नवी दिल्ली : शेतकऱ्यांना आवळ्याच्या शेतीतून मोठी कमाई करण्याची संधी आहे. कृषी तज्ज्ञांनी याबाबत काही महत्त्वाचे सल्ले दिले आहेत. त्यांचं पालन करण्यास शेतकरी चांगलं उत्पादन मिळवू शकतात. भारतात आवळ्याची शेती थंडी आणि उन्हाळा अशा दोन्ही ऋतूत करता येते. कारण पूर्ण वाढ झालेलं आवळ्याचं झाड 0 ते 46 डिग्री सेल्सीअसपर्यंतचं तापमान सहन करतं. गरम वातावरणात आवळ्याचा बहर यायला पोषक वातावरण आहे. जुलै ते ऑगस्ट या काळात ओलसर उबट वातावरण असल्यानं या काळात छोट्या फळांच्या वाढीला पोषक वातावरण मिळतं (Profitable Amla farming in India know important tips how to earn lakhs of rupees).
1. फळ तज्ज्ञ डॉक्टर एस. के. सिंह म्हणतात, “आवळ्याची शेती सर्व प्रकारच्या मातीत करता येते. आवळ्याची झाडं लावण्यासाठी 10 फूट x 10 फूट किंवा 10 फूट x 15 फूट जागेवर 1 घनमीटर आकाराचा खड्डा खोदणं आवश्यक असतं.
2. खड्डा 15-20 दिवस उन्हात तापू द्यावा. त्यानंतर त्यात 20 किलोग्रॅम गांडुळ खत, 1-2 किलोग्रॅम निंबोळी खत आणि 500 ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर टाका. खड्डा भरताना 70 ते 125 ग्रॅम क्लोरोपाईरीफास डस्ट देखील टाका. मे महिन्यात या खड्ड्यांमध्ये पाणी सोडा. यानंतर 15-20 दिवसांनी या खड्ड्यात झाड लावा.
3. नरेंद्र देव कृषी विद्यापीठ, फैजाबादने आवळ्याच्या अनेक प्रजाती विकसित केल्यात. या झाडांना आवळ्याचं उत्पादन अधिक होऊन शेतकऱ्यांना फायदा होतो. यात नरेंद्र आणि कचंव कृष्णा सर्वाधिक लोकप्रिय आहेत. आवळ्यात परागकण असतात. त्यामुळे अधिक उत्पादनासाठी 2: 2: 1 प्रमाणात कमीत कमी 3 आवळ्याचे प्रकार लावावे. उदाहरणार्थ एक एकरमध्ये नरेंद्र-7 चे 80 झाडं, कृष्णाचे 80 आणि कंचनचे 40 झाडं लावावेत.
4. एका वर्षानंतर झाडांना 5-10 किलोग्रॅम शेणखत, 100 ग्रॅम नायट्रोजन, 50 ग्रॅम फास्फोरस आणि 80 ग्रॅम पोटॅश द्यायला हवे. पुढील 10 वर्षांपर्यंत झाडाच्या वयाला गुणिले करुन खत टाकावं. अशाप्रकारे दहाव्या वर्षी 50-100 क्विंटल शेणखत, 1 किलोग्रॅम नायट्रोजन, 500 ग्रॅम फॉस्फरस आणि 800 ग्रॅम पॉटेश प्रती झाड द्यावं.
5. झाड लावल्यानंतर लगेच पाणी द्यायला हवं. त्यानंतर उन्हाळ्यात आवश्यकतेनुसार 7-10 दिवसांनी पाणी द्यावं. झाडाला फुलं (मोहर) आला की पाणी देणं बंद करावं.
6. आवळ्याचं कलम झाड तिसऱ्या वर्षी तर साधं रोप लागवडीनंतर 6-8 वर्षांनी फळ देतं. चांगली काळजी घेतली तर एक झाड 50 ते 60 वर्षे फळ देते. एक पूर्ण विकसित आवळ्याचं झाड 1-3 क्विंटल फळ देते. अशाप्रकारे 15 ते 20 टन प्रती हेक्टर उत्पादन होते. यातून लाखोंची कमाई होते.