नवी दिल्ली: केंद्र सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरु केल्या पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचे ( PM Kisan samman nidhi scheme) दहाव्या हप्त्याचे पैसे कधी मिळणार, याची सर्वजण वाट पाहत आहेत. मात्र, उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांना देशातील इतर शेतकऱ्यांच्या आधी ही मदत मिळण्याची शक्यता आहे. कारण, उत्तर प्रदेश कृषी विभागाकडून राज्यातील 11 जिल्ह्यांमध्ये 13 ऑक्टोबरपर्यंत रोजी पंतप्रधान किसान समाधान दिवसाचे आयोजन करण्यात आले आहे.
याठिकाणी शेतकऱ्यांना PM Kisan samman nidhi scheme योजनेच्या दहाव्या हप्त्याचे पैसे मिळू शकता. त्यासाठी शेतकऱ्यांना आधार नंबर, नाव, बँक खाते, IFSC कोड जमा करावा लागेल. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेसाठी सध्या नवी नोंदणी बंद आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा स्तरावर पंतप्रधान शेतकरी समाधान दिवसाचे आयोजन करण्याचे निर्देश दिले होते. या विशेष कार्यक्रमातंर्गत शेतकऱ्यांच्या समस्यांचे निराकरण केले जाईल. त्यासाठी कृषी विभाग आणि अन्य सरकारी विभागातील संगणक ऑपरेटर्सना बियाणे गोदामांमध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या शिबीरांमध्ये पाठवण्यात येणार आहे.
जर उत्तर प्रदेशच्या शेतकऱ्यांना प्रधानमंत्री किसान सन्मान निधीचा लाभ मिळत नसेल, तर ते 11 ते 13 ऑक्टोबर दरम्यान कार्यालयीन वेळेत आधार कार्ड आणि बँक खात्याच्या तपशीलांसह त्यांच्या विकास ब्लॉकच्या शासकीय बीज गोदामात पोहोचून त्यांचा डेटा अपडेट करू शकतात. याशिवाय, इतर समस्या असल्यास त्याचेही निराकरण याठिकाणी केले जाईल.
केंद्र सरकार 15 डिसेंबर 2021 पर्यंत प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना (पीएम किसान योजना) चा 10 वा हप्ता जारी करण्याची योजना आखत आहे. सरकारने गेल्या वर्षी 25 डिसेंबर 2020 रोजी शेतकऱ्यांना पैसे हस्तांतरित केले होते. कधीकधी सरकारकडून खात्यात पैसे हस्तांतरित केले जातात, परंतु ते शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचत नाही. याचे मुख्य कारण तुमचे आधार, खाते क्रमांक आणि बँक खाते क्रमांकात चूक असू शकते.
स्टेप 1: सर्वात आधी pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा.
स्टेप 2:तिथे गेल्यावर तम्हाला पीएम किसान सन्मान निधीचं होमपेज दिसेल.
स्टेप 3:होमपेजवर किसान कॉर्नवर जा.
स्टेप 4:जर तुम्ही यापूर्वी अर्ज केला असेल आणि आधार व्यवस्थित अपलोड झाले नसेल तर आधार नंबर चुकीचा असल्याची माहिती तिथे मिळेल.
स्टेप 5: फार्मर किंवा किसान कॉर्नरवर जाऊन शेतकऱ्यांसाठी पीएम किसान सन्मान योजनेसाठी नोंदणी करण्याची सुविधा देण्यात आली आहे.
स्टेप 6: पीएम किसान पोर्टलवर सरकारनं शेतकऱ्यांची यादी अपलोड केलेली आहे. तिथे अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांचा आधार नंबर, बँक खाते क्रमांक आणि मोबाईल नंबर याचा वापर करता येईल.
स्टेप 7:ज्या शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा लाभ देण्यात आला आहे, त्यांची यादी राज्य, जिल्हा तालुका, गाव, कॅटेगरी सिलेक्ट करुन पाहू शकता.
संबंधित बातम्या:
PM Kisan: पीएम किसान योजनेतून अपात्र शेतकऱ्यांची नाव वगळली, तुमचं रेकॉर्ड तपासलं का?