जयवंत शिरतर, टीव्ही 9 मराठी जुन्नर, पुणे: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं राहणीमान उंचवावं, त्यांच्या आर्थिक उत्पन्नात भर पडावी म्हणून राज्य सरकार नेहमी प्रयत्न करतं. केंद्र सरकारनंही 2022 पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्याचं धोरण स्वीकारलं आहे. अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी राज्य सरकारकडून विविध योजना राबल्या जात आहेत. मान्सूनच्या पावसाची अनिश्चितता यामुळे शेतकरी फळबाग लागवडीकडं वळताना दिसत आहेत. पुणे जिल्ह्यातील जुन्नरच्या पूर्वपट्यातील गावामधे शेतकरी वर्गाकडून फळलागवड ला प्राधान्य दिले जात आहे. (Pune Junnar Farmers move to horticulture due to irregular monsoon rain)
मान्सून पावसाने ऐन पावसाळ्यात काही भागात दडी मारलेली आहे.त्यामुळे सर्वसामान्य शेतकरी बागायती पिकाकडे शेती करण्याचा कल सध्यातरी कमी झाला आहे. शेतकऱ्यांनी बागायती आणि नगदी पिकांना पर्याय म्हणून फळलागवड करण्याकडे जास्त लक्ष केंद्रित करत आहेत.
राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून फळबागांना देण्यात येणाऱ्या अनुदानाचा फायदा शेतकरी वर्ग घेत आहे. राजुरी येथील संदिप चव्हाण या शेतक-याने आपल्या जमीन क्षेत्रात “केसर “या आंब्याची 100 रोपे नर्सरी मधून खरेदी करून त्याची लागवड केली आहे. हवामान खात्याचा वर्तवलेले पावसाचे अंदाज काही भागात प्रत्यक्षात न आल्यानं शेतकरी फळलागवड करण्यास सुरूवात केली आहे.
अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या मजबूत करण्यासाठी राज्य सरकारनं 2018-19 पासून भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना सुरु केलीय. या योजनेद्वारे शेतकऱ्यांना उत्पन्न मिळवून देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे किमान 20 गुंठे जमीन असणं आवश्यक आहे. तर, कोकणासाठी ही अट शिथील करण्यात आली असून तेथील शेतकऱ्यांना 10 गुंठे जमीन असली तरी या योजनेचा लाभ दिला जातो. कोकणातील कमाल जमीन धारणा मर्यादा 6 हेक्टर तर उर्वरित महाराष्ट्रासाठी ही मर्यादा 10 हेक्टर पर्यंत आहे. योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्याला उपलब्ध क्षेत्रात एकापेक्षा जास्त फळपिकांची लागवड करता येते. राज्य शासनाच्या इतर फळबाग योजनेंचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांना या योजनेला लाभ घेता येत नाही.
वैयक्तिक शेतकरी भाऊसाहेब फुंडकर फळबाग योजनेसाठी अर्ज करु शकेल. शेतकऱ्याच्या नावावर 7/12 असणं आश्यक आहे. शेतकऱ्याचं कुटुंब केवळ शेतीवर अवलंबून असेल त्यांना प्रथम प्राधान्य दिलं जाते. अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती, अल्पव व अत्यल्प भूधारक, महिला आणि दिव्यांग व्यक्ती यांना या योजनेत प्राधान्य दिले जाते.
योजनेत समाविष्ट असलेली फळपिके
नारळ, काजू, पेरू, डाळींब, संत्रा, मोसंबी, कांदी लिंबू, सिताफळ, आवळा,चिंच, जांभूळ, फणस, अंजिर,चिकूस, आंबा, कोकम
LIVE : महत्त्वाच्या घडामोडी लाईव्ह https://t.co/cVbRgMVWEW
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 18, 2021
संबंधित बातम्या:
यवतमाळ येथे 25 लाखांचे परवानगी नसलेले बिटी बियाणे जप्त; पोलीस व कृषी विभागाची कारवाई
(Pune Junnar Farmers move to horticulture due to irregular monsoon rain)