मुंबई : देशात (FPO) शेतकरी उत्पादक कंपन्यांचे जाळे दिवसेंदिवस वाढत आहेत. शेतकऱ्यांची एकजूट काय असते हे यामधून समोर येत आहे. यामुळेच नववर्षाचे मुहूर्त साधत शेतकरी उत्पादक कंपन्याना प्रोत्साहन देण्यासाठी 1 लाख 24 हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर 14 कोटी रुपये वर्ग करण्यात आले आहेत. शेतकरी उत्पादक कंपन्यामुळे शेती व्यवसयाचे स्वरुप हे बदलत आहे. समूह (Farmiong) शेतीमुळे शेतकऱ्यांचा सर्वांगिण विकास होत असून पीक लागवडीपासून ते बाजारपेठपर्यंत सर्वकाही या कंपन्यांच्या माध्यमातून होत आहे. पीएम किसान सन्मान निधीचा 10 हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करीत असताना (PM) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी उत्पादक कंपन्यांचे महत्व तर पटवून सांगितलेच पण या कंपन्यांची 5 बलस्थाने काय आहेत याचीही माहिती दिली.
एकट्याने शेतामध्ये परीश्रम करणे आणि समूहाच्या माध्यमातून नियोजनातून शेती करणे यामध्ये मोठा फरक आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे संगठन कायम राहते यामुळे शेतीमालाचे मूल्य ठरवता येते हा पहिला आणि सर्वात महत्वाचा फायदा आहे. तर शेतकरी कंपन्यामुळे मोठ्या स्तरावर व्यापार करणे सहज शक्य होते. प्रत्येक शेतकऱ्याला हे शक्य नाही म्हणून जेवढा मोठा व्यापार तेवढाच अधिकचा फायदा कंपनीच्या माध्यमातून होणार आहे.
तिसरी मोठी बाजू म्हणजे इनोवेशन, शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या कल्पना मांडता येतात. यामधून सर्वाच्या हीताचा योग्य निर्णय घेणे सहज शक्य होते. यामधून कमी धोका होतो. शेतकरी कंपन्यांचा चौथा मोठा फायदा म्हणजे रिस्क घेण्याची तयारी. एकटा शेतकरी दे धाडस करु शकत नाही ते समूह शेतीमध्ये शक्य आहे. त्यामुळे उत्पादनात वाढ होते. नवी धोरणे स्विकारताना कोणत्या अडचणी येणार नाहीत
तर पाचवा फायदा हा बाजारभावाचा होत आहे. शेतकरी कंपनी शेतीमालाचे दर ठरवते तेच दर बाजारपेठेत आहेत. याचा सर्वाधिक फायदा होत आहे. सर्वसामान्य शेतकऱ्यास बाजारपेठेची गणिते मांडणे तसे कठीण पण उत्पादक कंपन्यामध्ये शक्य आहे. त्यामुळे बदलत्या बाजारपेठेचा देखील फायदा होतो. ही 5 बलस्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेली आहेत.
शेतकरी उत्पादक कंपनीच एक प्रकारची बाजारपेठ आहे. यामधील सदस्यांनीच शेतीमालाचे बाजारभाव ठरवले तर शेतकऱ्यांनाच अधिकचा फायदा होणार आहे. कोणी मध्यस्तीच शेतकरी आणि बाजारपेठेत राहणार नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनातही वाढ होणार आहे. त्यामुळेच शेतकरी उत्पादक कंपन्याच निर्माण करण्यावर सरकारचा भर असल्याचे पंतप्रधान मोदींनी स्पष्ट केले आहे.