मुंबई : सर्वसामान्य जनतेला दिलासा देण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने खाद्य तेलावरील आयाशुल्क (Import duty on edible oil) हे कमी केले होते. त्यामुळे किमान 5 ते 10 रुपयांनी दर कमी होतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. मात्र, बाजारपेठेतले चित्र हे वेगळे आहे. (Increase in food prices) खाद्य तेलाचे दर कमी होण्याएवजी वाढत आहेत. ऐन सणासुदीमध्ये दर वाढत असल्याने सर्वसामान्य जनतेला महागाईला सामोरे जावे लागणार आहे. सर्वच तेलांच्या दरात 5 ते 10 रुपयांनी वाढ झालेली आहे.
गतवर्षीच्या तुलनेत यंदा देशातील तेलबियाणांचे उत्पादन घटेल असा अंदाजच केंद्रीय कृषी मंत्रालयाने व्यक्त केला होता. त्यामुळे भविष्यात खाद्यतेलाचे दर हे वाढणारच होते. पण याची तीव्र झळ सर्वसामान्य ग्राहकांना बसू नये म्हणून खाद्यतेलावरील आयात शुल्क हे कमी केले होते. कारण गेल्या काही दिवसांपासून तेलाचे दर हे वाढतच असल्याने किमान ऐन सणासुदीत जनतेला सरासरीच्या किमतीने खाद्य तेल दर व्हावेत हा त्यामागचा हेतू होता.
पण दिवाळी, दसरा या सणाच्या तोंडावरच दर हे वाढू लागले आहेत. गेल्या वर्षीही दिवाळी सणामध्येच तेलाचे आणि डाळीचे दर हे वाढले होते. मध्यंतरी 200 किलोवर गेलेले दर कमी होण्यास सुरवात झाली होती पण आता पुन्हा तेलाच्या दरात 5 ते 10 रुपयांनी वाढ होत आहे. पामतेलाचे दर हे 5 रुपयांनी आणि इतर तेलाचे दर हे 4 रुपयांनी कमी होण्याच्या उद्देशाने आयातशुल्क ही कमी कण्यात आली होती.
दिवाळी, दसरा हे सण काही दिवसावर येऊन ठेपले आहेत. त्यामुळे खाद्य तेलाची खरेदी ही करावीच लागणार आहे. पण सोयाबीन, शेंगदाणा, तीळ, पामतेल आणि सुर्यफूल तेलाच्या दरात वाढ झाली आहे. या सर्वच तेलाच्या दरात 5 ते 10 रुपयांनी वाढ झालेली आहे. शिवाय अणखीन दर वाढण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून व्यक्त होत आहे.
सोयाबीनच्या दरामध्ये कमालीची घट झाली आहे. हंगामाच्या सुरवातीला 8600 रुपये क्विंटलचा दर हा मिळालेला होता. मात्र, अवघ्या काही दिवसांमध्ये सोयाबीनची आवक वाढताच दर हे निम्म्याने कमी झाले होते. सध्याही सोयाबीनच्या दरात चढ-उतार हा सुरु आहे. सोयाबीनचे दर कमी होऊनही सोयाबीन तेलाचे दर हे वाढतच असल्याने रोष व्यक्त होत आहे. सोयाबीन तेलात 5 रुपयांनी वाढ झालेली आहे. शिवाय केंद्र सरकारने सोयापेंडच्या आयातीला परवानगी दिली असूनही तेलाच्या दरात वाढ ही होत आहे. (Prices rise despite reducing import duty on edible oil, consumer anger)
जून सप्टेंबर
शेंगदाणा 150 155
सूर्यफूल 140 150
सोयाबीन 130 140
पामतेल 125 130
एकरकमी एफ.आर.पी साठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा अनोखा ‘फंडा’
उभा कापूस आडवा, सोयाबीनला कोंब फुटले ; शेतकऱ्यांचे डोळे सरकारच्या मदतीकडे