नवी दिल्ली: अफगाणिस्तानमध्ये तालिबानी राजवट आल्यानंतर जागतिक बाजारपेठेत केशराचा भाव गगनाला भिडला आहे. काही महिन्यांपूर्वी प्रतिकिलो केशराची किंमत साधारण 1.4 लाख रुपयांपर्यंत होती. ती आता 2.25 लाख रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे. केशर उत्पादन आणि निर्यातीच्या बाबतीत अफगाणिस्तान हा भारत आणि इराणनंतर तिसरा मोठा देश आहे. मात्र, सध्या अफगाणिस्तानातील व्यापार ठप्प झाल्याने जागतिक बाजारपेठेत केशराचा तुटवडा जाणवत आहे.
जम्मू-काश्मीरच्या चार जिल्ह्यांत केशराची लागवड होते. पुलवामा, बडगाम, श्रीनगर आणि किश्तवाड, पुलवामा जिल्ह्यातील पंपूर हे उत्तम दर्जाचे केशर पिकवण्यासाठी ओळखले जाते. काश्मीर खोऱ्यात 12 मेट्रिक टन केशर तयार होते. जे अन्न, परफ्यूम, रंग आणि औषधे इत्यादींसाठी वापरले जाते.
अमेरिका, बेल्जियम, न्यूझीलंड, कॅनडा आणि आखाती देशांमध्ये भारतीय केशराची सर्वाधिक निर्यात केली जाते. जिल्ह्यातील पंपोर येथे राहणारे व्यापारी जुनैद रिगो यांनी टीव्ही 9 हिंदीला सांगितले की, केशराची किंमत 2.25 लाख रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचली आहे. किंमत सतत वाढत आहे. जर अफगाणिस्तानमधील परिस्थिती लवकरच बदलली नाही आणि तेथे निर्यात सुरू झाली नाही तर किंमत आणखी वाढू शकते. त्यामुळे सध्या व्यापारी आणि शेतकरी म्हणून आम्ही नफ्यात आहोत.
जम्मू -काश्मीरमध्ये केशराचे उत्पादनही गेल्या वर्षांमध्ये लक्षणीय वाढले आहे. यामध्ये राष्ट्रीय केशर मिशनची यात महत्त्वाची भूमिका आहे. यापूर्वी प्रति हेक्टर फक्त 1.8 किलो केशर उत्पादन होते, जे आता वाढून सुमारे 4.5 किलो प्रति हेक्टर झाले आहे. काश्मीर खोऱ्यातील केशर आणि सुकामेव्याला देशांतर्गत बाजारपेठे अवघी 10 टक्के इतकी आहे. देशांतर्गत केशराची मागणी ही अफगाणिस्तान आणि इराणमधून आयात केलेल्या साठ्यातून पूर्ण केली जाते.
केशराच्या लागवडीत अफगाणिस्तान सातत्याने प्रगती करत आहे. 2010 पासून तेथे केशराची लागवड केली जात आहे. हा देश भारत आणि इराण नंतर जगातील तिसरा सर्वात मोठा उत्पादक देश आहे.
लाल सोनं म्हणून प्रसिद्ध असलेल्या केशराची लागवड मे महिन्यात सुरू होते आणि ऑक्टोबरपर्यंत पीक तयार होते. भारतात सुमारे 5,000 हेक्टरमध्ये लागवड केली जाते. जम्मू -काश्मीर कृषी विभागाच्या माहितीनुसार राज्यात दरवर्षी सरासरी 17 मेट्रिक टन (170 क्विंटल) केशराचे उत्पादन होते. 160,000 फुलांमधून सुमारे एक किलो केशर येते आणि राज्यातील 16,000 शेतकरी कुटुंबे त्याच्या लागवडीशी संबंधित आहेत. सध्या राज्यात सुमारे 3,700 हेक्टरमध्ये केशराची लागवड केली जात आहे आणि सुमारे 32,000 शेतकरी त्याच्याशी संबंधित आहेत.
संबंधित बातम्या:
भारत-अफगाणिस्तान व्यापार ठप्प, आयात-निर्यातीसाठी बंदी; तालिबानचा फतवा