जळगाव : मराठवाड्यात होत असलेल्या पावसामुळे खरीपातील सोयाबीन, उडीद या पिकाचे नुकसान झाले आहे तर (Khandesh) खानदेशात पावसामुळे कपाशीचे अतोनात नुकसान झाले आहे. (Cotton) कापसाचे पीक काढणीला आहे पण पावसामुळे शेतकऱ्यांना बोंडाची तोडणीही शक्य होत नाही. त्यामुळे डोळ्यासमोर कापसाची बोंडं ही चिखलात गळून पडत आहेत. निसर्गाने निर्माण केलेल्या परस्थितीसमोर बळीराजा हताश झाला आहे. खरिपातील इतर पिकांना योग्य दर नाही तर कापसाची ही अवस्था झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
पावसाने केवळ मराठवाड्यातच नाही तर विदर्भातही थैमान घातले आहे. त्यामुळे शेतीची कामेही करणे मुश्किल झाले आहे. हंगामाच्या सुरवातीलाच लागवड केलेला कापूस आता वेचणीला आला आहे. पण चार दिवस विश्रांती दिलेल्या पावसाने पुनारागमन केले आहे. त्यामुले वेचणी करावी कशी असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर आहे. गेल्या तीन दिवसापासून पाऊस होत असल्याने वेचणीसाठी शेतामध्ये जाणेही शक्य होत नाही.
शिवाय मजुर लावून कापूस वेटणीची कामे करावी लागतात. मात्र, कामाला सुरवात केली की पावसाचे आगमन होत आहे. कामे तर रखडत आहेतच शिवाय मजूरांवर शेतकऱ्यांचा खर्चही होत आहे. सध्याच्या वातादरणामुळे एकरी एक ते दीड क्विंटल कापसाचे नुकसान होत आहे. त्यामुळे पहिल्या वेचनीत तर शेतकऱ्यांचे नुकसान हे अटळ आहे. मात्र, भविष्यात तरी पावसाने उघडीप द्यावी अशी आशा शेतकरी व्यक्त करीत आहे.
पहिल्या पेऱ्यातील सोयाबीनची काढणी ही झाली असली तरी उशीराने पेरणी झालेले सोयाबीन अजूनही वावरातच आहे. खानदेशासह मराठवाड्यात हीच अवस्था आहे. कापसाची बोंड ही परीपक्व झाल्याने थेट पावसाच्या पाण्यात गळून पडत आहेत तर सोयाबीनच्या शेंगाही आता पोसलेल्या अनस्थेत आहेत. मात्र, पावसाने शेत हे चिभडल्याने काढणीही मुश्किल होत आहे. खरीपातील ही दोन्ही महत्वाची पीके ही पाण्यातच आहेत.
हंगामपुर्व कापूस हा काढणीला आला आहे. मध्यंतरी चार दिवस पावसाने उघडीप दिल्याने वेचणी कामाला वेग आला होता. पण गेल्या तीन दिवसापासून पुन्हा पावसाला सुरवात झाली आहे. त्यामुळे कापसाच्या झाडाची बोंड ही पावसाच्या पाण्यातच गळून पडत आहेत. त्यामुळे एकरी दीड ते दोन क्विंटलचे नुकसान हे शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे. अशीच परस्थिती राहिली तर पहिली वेचणीचे उत्पादन पाण्यातच जाणार असल्याचे चित्र आहे. (Rain also stalled cotton harvesting, farmers in Khandesh in trouble)
इतर बातम्या :
मुलाला सोन्याची अंगठी न केल्याने रुसवा, सुनेने सासूच्या अंगावर ओतलं उकळतं पाणी
प्रवीण दरेकर म्हणाले, राष्ट्रवादीचे घोटाळे बाहेर काढणार, अजितदादांचं जशास तसं प्रत्युत्तर