PM Kisan Yojana 10th Installment LIVE: अन्नदाता ऊर्जादाता व्हावा म्हणून काम सुरु : नरेंद्र मोदी

| Updated on: Jan 01, 2022 | 2:07 PM

PM Kisan Yojana 10th Installment LIVE: पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या 10 वा हप्ता (PM Kisan Scheme 10th installment )शेतकऱ्यांच्या खात्यावर आज वर्ग करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi Live) यानिमित्तानं देशातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. 

PM Kisan Yojana 10th Installment LIVE: अन्नदाता ऊर्जादाता व्हावा म्हणून काम सुरु : नरेंद्र मोदी
पंतप्रधान नरेंद्र मोदी
Follow us on

पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या 10 वा हप्ता (PM Kisan Scheme 10th installment )शेतकऱ्यांच्या खात्यावर आज वर्ग करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi Live) यानिमित्तानं देशातील शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.  पीएम किसान योजनेचा आज हा 10 वा हप्ताही खात्यावर जमा होणार आहे तर ही प्रक्रिया सुरु असतानाच दुसरीकडे (PM Narendra Modi) पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत. यापूर्वी त्यांनी सेंद्रिय शेतीचा मंत्र दिला होता आज शेतकऱ्यांना नववर्षाचा काय संदेश देणार हे पाहावे लागणार आहे.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 01 Jan 2022 02:05 PM (IST)

    केमिकल मुक्त शेतीसाठी प्रयत्न सुरु: नरेंद्र मोदी

    केमिकल मुक्त शेतीसाठी प्रयत्न सुरु: नरेंद्र मोदी

  • 01 Jan 2022 01:56 PM (IST)

    Narendra Modi : शेतकरी उत्पादक कंपनीमुळं शेतकऱ्यांना बळ

    भारतानं गेल्या काही दिवसांपासून आधुनिकतेसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरु केले आहेत. व्यापार गतिमान व्हावा म्हणून गती शक्ती प्रकल्प राबवण्यास सुरु करण्यात आला आहे. चीप निर्मिती, सेमीकंडक्टरसाठी काम सुरु करण्यात आलं आहे. देशाला 7 संरक्षण कंपन्या स्थापन करण्यात आल्या आहेत. डिजीटल इंडिया अभियानाअंतर्गत हजारो गावांना ऑप्टिकल फायबर केबलनं जोडलं आहे.

    2021 मध्ये ई रुपी लागू करण्यात आलं, एक देश एक राशन कार्ड, ई श्रम योजना सुरु करण्यात आली आहे.

    2022 मध्ये आपल्याला वेगानं काम करायचं आहे. कोरोनाशी सतर्कता आणि सावधानता बाळगत लढायचं आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले. भीती, साशंकता सोडून शक्ती आणि सामर्थ्य बाळगावं लागेल. आपल्याला राष्ट्रप्रथम ही भावना बळकट करावी लागेल, असं मोदी म्हणाले.  आपल्या संकल्पात सिध्दी आहे. पीएम किसान सम्मान निधी भारताच्या शेतकऱ्यांच्या दृष्टीनं महत्त्वाचं आहे. प्रत्येक हप्ता, प्रत्येक वर्षी हजारो कोटी रुपयांची रक्कम प्रदान कोणत्याही मध्यस्थाशिवाय पाठवली जाईल, याचा कोणी विचार केला नसेल. ही योजना शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. देशातील छोट्या शेतकऱ्यांना शेतकरी उत्पादक कंपनीद्वारा नवी ताकद मिळाली आहे.

  • 01 Jan 2022 01:45 PM (IST)

    Narendra Modi Live : महिला आणि विद्यार्थ्यांच्या विकासासाठी प्रयत्न

    भारतात 2021 मध्ये महिलांना सैनिक स्कूलमध्ये प्रवेश दिला. एनडीएमध्ये प्रवेश दिला. भारतानं ऑलम्पिकमध्ये  आणि पॅरालम्पिकमध्ये चांगली कामगिरी केली आहे.

    भारतात सध्या क्रीडा क्षेत्रावर जितकी गुंतवणूक केली जाते तेवढी यापूर्वी केली जात नव्हती.

  • 01 Jan 2022 01:43 PM (IST)

    Narendra Modi Live : भारतात 50 हजार स्टार्टअप कार्यरत

    प्रत्येक भारतीयाची शक्ती एकत्रित होऊन देशाच्या सामुदायिक विकासाला प्रेरित करते. सर्वांच्या साथीनं भारत कोरोना विषाणू संसर्गाच्या महामारीचा सामना करत आहे.

    कोरोनाच्या काळात आरोग्य सुविधा वाढवण्यासाठी काम करण्यात आलं. 2021 मध्ये ऑक्सिजन प्लांट उभारण्यात आलं. वैद्यकीय महाविद्यालय उभारणी सुरु झाली आहेत. देशात आयुष्यमान भारत  जिल्ह्यात कार्यरत आहे. आयुष्यमान भारत योजना  डिजीटल योजनेला प्रोत्साहन देईल.

    आपल्या अर्थव्यवस्थेचा दर 8 टक्के पेक्षा जास्त आहे. आपल्या देशात होणारी परकीय गुंतवणूक वाढली आहे. आज आपला देश विविधता आणि विशालतेच्या रुपानं विकासाचे नवे विक्रम नोंदवत आहेच. 2021 मध्ये भारतात 70 हजार कोटी रुपयांचा व्यवहार यूपीआयनं केला आहे.

    देशात आता 50 हजार स्टार्टअप सुरु केले आहेत. त्यापैकी 10 हजार स्टार्टअप गेल्या सहा महिन्यात सुरु झाले आहेत. भारताच्या तरुणांच्या नव्या यशाची गाथा लिहिली जात आहे. एकीकडे भारत स्टार्टअप सुरु करत आहे. दुसरीकडे संस्कृतीच जतन केलं जातंय.

  • 01 Jan 2022 01:37 PM (IST)

    Narendra Modi live : संघटित शक्ती संकल्पाला सिद्धीकडे घेऊन जाते: नरेंद्र मोदी

    Narendra Modi live : 2021 हे वर्ष गेल्या 100 वर्षातील सर्वात मोठ्या महामारीचा सामना करण्यात गेलं. मोठ्या महामारीचा देशातील जनतेनं सामना केला. नव्या वर्षात प्रवेश करताना गेल्या वर्षातील कामातून प्रेरणा घेऊन पुढं जायचं आहे. या वर्षी आपल्याला स्वातंत्र्यांचा अमृत महोत्सव पूर्ण करायचा आहे.

    2021 मध्ये आपण संपूर्ण जगाला दाखवून दिलंय की आपण आम्ही ठरवलं तर काहीही करु शकतो. भारतासारखा देश हा 145 कोटी लसीचे डोस देऊ शकतो, भारत एका दिवसात अडिच कोटी लसीचे डोस देऊ शकतो, भारत या कोरोनाच्या काळात अनेक महिन्यांपासून 80 कोटी नागरिकांना मोफत धान्य देत आहे. या योजनेवर भारत 2 लाख 60 रुपये खर्च केला आहे. या योजनेचा फायदा गावातील शेतकरी, मजुरांना मिळाला आहे.

  • 01 Jan 2022 01:33 PM (IST)

    Narendra Modi live : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून वैष्णोदेवी मंदिरातील घटनेबद्दल शोक व्यक्त

    Narendra Modi live : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून वैष्णोदेवी मंदिरातील घटनेबद्दल शोक व्यक्त करण्यात आला आहे.

    नवीन वर्षाची सुरुवात शेतकऱ्यांच्या दर्शनानं व्हावी, ही माझ्यासाठी मोठी प्रेरणादायी गोष्ट आहे. देशातील छोट्या शेतकऱ्यांच्या खात्यावर 20 हजार कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. शेतकरी उत्पादक संघटनांना 14 हजार कोटी रुपये पाठवण्यात आले आहेत.

  • 01 Jan 2022 01:17 PM (IST)

    नरेंद्र मोदी यांचा तामिळनाडू आणि गुजरातच्या शेतकऱ्यांशी संवाद

    नरेंद्र मोदी यांनी तामिळनाडू आणि गुजरातच्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. गुजरातच्या नैसर्गिक शेती करणाऱ्या शेतकरी उत्पादक कंपनीशी संवाद साधला.

  • 01 Jan 2022 01:09 PM (IST)

    नरेंद्र मोदींचा उत्तर प्रदेश राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद

    नरेंद्र मोदींनी उत्तर प्रदेश राज्यातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. उत्तर प्रदेशातील शेतकरी उत्पादक कंपनीशी संवाद साधला. शेतकऱ्यांना नरेंद्र मोदींनी गुलाबाची फुलं ई नाम वर विकली जातात का? असा सवाल केला.  उत्तर प्रदेशातील संबंधित कंपनीनंच्या प्रमुखांनी  उलाढाल 35 लाखांपर्यंत पोहोचल्याचं सांगितलं. नरेंद्र मोदींचं स्वप्न पूर्ण करणार असल्याचं त्यांनी सांगितलं.

  • 01 Jan 2022 12:59 PM (IST)

    नरेंद्र मोदींची राजस्थानातील शेतकऱ्यांशी बातचीत

    राजस्थानातील मध उत्पादक शेतकऱ्यांशी नरेंद्र मोदी यांनी संवाद साधला. शेतकरी उत्पादक कंपनीची माहिती मिळाल्यानंतर आम्ही कंपनी स्थापन केल्याचं शेतकरी म्हणाले. राजस्थानातील शेतकऱ्यांचा फायदा कसा होईल, या संदर्भात आम्ही विचार करुन सरसोच्या हंगामात आम्ही  माशांच्या पेट्या लावतो, असं इंद्रपाल म्हमाले.

  • 01 Jan 2022 12:56 PM (IST)

    नरेंद्र मोदी यांचा पंजाबच्या शेतकऱ्यांशी संवाद

    पंजाब जागृती किसान उत्पादक संघटनेच्या रवींद्र यांच्याशी नरेंद्र मोदींनी संवाद साधला. रवींद्र सिंग यांनी 285 शेतकरी सदस्य असल्याचं सांगितलं आहे. शेतकरी उत्पादक कंपनीनं ग्राहक सुविधा केंद्र बनवल्याची माहिती जागृती किसान उत्पादक संघटनेनं केलंय आहे.

  • 01 Jan 2022 12:51 PM (IST)

    उत्तराखंडच्या शेतकऱ्यांशी नरेंद्र मोदी यांचा संवाद सुरु

    उत्तराखंडच्या शेतकऱ्यांशी नरेंद्र मोदी यांचा संवाद सुरु

    नरेंद्र मोदी यांच्याकडून शेतकऱ्यांसह देशवासियांना नववर्षाच्या शुभेच्छा, नरेंद्र मोदी यांनी उत्तराखंडच्या शेतकऱ्यांशी संवाद साधला. उत्तराखंडच्या जीवामृत वापरणाऱ्या शेतकऱ्यांशी त्यांनी संवाद साधला. उत्तराखंडच्या शेतकरी उत्पादक कंपनीशी नरेंद्र मोदी यांनी जीवामृत संदर्भात संवाद साधला.

    जसवीर  यांनी नाबार्ड, अॅपेडा या सारख्या संस्थांचं सहकार्य असल्याचं सांगितलं. एफपीओ बनवल्यानंतर पुरवठादारांशी करार केल्यानंतर उत्पादन  आणि मागणी वाढल्याचं जसवीर यांनी सांगितलं.

  • 01 Jan 2022 12:46 PM (IST)

    PM Kisan : पीएम किसान योजनेचे 20 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग

    PM Kisan : पीएम किसान योजनेचे 20 हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. याशिवाय शेतकरी उत्पादक कंपन्यांना 14 हजार कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत.

  • 01 Jan 2022 12:42 PM (IST)

    पीएम किसान योजनेसह इतर योजना नरेंद्र मोदी यांनी आणल्या

    पीएम किसान योजनेसह इतर योजना नरेंद्र मोदी यांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी नव्या योजना आणल्याचं नरेंद्र तोमर यांनी सांगितलं.

  • 01 Jan 2022 12:39 PM (IST)

    Narendra Tomar : शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी नरेंद्र मोदी यांचे प्रयत्न

    पीएम किसान योजनेच्या माध्यमातून 10 कोटी 9 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर 20 हजार कोटी वर्ग करण्यात येणार आहेत. देशातील 86 टक्के शेतकरी हे अल्पभूधारक शेतकरी आहेत. त्यांचा उत्पन्न खर्च कमी व्हावा म्हणून आम्ही प्रयत्न करत आहोत, असं नरेंद्रसिंह तोमर म्हणाले.

  • 01 Jan 2022 12:34 PM (IST)

    Narendra Tomar :केंद्रीय कृषीमंत्र्यांचं संबोधन सुरु

    आज पीएम किसान सम्मान निधीच्या कार्यक्रमात नरेंद्र मोदी यांची उपस्थिती आपल्याला आणि देशातील शेतकऱ्यांना आनंददायी ठरते. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं देशातील 8 कोटी शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे.

    आपल्या सर्वांसाठी हा सौभाग्याचा विषय आहे की, आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्रीपदाची शपथ घेण्यापूर्वी ते गुजरातचे नेतृत्त्व करत होते. गुजरातच्या शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी भगिरथ असल्यासारखं काम केलं.

  • 01 Jan 2022 12:18 PM (IST)

    पीएम किसान योजनेचा 10 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार

    पीएम किसान योजनेचा 10 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग होणार