मुंबई : ऊस हे नगदी पीक आहे. महाराष्ट्रासह इतर अनेक राज्यांध्ये ऊसाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. यामुळे साखर निर्यातीमध्ये भारत हा दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. दिवसेंदिवस ऊसाच्या क्षेत्रामध्ये वाढ होत आहे. पण त्या तुलनेत उत्पादन वाढत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी नेमके गणित चुकते कुठे याचा विचार करायला हवा. जर योग्य पध्दतीने पेरलेच नाही तर उगवणार कसे असा प्रश्न आहे. नेमके ऊसाच्या बाबतीमध्ये हेच होताना पाहवयास मिळत आहे.
ऊसाच्या बेण्याची लागवडच योग्य प्रकारे होत नसल्याने अपेक्षित उत्पादन हे मिळत नाही. त्यामुळे लागवड करतानाच योग्य काळजी घेण्यात आली तर त्याचा अधिकचा फायदा होणार आहे. शेतकरी किरकोळ चुका करतात आणि त्याचे परिणाम भोगावे लागतात. योग्य पध्दतीने लागवड केली तर उत्पादनही वाढते आणि लादवडीसाठी खर्चही कमी येतो. तर जाणू घेऊ योग्य प्रकारे ऊसाची लागवड करायची कशी..
आजही सरी काढून ऊसाची लागवड (Sugarcane cultivation, ) केली जाते. अगदी त्याप्रमाणेच सरी काढून ऊसाची लागवड करायची आहे पण केवळ ऊसाकरिता जमिनीचा दर्जा चांगला पाहिजे आणि सुपिक जमिनीचा अधिक परिणाम हा (sugarcane production,) उत्पादनावर होत असतो. त्यामुळे अशाच जमिनीची निवड शेतकऱ्यांना करावी लागणार आहे. लागवडी दरम्यान ऊसाचे बियाणे हे शेतजमिनीच्या वरच्याच बाजूस राहिले तर वाळव्या लागण्याचा धोका असतो. त्यामुळे लागवडीपूर्वीच किटकनाशकाची फवारणी ऊसाच्या बेण्यावर करणे आवश्यक आहे. ऊसाचे बेणे हे जमिनीच्यावरच्याच बाजूस राहणार नाही याची काळजी शेतकऱ्यांनी घेणे गरजेचे आहे. सपाट जमिनीपासून योग्य त्या खोलीवर बेणे झाकणे आवश्यक आहे. तर चांगल्या प्रतिच्या जमिनीवर 90 सेंमी अंतरावर लागवड करावी आणि जमिन जर हलक्या प्रतिची असेल तर 75 सेंमी लागवड करणे फायदेशीर राहणार आहे.
ऊसाची लागवड केल्यानंतर तिसऱ्या आठवड्यात ऊसाला पाणी देणे आवश्यक आहे. पण कमी प्रमाणात पाणी दिल्यास बेण्याच्या वरचा जमिनीचा पापुद्रा हा निघून जाईल आणि ऊस उगवण्यास अधिकचा फायदा होणार आहे. चिकट माती असेल तर त्या भागात ऊसाची योग्य प्रमाणात लागवड होत नाही. त्यामुळे सुकी माती आणून त्या क्षेत्रातली लागवड करणे आवश्यक आहे. ज्या भागातून बेण्याचे डोळे बाहेर आहेत तोच भाग वरी करून लागवड करावी लागणार आहे. त्याचा फायदा हा ऊस वाढीसाठी होणार आहे. ऊसाची उगवण क्षमता वाढत नाही तोपर्यंत कमी प्रमाणात पाणी द्यावे लगणार आहे. ऊसाला अधिकच्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असली तरी उगवण होण्यापूर्वी योग्य ती काळजी ही घ्यावीच लागणार आहे.
महाराष्ट्रातही मोठ्या प्रमाणात ऊसाचे उत्पादन घेतले जाते. सिंचनाची व्यवस्था होत असल्याने दिवसेंदिवस ऊसाचे क्षेत्र हे वाढत आहे. शेतकरी पारंपारिक पीकाकडे दुर्लक्ष करीत नगदी पीकावर भर देत आहे. मात्र, आजही राज्याच सरी काढूनच ऊसाची लागवड केली जाते. ही पध्दत योग्य असली तरी ऊसाला अनियमित वेळी पाणी दिल्याने त्याची उगवण योग्य पध्दतीने होत नाही. जर उगवणच चांगली झाली नाही तर भविष्यात उत्पादनावर परिणाम हा होणारच. त्यामुळे उगवण होण्यासाठी योग्य लागवड आणि उगवण होण्यापुर्वी कमी प्रमाणात पाणी दिले तर ऊसाची वाढ ही झपाट्याने होणार आहे.
लागवडीच्या दरम्यान चुकीच्या पध्दतीचा अवलंब केला तर योग्य प्रकारे ऊसाची उगवण होणार नाही. त्यामुळे ऊसाच्या चार ते पाच अतिरीक्त सरी लावणे आवश्यक आहे. त्यामुळे ज्या ठिकणी उगवण झाली नाही त्या ठिकाणी हे बेणे उपयोगी पडते. ऊसाचे उत्पादन हे लागवडीवरच अवलंबून आहे. त्यामुळे विशिष्ट अंतर आणि पाण्याचे योग्य नियोजन महत्वाचे आहे. (Proper cultivation is important for increasing sugarcane production)
‘पांढऱ्या’ सोन्याची साठवणूक करा ; यंदा कापसाच्या दराच तेजी कायम राहणार
सोयाबीनची पुन्हा आवक घटली, पावसाने काढणी रखडली
‘ई-पीक पाहणी’ उरले फक्त 5 दिवस, नाही-नाही म्हणत शेतकऱ्यांनीही घेतले मनावर