नवी दिल्ली: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा नववा हप्ता लवकरच जारी करण्यात येणार आहे. मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या सर्व योजनांपैकी पंतप्रधान किसान योजना सर्वात यशस्वी असल्याचे म्हटलं जाते. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6 हजार रुपये मिळतात. प्रत्येकी दोन हजार रुपयांच्या हप्त्यात ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात पोहोचते. पंतप्रधान किसान योजनेसंदर्भात अनेक प्रकारचे प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात. यापैकी एक म्हणजे कोणत्याही शेतकरी पती पत्नीला वार्षिक 6-6 हजार रुपये स्वतंत्रपणे मिळू शकतात का हा आहे.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना शेतकरी कुटुंबांसाठी आहे. कुटुंब म्हणजे पती-पत्नी आणि दोन अल्पवयीन मुले अशी व्याख्या करण्यात आली आहे.त्यामुळं कुटुंबातील केवळ एका सदस्याला पंतप्रधान किसान सन्मान निधीचा लाभ मिळू शकेल.
कुटुंबातील पती-पत्नी दोघांनाही या योजनेचा लाभ मिळत असल्यास त्यांच्याकडून ही रक्कम वसूल केली जाऊ शकते. वास्तविक अशी अनेक प्रकरणे समोर आली आहेत की ज्यात पती-पत्नी दोघांनाही किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळाला आहे. अशा लोकांकडून सरकार हप्त्याची रक्कम वसूल करत आहे जे योजनेसाठी पात्र नाहीत.
पीएम किसान सन्मान योजनेत सरकारी कर्मचारी किंवा प्राप्तिकर भरणारे शेतकरी पात्र मानले जात नाहीत. याशिवाय दहा हजार रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळणारे डॉक्टर, अभियंता, सीए आणि कर्मचारीही पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. खासदार आणि आमदारांनाही पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळत नाही. आतापर्यंत देशातील 11.82 कोटी शेतकर्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. केंद्र सरकारने असे म्हटले आहे की वार्षिक 6 हजार रुपये त्याच शेतकर्यांच्या खात्यात वर्ग केले जातील, ज्याच्या नावावर शेती असेल.
मोदी सरकारने शेतकऱ्यांचं उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयानुसार पीएम किसान सन्मान योजना सुरु करण्यात आली होती. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी सहा हजार रुपये पाठवले जातात. शेतकरी संघटनेचे नेत्यांनी ही मदत वाढवून वार्षिक 24000 करावी अशी मागणी केली आहे.
संबंधित बातम्या
PM Kisan: 10.90 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 1 लाख 37 हजार कोटी वर्ग, केंद्रीय कृषीमंत्र्यांची माहिती
PM Kisan: पीएम किसान सन्मान योजनेच्या 8 व्या हप्त्याची रक्कम मिळाली नाही? एक फोनवर 2 हजार मिळवा