मुंबई : निसर्गाच्या लहरीपणाचा (The Vagaries of Nature) सर्वाधिक परिणाम हा शेती पीकावर होत आहे. दीड महिन्यापूर्वीच पावसाने टोमॅटोची तोडणीही मुश्किल झाली होती. आता त्याच टोमॅटोचे दर (Tomato Rate) गगणाला भिडलेले पाहवयास मिळत आहे. महिन्याभरापूर्वी हेच टोमॅटो शेतामध्ये सडत होते. पाऊस आणि बाजारात कवडीमोल किमंत यामुळे (Farmer) शेतकरी तोडणीही करीत नव्हता. आता याच टोमॅटोला 50 ते 60 रुपये किलोचा दर मिळत आहे. त्यामुळे वाढत्या दराने टोमॅटो हे लाल झाले आहेत तर ऐन सणात दर वाढल्याने टोमॅटो सर्वसामान्यांच्या आहारातून गायब आहे.
बाजारात टोमॅटोची किंमत (Tomato Price) 80 रुपये किलोवर पोहोचली आहे. ठोक बाजारात टोमॅटोच्या एका कॅरेटची किमंत ही 1100 वर गेली आहे. म्हणजेच या बाजारात टोमॅटोला 55 ते 60 रुपये किलोचा दर मिळालेला आहे. तर किरकोळ बाजारता विक्रेत्यांची चांदी होत आहे. 55 रुपये किलोप्रमाणे घेतलेले टोमॅटो हे 80 ते 90 रुपये किलोने विकले जात आहेत.
महागडे टोमॅटो चा फायदा शेतकऱ्यांना होत असेल तर इतर गोष्टींचे दरही वाढत असल्याचे ग्राहकांचे म्हणणे आहे. गेल्या काही दिवसांपासून टोमॅटोच्या किमंती ह्या वाढलेल्या आहेत. मागणीच्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने ही परस्थिती निर्माण झाल्याचे मत विक्रेत्यांचे आहे. तर सध्या सणासुदाचे दिवस असून अशीच परस्थिती राहिली तर दर अणखिण वाढतील असा अंदाज वर्तवला जात आहे. मध्य प्रदेशात शाजापूर, कलापीपल, शुजलपूर, रायझन, सेहोरे, शिवपुरी, कोलारस, बक्त्रा, पोरी आणि दातिया या भागांमध्ये टोमॅटो होतात. जास्त पाऊस पडल्यामुळे बहुतेक भागांचा टोमॅटो पिकावर नकारात्मक परिणाम झाला आहे.
टोमॅटोचे उत्पादन हे कमी कालावधीतील असले तरी यावर रोगराईचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात राहतो. त्यामुळे लागवडीपासूनच योग्य ती काळजी घ्यावी लागत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणने आहे. पावसाचा परिणाम त्यात रोगराई यामुळे उत्पादन हे कमी झाले आहे. आता बाजारात मागणी वाढत असल्याने दरही वाढत आहेत. सरासरीपेक्षा केवळ 25 टक्के पीक शेतकऱ्यांच्या पदरी पडलेले आहे.मागणी आणि पुरवठा यामध्ये मोठ्या प्रमाणात तफावत आहे.
गेल्या वर्षी टोमॅटो लागवडीचा (Tomato Farming) खर्च एकरी एक लाख रुपये होता, तो आता सुमारे दोन लाख रुपयांपर्यंत वाढला असल्याचे मत शेतकऱ्यांचे आहे. गेल्या वर्षी एकरी सुमारे 50 कॅरेट टोमॅटो तयार झाले होते. तर यंदा निसर्गाचा लहरीपणा आणि रोगराई यामुळे एकरी 10 ते 15 कॅरेटचे उत्पादन झाले आहे. त्यामुळे पुरवठा योग्य प्रमाणात नसल्याने काही शेतकऱ्यांना लाखोंचा फायदा होत आहे. तर बाजारातील विक्रेते यांनाही अधिकचे पैसे मिळत आहेत. टोमॅटो लागवडीचा खर्च वाढला आहे. मध्यप्रदेशातील शिवपुरी येथील टोमॅटो कानपूर, लखनौ आणि उत्तर प्रदेशच्या विविध भागात पाठविला जात आहे. (Prices rise as tomato arrivals fall, farmers satisfied)
एकीकडे खुल्या बाजाराचे पाऊल, दुसरीकडे तेलबियांच्या साठा मर्यादेचा निर्णय
सोयाबीनच्या भावात तीन दिवसांमध्ये तीनशे रुपयांची घसरण, केंद्राच्या निर्णयाचा परिणाम शेतकऱ्यांवर
भौगोलिक मानांकनात महाराष्ट्र अव्वलस्थानी, मानांकन वापरकर्तासाठी कसा करायचा अर्ज ?