सांगली : खरीप हंगामातील सोयाबीनपासून सुरु झालेली परंपरा आता (orchard farmers) फळबागायतदार शेतकरीही सुरुच ठेवत आहेत. सोयाबीनलाही हंगामाच्या सुरवातीपासून दर नसल्याने साठवणुकीवर भर दिला होता. त्यानंतर (Cotton) कापसालाही समाधानकारक दर मिळत नाही तोपर्यंत साठवणूकच करण्याचा निर्धार खानदेशातील शेतकऱ्यांनी केला आहे. आता (Pomegranate also arrives in the market) डाळिंबचीही बाजारात आवक सुरु झाली आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत डाळिंबाला दर कमी असल्याने साठवणूकीवरच भर दिला जात आहे. त्यामुळे ठोक बाजारात मागणी असतानाही डाळिंब मिळत नाहीत अशी स्थिती झाली आहे.
डाळिंब पिकावर नैसर्गिक आपत्ती, रोगाचा प्रादुर्भावामुळे संकट आले आहे. सुमारे 70 ते 80 टक्के बागांचे नुकसान झाले असून, त्यातूनही प्रतिकूल परिस्थितीतून शेतकऱ्यांनी डाळिंबाच्या बागा जोपासल्या आहेत. दिवाळीनंतर मृग हंगामातील डाळिंबाची काढणी सुरू झाली आहे. सध्या डाळिंबाला प्रति किलोस 130 ते 140 रुपये असा दर मिळत आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत हा दर कमीच आहे.
पावसामुळे केवळ खरीप पिकांचेच नुकसान झाले असे नाही तर अतिवृष्टीचा परिणाम फळबागांवरही झाला होता. शिवाय तेलकट रोग आणि पिन होल बोअर या रोगाचा मोठा प्रादुर्भाव झाला. त्यामुळे डाळिंबाच्या बागाच्या बागा उद्ध्वस्त झाल्या. सध्या महाराष्ट्रसह इतर राज्यांत एक ते दोन टक्के क्षेत्रावरील डाळिंबाची काढणी शेतकऱ्यांनी सुरू केली आहे. डाळिंबाच्या खरेदीसाठी व्यापारी डाळिंब पट्ट्यात दाखल होऊ लागले आहेत. सध्या बाजारात डाळिंबाची आवक जरी कमी असली, तरी दर टिकून आहेत. डाळिंब काढण्याची गती महिनाअखेर वाढेल अशी शक्यता आहे.
आता कुठे डाळिंब बाजारात दाखल होत आहे. मात्र, दर कमी असल्याने आहे तो माल साठवणुकीवर भर दिला आहे. हंगामाच्या सुरवातीलाच दर कमी मिळाला तर झालेला खर्चही काढणे मुश्किल होणार आहे. त्यामुळे फळबागायत शेतकरी काळजीपूर्वक पावले टाकत आहे. आगामी महिन्यात देशातून डाळिंबाची निर्यात सुरु होते. त्या दरम्यान दर वाढतील अशी आशा आहे. त्यामुळेच गडबड न करता साठवणूक केली जात आहे. यंदाच्या मृग बहर धरल्यानंतर सुरुवातीच्या काळात डाळिंबाला पोषक असे वातावरण होते. त्यामुळे यंदाचा डाळिंब हंगाम चांगला जाईल, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र यंदा देखील अतिवृष्टीचा फटका डाळिंबाला बसल्याने शेतकऱ्यांच्या आशेवर पाणी फिरले.
सध्या व्यापारी हे दर पाडून डाळिंबाची मागणी करीत आहेत. नव्यानेच माल बाजारात आल्याने नेमका दराचा अंदाज बांधता येत नाही. त्यामुळे पाडून मागणी होत आहे. सध्या डाळिंबाला 110 ते 120 किलोने मागणी होत असली तरी भविष्यात दर वाढतील अशी अपेक्षा उत्पादकांना आहे. त्यामुळे विक्रीची गडबड न करता साठवणूकीवर भर दिला जात आहे.
कृषीपंपाचे नुकसान टाळण्यासाठी ‘हे’ आहेत पर्याय, शेतकऱ्यांसाठी महत्वाचे
पुन्हा पावसाचा अंदाज, रब्बीसह खरिपातील पिकांची ‘अशी’ घ्या काळजी..!
शेत रस्त्यांसाठी आता पानंद योजनेतून अनुदानही जाहीर, लवकरच मिटणार शिवार रस्त्यांचा प्रश्न