PM Kisan Scheme नवी दिल्ली: पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा नववा हप्ता लवकरच जारी करण्यात येणार आहे. मोदी सरकारच्या सर्व योजनांमध्ये पीएम किसान योजना सर्वात यशस्वी असल्याचे म्हटले जाते. या योजनेंतर्गत सरकार देशातील शेतकरी कुटुंबांना आर्थिक मदत करते. पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत देशातील शेतकऱ्यांना वर्षाकाठी 6 हजार रुपये मिळतात. प्रत्येकी 2 हजार रुपयांच्या तीन हप्त्यांमध्ये ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवली जाते. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना अर्ज करावा लागेल. अर्ज भरताना जर आपली माहिती नोंदवताना एखादी चूक झाली तर पीएम किसान योजनेचे पैसे शेतकऱ्यांना मिळणार नाहीत. जर, प्रधानमंत्री सन्मान योजनेचा अर्ज दाखल करतानाचं काही चूक झाली असेल तर अर्ज सादर करण्यापूर्वी दुरुस्त करुन घ्यावी.
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा अर्ज दाखल करताना शेतकरी आधार क्रमांक किंवा काही वेळा बँक खाते क्रमांक चुकीच्या पद्धतीने भरतात. चुकीची माहिती भरली गेली असल्यानं शेतकऱ्यांना योजनेची रक्कम मिळत नाही. त्यामुळे प्रतप्रधान किसान सन्मान योजनेचा हप्ता जाहीर होण्यापूर्वी शेतकऱ्यांनी त्यांची माहिती दुरुस्ती करुन घेणं आवश्यक आहे. आपण आधार क्रमांक चुकीच्या पद्धतीने प्रविष्ट केला असेल तर आपण पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत पोर्टलवर (pmkisan.gov.in) भेट देऊन ते दुरुस्त करू शकता.
आपल्याला पीएम किसानच्या वेबसाइटवर ‘फार्मर कॉर्नर’ सापडेल. त्यावर क्लिक केल्यानंतर आपण आपली माहिती दरुस्त करू शकता. तुम्हाला तुमच्या बँक खाते क्रमांकामध्ये काही बदल करायचा असेल तर तुम्हाला तुमच्या कृषी विभागाच्या कार्यालयात किंवा लेखापालशी संपर्क साधावा लागेल.
आतापर्यंत केंद्र सरकारने डीबीटीमार्फत पीएमक किसान योजनेचे आठ हप्ते जाहीर केले आहेत. आतापर्यंत देशातील 11.82 कोटी शेतकर्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. माध्यमांच्या वृत्तानुसार, पंतप्रधान पीएम किसनचा नववा हप्ता ऑगस्ट महिन्यात शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग करण्यात येईल.
पीएम किसान सन्मान योजनेत सरकारी कर्मचारी किंवा प्राप्तिकर भरणारे शेतकरी पात्र मानले जात नाहीत. याशिवाय दहा हजार रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळणारे डॉक्टर, अभियंता, सीए आणि कर्मचारीही पीएम किसान योजनेचा लाभ घेऊ शकत नाहीत. खासदार आणि आमदारांनाही पंतप्रधान किसान योजनेचा लाभ मिळत नाही. आतापर्यंत देशातील 11.82 कोटी शेतकर्यांना या योजनेचा लाभ मिळाला आहे. केंद्र सरकारने असे म्हटले आहे की वार्षिक 6 हजार रुपये त्याच शेतकर्यांच्या खात्यात वर्ग केले जातील, ज्याच्या नावावर शेती असेल.
इतर बातम्या:
PM Kisan: 10.90 कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात 1 लाख 37 हजार कोटी वर्ग, केंद्रीय कृषीमंत्र्यांची माहिती
PM Kisan: पीएम किसान सन्मान योजनेच्या 8 व्या हप्त्याची रक्कम मिळाली नाही? एक फोनवर 2 हजार मिळवा
PM Kisan Yojana farmers one mistake will stop the installment of PM Kisan improve this way