कोल्हापूर : काळाच्या ओघात (Sugarcane harvesting) ऊसतोडणीमध्येही अमूलाग्र बदल होत आहे. मजुरांची जागा आता अत्याधुनिक यंत्र घेत आहेत. यंदाच्या हंगामात तर ऊसतोडणीसाठी सर्रास यंत्राचा वापर केला जात होता. त्यामुळे वेळीची बचत तर होत होती पण मजुरांच्या हाताला काम मिळते की नाही अशी स्थिती झाली होती. पण या ऊसतोडणी (machine failure) यंत्राची चाके पावसाने उघडीप देऊन 5 दिवसाचा कालावधी लोटला तरी रुतलेलीच आहेत. त्यामुळे पुन्हा ऊसतोडणीला मजुरांशिवाय पर्याय नसल्याचे चित्र कोल्हापूर तसेच सोलापूर जिल्ह्यांमध्ये पाहवयास मिळत आहे. यामुळे यंत्रधारकांचे नुकसान तर झालेच आहे शिवाय अजून 15 दिवस तरी यंत्राने ऊसतोडणी शक्य नसल्याचे सांगितले जात आहे.
अधिकतर प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रात ऊसतोडणी ही यंत्राच्या सहाय्याने केली जाते. मात्र, येथील शेतजमिन अधिकच सुपिक असल्याने पावसाने उघडीप देऊन 5 दिवस उलटले तरी अद्यापही वाफसे हे झालेले नाहीत त्यामळे ऊसतोडणाचे यंत्र हे वावरात जाऊच शकत नाही. शिवाय मशिन चालवणे, ट्रॉलीमध्ये कांड्या भरणे आदी कामासाठी मशिनच शेतात न्यावे लागते. सध्या कारखान्यांना कोणत्याही परिस्थितीत ऊसाचा पुरवठा अनिवार्य आहे. यामुळे कारखानदार ऊस तोडणी कामगारांकडूनच जास्तीत जास्त तोडणी करून घेत आहेत. यामुळे पुरवठा हा कमी होत असला तरी कारखान्याचे गाळप सुरु राहणे महत्वाचे आहे.
ऊसगाळप हंगाम ऐन मध्यावरच असताना अवकाळी पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे मध्यंतरी तर कारखाने हे बंद ठेवावे लागले होते. आता कारखाने सुरु झाले आहेत पण त्यांची मदार ही ऊसतोड मजूरांवर आहे. भविष्यात जो ऊस यंत्राच्या सहाय्याने तोडणी करायचा होता तो देखील आता मजुरांकडून तोडला जात आहे. कारण अजून 15 दिवस तरी वाहने हा ऊसाच्या फडापर्यंत जाऊ शकत नाहीत. शिवाय तोडणीला आलेल्या ऊसाचे गाळप महत्वाचेच आहे अन्यथा वजनात घट ही समस्या उद्भवणार आहे. त्यामुले मजुरांकडूनच ऊसतोडणीवर कारखान्यांचा भर आहे.
यंत्राद्वारे ऊसतोडणीचा प्रयोग तसा पश्चिम महाराष्ट्रातच अधिक प्रमाणात केला जातो. कारण या भागाच एकलगत ऊसाचे क्षेत्र आहे. त्यामुळे तोडणीही शक्य होते. यंदा तर ऊसतोड मशीनची संख्या गतवर्षीपेक्षा वाढलेली होती. कोट्यावधी रुपये खर्च करुन ऊसतोडणी यंत्रे हे खरेदी केली आहेत. मात्र, यंदा पहिल्याच वर्षी अवकाळीचा परिणाम ह्या यंत्रावरही झाला आहे. अनेक दिवसांपासून मशीन ह्या एकाच ठिकाणी उभ्या करण्यात आल्या आहेत.