नांदेड : यंदाच्या हंगामात शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका कायम सुरुच आहे. यापूर्वी अतिवृष्टीमुळे ( Nanded) जिल्ह्यात खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामध्ये केळी बागा ह्या जोमात असल्याने कमी प्रमाणाक फटका बसला होता. तळहाताच्या फोडाप्रमाणे अर्धापुर तालुक्यातील शेतकऱ्यांनी बागांची जोपासना केली मात्र, आता अवकाळी पावसाने व वातावरणातील बदलामुळे केळी बागांचे न भरुन निघणारे नुकसान झाले आहे. करपा रोगाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढल्याने (damage to banana orchards) केळीच्या बुडापासूनच या रोगाचा प्रादुर्भाव सबंध झाडावर होत आहे. त्यामुळे पाने ही करपून जात आहेत.
वातावरणातील बदलाचा परिणाम हा सर्वच पिकांवर झालेला आहे. मात्र, नांदेड जिल्ह्यात अवकाळी आणि ढगाळ वातावरण यामुळे कांद्यासह केळी बागांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव झालेला आहे. केळीच्या बुडापासूनच हा रोग पसरत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नेमके काय करावे असा प्रश्न आहे. केळीची पाने ही करपून जात आहेत तर याचा परिणाम आता उत्पादनावर होणार आहे. अर्धापुर तालुक्यात हजोरो हेक्टवर केळीचे लागवड करण्यात आली होती. पण आता बागा अंतिम टप्प्यात असताना होणारे नुकसान शेतकऱ्यांना उघड्या डोळ्याने पहावे लागत आहे.
अतिवृष्टीने खरीप हंगामातील सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. त्याची भरपाई रक्कम अजूनही शेतकऱ्यांना मिळालेली नाही. मात्र, खरीप हंगाम हा बेभरवाश्याचा झाला असल्याने अनेक शेतकरी आता फळबागाकडे वळले आहेत. पण यामध्येही पदरी निराशाच पडत आहे. उलट पारंपारिक पिकांना खर्च कमी होतो. त्यामुळे नुकसान झाले तरी ते पचणी पडते मात्र, केळी बागाला फवारणी त्याचे व्यवस्थापन यामुळे एकरी लाखो रुपये खर्च आहे. असे असताना आता अंतिम टप्प्यात असलेल्या बागांना करपा रोगाने घेरलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी किडनाशक व बुरशीनाशक यांचे मिश्रण करुन फवारणी करण्याचा सल्ला कृषी अधिकाऱ्यांनी दिलेला आहे.
पीक पध्दतीमध्ये बदल करुन उत्पादन वाढीचा शेतकऱ्यांचा कायम प्रयत्न राहिलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपारिक पिकांना बाजूला करीत केळीचे पीक घेण्याचा निर्धार केला होता. विशेष म्हणजे अर्धापुर तालुक्यात केळीचे सर्वाधिक क्षेत्र आहे. सुरवातीच्या काळात चांगला दर मिळाल्याने आता जिल्ह्यात सर्वत्र केळीचे क्षेत्र वाढत आहे. पण गेल्या चार वर्षातील सर्वात कमी दर यंदा केळीला आहे. घटती मागणी कोरोनाचे वाढते सावट यामुळे व्यापारी बागांकडे फिरकतही नाहीत. त्यामुळे यंदाचे वर्ष शेतकऱ्यांसाठी नुकसानीचे ठरत आहे.