लातूर : यंदा पोषक वातावरणामुळे ऊसाचे (Sludge season) गाळप मोठ्या प्रमाणात सुरु आहे. शिवाय विक्रमी उलाढालही होणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांचे प्रश्न हे वेगळेच आहे. पश्चिम महाराष्ट्राप्रमाणे ऊसाचे क्षेत्र हे वाढलेले आहे. पण आता हंगाम जोमात असतानाच शेतकऱ्यांना वेठीस धरण्याचा प्रयत्न ऊस टोळींकडून केला जात आहे. ( sugarcane harvesting) ऊसतोडणीला विलंब केला जात आहे तर शेतकऱ्यांची अडवणूक करुन तोडीसाठी अधिकच्या पैशाची मागणी केली जात आहे. वरिष्ठ पातळीवर कारखान्यांकडून एफआरपी रक्कम थकीत ठेऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली जात आहे तर दुसरीकडे स्थानिक पातळीवर कारखान्याचाच एक भाग असलेल्या ऊसतोड टोळींकडून अशी अडवणूक केली जात आहे.
यंदा अधिकच्या पावसामुळे पाणी ऊसाच्या फडातच साचून राहिलेले आहे. त्यामुळे आगोदरच उत्पादनात घट होत असताना आता स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांची अडवणूक होत आहे. मराठवाड्यातील उस्मानाबाद, लातूर जिल्ह्यात अनेक ठिकाणी अशाप्रकारे अडवणूक होत असल्याने फडामध्येच ऊसाला तुरे येत आहेत. त्यामुळे उत्पादनात घटीचा धोका निर्माण झाला आहे. कारखान्यांकडून उचल घेऊनही ऊसतोड टोळ्यांकडून शेतकऱ्यांची अशाप्रकारे अडवणूक केली जात आहे. त्यामुळे वेळेत ऊसाचे गाळप होत नाही आणि उतारही मिळत नाही. त्यामुळे ऊस तोडणीची व्यवस्था संबंधित कारखान्यांनी करणे गरजेचे आहे.
लागवडीपासून ऊसाची योग्य जोपासना केली तर ऊस 10 ते 11 महिन्यांमध्ये गाळपायोग्य होतो. त्यानुसारच शेतकऱ्यांनी नियोजन केले होते. मात्र, मध्यंतरी झालेल्या पावसामुळे तोडणीला विलंब झाला होता. मात्र, त्यानंतर का होईना वेळेत ऊसाचे गाळप होईल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, आता ऊसतोड टोळीच्या वेगवेगळ्या मान्य करुन शेतकरी त्रस्त आहे, ऊसाला कोयता लागेपर्यंत सर्वकाही अलबेल असल्याचा दावा शेतकरी करीत आहेत.
ऊस हे सर्वात मोठे नगदी पीक आहे. या उत्पादनातून शेतकऱ्यांची मिळगत वाढते पण निसर्गाच्या लहरीपणाचा कायम फटका कृषी उत्पादकांना बसलेला आहे. आता वेळेत तोडच होत नसल्याने ऊस वाळत आहे शिवाय त्याला तुराला लागलेला आहे. त्यामुळे आता तोड झाली तरी त्याचा दरावर परिणाम होणारच आहे. त्यामुळे कारखान्यांनी ऊसतोडीचे योग्य नियोजन केले तर शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही.
नाशिक पाठोपाठ सांगली द्राक्ष बागायतदारांचा महत्वाचा निर्णय, काय आहे द्राक्ष दर निश्चितीचे धोरण?