मुंबई: हिरव्या वटाण्याच्या शेंगा..डिसेंबर महिन्यात चौकाचौकातील गाड्यावर आणि भाजीमंडईत या शेंगा ग्राहकांचे लक्ष वेधू घेतात. आरोग्यासाठी फायदेशीर आणि चवदार वटाणा शेंगाच्या लागवडीसाठी यंदा पोषक वातावरण आहे. वटाण्याची लागवड ही ऐन थंडीच्या मोसमात केली जाते. वटाणा वाढीसाठी हेच पोषक वातावरण असून आर्थिक उत्पादनाच्या दृष्टीने वटाणा शेंगाची लागवड केली तर फायदेशीर राहणार आहे.
महाराष्ट्रात वटाण्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. याचा उपयोग जेवणात भाजी म्हणूनही केला जातो. वाटाण्यामध्ये कार्बो प्रोटीन्स तसेच फॉस्फरस, पोटॅशियम, मेग्निशियम हि खनिजे आणि अ, ब, व क जीवनसत्वे भरपूर प्रमाणात असतात.
वाटाणा हे थंड हवामानात वाढणारे पीक आहे. हे पीक सर्व प्रकारच्या जमिनीत घेता येत असले तरी हलक्या प्रतीच्या जमिनीत हे पीक लवकर येते. तर मध्यम भारी पण भुसभुशीत जमिनीत पीक तयार होण्यास जास्त कालावधी लागत या जमिनीतच उत्पादन जास्तीचे मिळते. पाण्याचा निचरा होणारी, भुसभुशीत, कसदार, रेतीमिश्रित जमीन फायदेशीर ठरते. उत्पादन वाढीसाठी पूर्वमशागत योग्य फध्दतीने करून जमीन चांगली भुसभुशीत करावी. त्यामुळे मुळ्या चांगल्या वाढतात आणि भरपूर अन्नद्रव्ये शोषून घेऊन झाडाची वाढ होते. त्यासाठी उभी आडवी नांगरट करून 2-3 वेळेस कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. पेरणीपूर्वी पाणी देऊन वारसा झाल्यावर पेरणी केली तर उत्पादनात वाढ होणार आहे.
महाराष्ट्रात हे पीक पीक थंड हवामानात येणारे असल्यामुळे याची लागवड ऑक्टोंबर महिन्याच्या सुरुवातीस किंवा नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीस करणे फायदेशीर ठरते. यंदा तर मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने पोषक वातावरण आहे.
वटाण्याची पेर टिफणीने केल्यास हेक्टरी 50 ते 75 किलो बियाणे लागते. पण जर टोकण पद्धतीने लागवड केली तर हेक्टरी केवळ 20-25 किलो बियाणे लागते. पेरणीपूर्वी बियाण्यास प्रतिकिलो 3 ग्रॅम थायरमची बीज प्रक्रिया करावी. त्याच प्रमाणे अनुजीवी खताचीही प्रक्रिया बियाण्यास आवश्यक आहे. रायझोबिअम कल्चर चोळल्यामुळे उत्पादनात हमखास वाढ होते.
वटाण्याच्या लागवडीचे दोन प्रकार आहेत पहिला बागायती भाजीचा वटाणा, जिरायती म्हणजेच कडधान्याचा वटाणा, यामध्ये बागायती वटाण्यामध्ये दोन प्रकार आहेत. एक गोलगुळीत बिया असलेले ज्याचा वापर वटाणा सुकवण्यासाठी करतात तर दुसरा सुरकुतलेल्या बियाणे. यामध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते तर पिटाळपणा हा कमी असतो. या वटाण्याच्या शेंगा हिरव्या असताना त्याची मोठ्या प्रमाणात विक्री ही केली जाते. यामधूनही शेतकऱ्यांना पैसे मिळवता येतात.
सुधारित वाण –
लवकर येणाऱ्या जाती – अर्ली बॅगर, अर्केल, असौजी, मिटीओर
मध्यम कालावधीत येणाऱ्या जाती – बोनव्हिला, परफेक्शन न्यु लाईन
उशिराया येणाऱ्या जाती – एन. पी. – 29, थॉमस लॅक्सटन
वटाण्याची लागवड एक तर सपाट वाफ्यात करतात. नाही तर सरी व वरंब्यावर लागवड करतात. त्यासाठी 60 सेमी अंतरावर सरी वरंबे करून सऱ्यांच्या दोन्ही अंगास बियाणांची टोकन पध्दतीने लागवड करावी. दोन रोपांतील अंतर 5 ते 7.5 सेमी ठेवण्यास वाढ जोमात होते. एका ठिकाणी किमान दोन बिया टोकाव्यात. आणि त्यानंतर टिफणीने बी पेरून मग वाफे बांधले जातात.
वाटाणा पिकास जमिनीचा दर्जा पाहूनच खताची शिफारस केली जाते. त्यासाठी हेक्टरी 15 ते 20 टन शेणखत, 20 ते 30 किलो नत्र, तर 50 ते 60 किलो स्फुरद आणि 50 ते 60 किलो पालाश देणे जरुरीचे आहे. जमिनीची मशागत करीत असताना संपूर्ण शेणखत जमिनीत पसुरून ते चांगले मिसळणे गरजेचे असते. त्याचप्रमाणे संपूर्ण पालाश आणि स्फुरद व अर्धे नत्र, बी पेरण्याचे अगोदर जमिनीत पेरावे किंवा मिसळावे. त्यातून राहिलेले नत्र ज्यावेळी पीक फुलावर येईल त्यावेळी द्यावे.
खतांबरोबर पाण्याचेही व्यवस्थापन हेही तेवढेच महत्वाचे आहे. बी पेरल्याबरोबर लगेच पाणी द्यावे. त्यामुळे वाढ जोमात होते.
कीड व रोगराई व उपाययोजना
वाटाणा पिकावर मावा, शेंगा पोखरणारी आली या किडींचा तर भुरी, मर रोग या रोगांचा प्रादुर्भाव आढळून येतो.
मावा: हि कीड हिरव्या रंगाची अत्यंत लागण असते. ते पानातून रस शोषून घेतात. त्यामुळे झाडे कोमेजून जातात.
शेंगा पोखरणारी अळी: हिरव्या रंगाची हि अळी प्रथम शेंगाची साल खाते व आत शिरते आणि दाणे पोखरून खाते.
उपाययोजना – किडीचा प्रादुर्भाव झाल्यास मॅलॅथिऑन 50 ईसी, 500 मिली किंवा फॉस्फॉमिडॉन 85 डब्ल्यू ईसी, 100 मिली किंवा डायमेथोएन 30 ईसी, 500 मिली किंवा मिथिलडेमेटॉन 25 ईसी, 400 मिली, 500 लिटर पाण्यात मिसळून प्रती हेक्टरी फवारावे. पेरणीनंतर 3 आठवड्यांनी पहिली फवारणी करणे गरजेचे आहे. (Quality production of vatana shenga in light soil, know all the information)
बाजारभाव : उडदाचे दर वधारले, सोयाबीनबाबत मात्र, चिंता कायम
फळलागवडी दरम्यानच डाळिंब उत्पादकांना फटका, पावसानंतर किडीचा प्रादुर्भाव
20 हजार कोटी रुपये अदा केले, मात्र 500 कोटींमुळे अर्धवट राहिली ‘महाविकास आघाडी’ची पीक कर्जमाफी