PM Kisan Samman Nidhi Scheme नवी दिल्ली: पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या आठव्या हप्त्याची रक्कम एप्रिल महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाणार आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात आठव्या हप्त्याची रक्कम 10 एप्रिलाच्या सुमारास पाठवण्याची तयारी करत असल्याची माहिती आहे. पीएम-किसान सन्मान योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आतापर्यंत सात हप्त्यांमध्ये 14 हजार रुपये मिळाले आहेत. आठव्या हप्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये पाठवले जाणार आहेत. किसान सन्मान योजनेअंतर्गत आतापर्यंत 11.66 कोटी शेतकऱ्यांना 1.15 लाख कोटी रुपये देण्यात आले आहेत. शेतकऱ्यांनी त्यांच्या रेकॉर्डमध्ये अडचण असल्यास दुरुस्ती करणं आवश्यक आहे. (PM Kisan Samman scheme 8th instalment two thousand rupees credited in farmers account in April 2021 check your record)
केंद्र सरकारनं प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेअंतर्गत 11.66 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवले आहेत. शेतकऱ्यांना या योजनेनुसार 1.15 लाख कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवले आहेत. आठव्या हप्त्याची रक्कम मिळण्यापूर्वी शेतकऱ्यांना त्यांच्या रेकॉर्डमध्ये काही दुरुस्ती असेल तर करुन घ्यावी लागणार आहे. पंतप्रधान किसान सन्मान योजनेअंतर्गत आर्थिक वर्षामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावर सहा हजार रुपये जमा केले जातात. पहिला हप्ता डिसेंबर ते मार्च, दुसरा हप्ता एप्रिल ते जुलै आणि तिसरा हप्ता ऑगस्ट ते नोव्हेंबर दरम्यान जारी केला जातो. पीएम किसान सन्मान योजनेसाठी देशातील 11.66 कोटी शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी काही शेतकऱ्यांच्या रेकॉर्डमध्ये अडचणी असल्यामुळे त्यांना मदत मिळत नाही. जर सर्व शेतकऱ्यांचं रेकॉर्ड दुरुस्त केले तर सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना आठव्या हप्त्याचे दोन हजार रुपये मिळू शकतात.
पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्यांना सातव्या हप्त्याची रक्कम 25 डिसेंबर 2020 पासून मिळण्यास सुरुवात झाली आहे. प्रत्येक वर्षाला शेतकऱ्यांच्या खात्यात एकूण तीन हप्त्यांमध्ये 6000 रुपये जमा केले जातात. आतापर्यंत 9 कोटी 41 लाख शेतकऱ्यांना सातवा हप्ता मिळाला आहे. या योजनेमध्ये पहिला हप्ता हा 1 डिसेंबर 31 ते मार्च या कालावधीत दिला जातो. तर दुसरा हप्ता 1 एप्रिल ते 31 जुलैपर्यंत दिला जातो. शेतकऱ्यांना खात्यात तिसऱ्या हप्त्याचा लाभ 1 ऑगस्ट ते 30 नोव्हेंबर या कालावधीत मिळतो.
नाणार जमीन व्यवहाराची चौकशी सुरू, जमिनी परत देण्याच्या हालचालीही सुरूhttps://t.co/BTTf3ZkiaU#ratnagiri | #nanar | #nanarrefinery | #MaharashtraGovernment
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 15, 2021
संबंधित बातम्या :
PM Kisan Scheme : 12 वाजता तुमच्या खात्यात पैसे पडणार, पंतप्रधान मोदींच्या भाषणाकडे लक्ष
(PM Kisan Samman scheme 8th instalment two thousand rupees credited in farmers account in April 2021 check your record)