पुणे: जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समिती नारायणगाव उपबाजारात आज दुपारी टोमॅटो लिलावात व्यापा-यानी टोमॅटोचे बाजारभाव पाडल्याने शेतकरी आक्रमक झाले. या प्रकारानंतर शेतकरी आणि व्यापारी यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. राष्ट्रवादीचे बाजार समितीचे सभापती अॅड.संजय काळे यांना संतप्त शेतक-यानी घेराव घातला. (Pune Junnar Narayangaon market committee farmers angry over low rate in auction of tomato)
आज सकाळी अकराचे दरम्यान उपबाजारात टोमॅटोचे लिलाव सुरू झालेनंतर टोमॅटो कॅरेटला प्रती 130 इतका बाजारभाव सुरू होता. मात्र नंतर अचानक उपबाजारातील काही टोमॅटो व्यापा-यानी टोमॅटोचे बाजारभाव खाली पाडून सदरचा प्रत्येक कॅरेट 50 रूपये इतका खरेदी बोली सुरू केली. त्यामुळे अचानक टोमॅटोचे बाजारभाव खाली कसे आले ? या गोधंळाने टोमॅटो शेतकरी अडचणीत आला.
टोमॅटोचे भाव अचानक पडल्यानं शेतकरी वर्गाने टोमॅटोचे लिलाव बंद पाडले. बाजार समितीचे सभापती संजय काळे जोपर्यंत येत नाहीत. हा प्रश्न सोडवत नाही तोपर्यंत बाजार सुरू करणार नाही, असा आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतला.
सभापती संजय काळे यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून टोमॅटो व्यापाऱ्यांना असले उद्योग खपवून घेतले जाणार नाहीत. अन्यथा लायसन्स रद्द केले जातील असा सज्जड दम भरला.तसेच असा प्रकार शेतक-याला कुठे दिसल्यास संबधित फसवणूक करणा-या व्यापा-याला फटकावले तरी काही हरकत नाही. पण शेतकरी वर्गाला त्याच्या उत्पन्नाचा योग्य बाजारभाव मिळाला पाहीजे असा आग्रह धरला. व जोपर्यंत टोमॅटोचे लिलाव होत नाहीत तोपर्यंत थांबून राहणार अशी भुमिका घेऊन शेतकरीवर्गाची बाजू घेत बाजार पूर्ववत सुरू केला.
नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचंच नाव द्या, प्रवीण दरेकरांकडून भाजपची भूमिका स्पष्ट#NaviNumbai #NaviMumbaiInternationalAirport #NMIA #BJP https://t.co/W2e56lcTeV
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 18, 2021
इतर बातम्या:
एकट्या महिलेवरती हल्ला करणं म्हणजे अस्मिता जोपासणं आहे का? चित्रा वाघ यांचा संजय राऊत यांना सवाल
(Pune Junnar Narayangaon market committee farmers angry over low rate in auction of tomato)