नंदुरबार : शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यात (Central Government) केंद्र आणि राज्य सरकार हे अपयशी ठरले आहेत पण देशातील एफआरपी च्या दरापेक्षा जास्त दर देणाऱ्या साखर कारखान्यांना आयकर विभागाकडून देण्यात येणाऱ्या नोटीस संदर्भात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे त्यांनी स्वागत (Raju Shetti) राजू शेट्टी यांनी केले आहे. तर दुसरीकडे एफआरपी चे तीन तुकडे आणि सध्या सुरु असेलेली वीज तोडणी यावरुन राज्य सरकारवर निशाना साधलेला आहे. (Sugarcane Council,) वेळप्रसंगी कायदा हातामध्ये घेऊ पण शेतकऱ्यांच्या प्रश्नी लढा कायम असल्याचेही त्यांनी नंदुरबार येथील ऊस परिषदेमध्ये सांगितले आहे.
नैसर्गिक संकटाने शेतकरी त्रस्त आहे. खरीप हंगामाचे मोठे नुकसान झाले अजूनही पंचनामेच करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या मदतीच्या दरम्यान केंद्र सरकारनेही सापत वागणूक दिली असल्याचे ते म्हणाले आहेत. नंदुरबार येथे ऊस परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी शेतकऱ्यांचे विविध प्रश्न उपस्थित करीत सरकारवर टीकास्त्र सोडले.
एफआरपी बाबात केंद्र सरकारने राज्य सरकारला प्रस्ताव पाठवला असून राज्यांकडून मत मागवले आहे. पण एफआरपी चे तीन तुकडे कोणत्याही परस्थितीमध्ये होऊ दिले जाणार नाहीत. यामध्ये शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. तसेच राज्य आणि केंद्र सरकार मध्ये समन्वयाचा अभाव असल्याने जास्तीचा भाव देणाऱ्या साखर कारखान्यांना आयकर विभागाकडून नोटीस दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना जास्तीचा भाव मिळत नव्हता. आता केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शहा यांनी घेतलेल्या निर्णयामुळे आता शेतकऱ्यांचा फायदा होईल मात्र या निर्णयाची अंमलबजावणी त्वरित व्हावी अशी अपेक्षा राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असून या सरकारमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांमध्ये कुरघोडीचे राजकारण सुरु आहे. ऊर्जा खाते हे काँग्रेसच्या कडे असल्याने ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी पूर्व परिस्थितीची पाहणी करताना वीज जोडणी तोडली जाणार नाही असे आश्वासन दिले होते आता अचानक वीज जोडणी तोडली जात आहे. अर्थ विभाग त्याला परवानगी का देत नाही असा प्रश्न आहे. त्यामुळे या दोल पक्षांच्या कुरघोडीत मात्र शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे..
नैसर्गिक संकटामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. अद्यापही नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झालेली नाही. रब्बीचा हंगाम तोंडावर आहे शिवाय दिवाळी सणही आहे. मात्र, राज्यातील या चारही पक्षांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांपेक्षा आर्यन खानचा मुद्दा अधिक महत्वाचा वाटत आहे. केंद्र आणि राज्य सरकारकडून यंत्रणांचा अति वापर होत असून हे राज्यासाठी चांगले नसून यंत्रणा ह्या कार्यकर्त्या सारख्या वागू लागले असल्याचा टोला राजू शेट्टी यांनी ऊस परिषदेच्या दरम्यान लगावला आहे. (FRP Varul praises central government while Raju Shetty’s criticism of state government)
ठरलं तर मग, दर मिळाल्याशिवाय सोयाबीनची विक्री नाही, आवक निम्म्याने घटली
पेरणीपूर्वी बीजप्रक्रियेमुळे उत्पादनात वाढ अन् रोगराईलाही प्रतिबंध