शेतकरी फळबाग लावण्याचे धाडस करीत आहेत. पण दरवर्षी निसर्गच साथ देत नाही. कधी आवर्षणाची स्थिती तर कधी अतिवृष्टी यामुळे उत्पादनावर केलेला खर्चही निघणे मुश्किल झाले आहे.

अमरावतीच्या अचलपूर तहसीलमध्ये हजारो हेक्टर क्षेत्रात संत्र्याच्या लागवडीमुळे लाखो व्यवसाय केले जातात. शेतकऱ्यांच्या कुटूंबाचा उदरनिर्वाहही याच फळबागांच्या उत्पादनावर अवलंबून असतो. यावर्षी शेतकऱ्यांना चांगला भाव अपेक्षित होता. कारण संत्र्याच्या मळ्यात चांगल्या दराने सौदे झाले होते. पण मुसळधार पावसामुळे बुरशीजन्य कीटकांच्या प्रादुर्भावामुळे फळगळती झाली आहे. यामुळे बहुतेक संत्र्याचे सौदे रद्द झाले आणि शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. 20 लाख रुपयांपर्यंत विक्री होणारी संत्र्याची बाग आता व्यापारी 4 आणि 5 लाखापर्यंत विकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

उतापदन कमी खर्च अधिक

गत महिन्यात झालेला पाऊस आणि आता बुरशीचा प्रादुर्भाव यामुळे संत्र्याची फळगळती सुरु झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून याचे प्रमाण वाढले आहे. जवळपास 80 टक्के संत्र्याचा सडा हा झाडाखालीच झाला आहे. शिवाय उर्वरीत फळांचाही दर्जा ढासाळल्याने त्यालाही योग्य दर नाही. वर्षभराची मेहनत आणि पैसा आता वाया जाणार याची धास्ती शेतकऱ्यांमध्ये आहे. सुरलवातीच्या काळात फळबागा बहरत होत्या मात्र, पावसाला सुरवात झाली तेव्हापासून लागलेले ग्रहण आजही बुरशीच्या रुपाने सुरुच असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. आता शेतकऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत प्रशासनालाही कोणतीही मदत मिळत नाही. त्यामुळे उत्पादनाची भर कशातून भरुन काढावी हा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे.

महाराष्ट्रात सर्वाधिक संत्र्याचे उत्पादन

देशाच्या तुलनेत महाराष्ट्रात जवळपास 80 टक्के संत्र्याचे उत्पादन हे महाराष्ट्रात घेतले जाते. केशरी संत्री ही प्रसिध्द असून नागपूरला ‘ऑरेंज सिटी’ म्हणून ओळखले जाते. परंतु आता कृषी शास्त्रज्ञांनी देशातील इतर राज्यांमध्ये लागवड करता येईल अशा संत्र्याच्या अनेक प्रगत जाती विकसित केल्या आहेत. पण एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पादन घेऊन नैसर्गिक संकटाने सर्वकाही हिरावून घेतले आहे. (Pest infestation on orchards, production reduced by half, Nagpurkar farmers suffering)

संबंधित बातम्या :

वखार महामंडळाचा अनोखा उपक्रम, शेतीमालाला मिळणार योग्य दर

खरीपाच्या अंतिम टप्प्यात हमीभाव केंद्रचा आधार, किनवटमध्ये खरेदी केंद्र

असं नेमकं काय घडतं ? काळ्या म्हशीला पांढरं रेडकू होतं