नंदुरबार : जिल्ह्यात वातावरणाच्या प्रमाण वाढल्याने शेतकऱ्यांनी पपईच्या काढणीला वेग दिला आहे. त्याचा परिणाम बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात पपईची आवक वाढली. त्याचा परिणाम पपई दरांवर झाला. पपईच्या दरात प्रति किलो 1.25 पैशांनी कमी झाले आहेत. व्यापारी आणि शेतकरी प्रतिनिधी यांच्यात झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. देशातील सर्वात मोठा पपई उत्पादक बेल्ट म्हणून नंदुरबार जिल्ह्याची ओळख आहे. शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीतून पपईचे दर ठरत असतात. शेतकरी प्रतिनिधी आणि व्यापारी यांच्यात झालेल्या बैठकीत पपईचे दर निश्चित करण्यात आले आहे. पपईला 16 रुपये प्रति किलो दर देण्यात आला आहे. पुढील बैठकीपर्यंत हा दर कायम राहील. अशी माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली आहे.
फेब्रुवारी महिन्यात तापमान 32°c च्या वरती गेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पपईच्या काढणीला वेग दिला आहे. वेगवान काढणी होत असल्याने पपईची आवक वाढली आहे. वाढत्या आवकमुळे आणि उत्तरेकडील राज्यांमध्ये मागणी कमी झाली. व्यापारी आणि शेतकरी यांच्यात झालेल्या बैठकीत दरात एक रुपये कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अशी माहिती बाजार समितीचे सचिव संजय चौधरी यांनी दिली आहे.
नंदुरबार जिल्हा आणि शेजारील गुजरातच्या सीमावरती भागातील तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पपईची लागवड केली जाते.
यावर्षी पपईला चांगले तर मिळत आहेत. पुढच्या वर्षी पपईच्या क्षेत्रांमध्ये अजून वाढ होईल, असा अंदाज पपई केळी उत्पादक संघाचे अध्यक्ष अभिजित पाटील यांनी दिली आहे. पपईचे दर ठरवताना शेतकरी आणि व्यापारी यांच्या समन्वयातून ठरत असतात. शेतकऱ्यांनाही आर्थिक फटका बसत नसल्याचे चित्र आहे. शहादा बाजार समिती शेतकरी प्रतिनिधी आणि व्यापारी यांच्या दर पंधरवड्याला होणाऱ्या बैठकीत बाजाराच्या स्थितीचा विचार केला जातो. पपईचे दर कमी जास्त केले जातात. यातून शेतकरी आणि व्यापाऱ्यातील वाद मिटवला जातो. पपईच्या दराचा वाद मिटला. त्यामुळे आता पपई उत्पादक आणि व्यापारी यांच्यात चांगला समन्वय राहणार. ग्राहकांनाही योग्य दरात पपई खायला मिळणार.