नवी दिल्ली: खरिप हंगामातील पिकांसाठी विशेष करुन धान (Paddy), मका, बाजरी, कापूस यासह इतर पिकांचा विमा हप्ता भरण्याची मुदत 31 जुलैपर्यंत वाढवली आहे. पीक विमा काढण्यासाठी आता 30 दिवसांची मुदत वाढवली आहे. मात्र, शेतकऱ्यांना पिकाची पेरणी केल्यानंतर पुढील 10 दिवसांमध्ये पीक विमा योजनेमध्ये अर्ज दाखल करावा लागेल. प्रधानमंत्री पीक विमा योजनेमध्ये सहभागी होण्यापूर्वी शेतकऱ्यांना काही गोष्टी माहिती असणं आवश्यक आहे. (PM crop insurance scheme date extended till 31 July its optional for farmers)
पीएम पीक विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांना सहभागी होणं आता ऐच्छिक ठेवण्यात आलं आहे. शेतकऱ्यांची इच्छा असल्यास ते यामध्ये सहभागी होऊ शकतात. जे शेतकरी किसान क्रेडिट कार्ड (KCC) धारक आहेत त्यांना पीक विमा योजनेत सहभागी व्हायचं आहे की नाही हे नोंदवावं लागेल. ज्या शेतकऱ्यांना सहभागी व्हायचं आहे त्यांच्या कर्जामधून योजनेचा प्रीमियमम कापला जाईल. किसान क्रेडिट धारक शेतकऱ्यांना पीक विमा योजनेत सहभागी व्हायचंय की नाही हे 24 जुलैपर्यंत बँकाना कळवावं लागेल. अन्यथा त्यांचा पीक विमा योजनेत समावेश केला जाणार आहे. ज्या शेतकऱ्यांवर कोणतही कर्ज नाही ते ग्राहक मदत केंद्रावर जाऊन पीक विमा काढू शकतात.
प्रधानमंत्री पीक विमा योजनेत ज्या पिकासाठी विमा उतरवायचा असेल ते पीक बदलण्यासाठी शेतकऱ्यांकडे 29 जुलैपर्यंत पर्याय आहे. पीक बदलाबाबत शेतकऱ्यांना ही माहिती बँकेला द्यावी लागेल. पीक विमा योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी योजना अधिकारी आणि सर्वेक्षक नियुक्त करण्यातक आले आहेत. विमा कंपन्यांच्या मदतीसाठी जिल्हा आणि तालुका स्तरावर कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. किसानों को कितना मिला क्लेम
केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांनी दिलेल्या माहितीनुसार राष्ट्रीय पातळीवर पीक विमा योजनेमध्ये 13 जानेवारी 2016 ते डिसेंबर 2020 मध्ये शेतकऱ्यांनी जवळपास 19 हजार कोटी रुपयांचा प्रीमियम भरलाहोता. त्याबदल्यात त्यांना 90 हजार कोटी रुपयांचा परतावा मिळाला आहे.
संबंधित बातम्या:
Money: पोस्ट ऑफिसच्या 5 बचत योजनांमध्ये पैसे गुंतवा, कमी कालावधीमध्ये पैसे दुप्पट होणार
घर भाड्याने देण्यापेक्षा LIC च्या ‘या’ योजनेत पैसे गुंतवा, महिन्याला तब्बल 45 हजारापर्यंत कमवा!
(PM crop insurance scheme date extended till 31 july its optional for farmers)