Navi Mumbai : अवकाळीच्या नुकसानीच्या खुणा कायम, फणसाच्या विक्रमी आवक नंतर कवडीमोल दर

| Updated on: Jun 16, 2022 | 12:54 PM

नवी मुंबईच्या मार्केटमध्ये वटपोर्णिमेमुळे फणसाची आवक मोठ्या प्रमाणात झाली होती. चार दिवसांमध्ये तब्बल 800 टन आवक झाल्याने दर घटले तर होतेच पण दाखल झालेल्या फणसाचा दर्जाही ढासळला होता. मात्र, सणामुळे विक्री वाढेल या उद्देशाने व्यापाऱ्यांनी फणसाची खरेदी केली पण अपेक्षेप्रमाणे मागणी नसल्याने नुकसान झाले आहे.

Navi Mumbai : अवकाळीच्या नुकसानीच्या खुणा कायम, फणसाच्या विक्रमी आवक नंतर कवडीमोल दर
नवी मार्केटमध्ये फणसाची विक्रमी आवक झाली. मात्र कवडीमोल दर मिळाला.
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

नवी मुंबई : आता जरी पावसाची वाट पाहण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली असली तरी मध्यंतरीच्या (Untimely Rain) अवकाळीच्या खुणा आजही कायम आहे. (Navi Mumbai Market) नवी मुंबईच्या बाजार समितीमध्ये गेल्या चार दिवसांमध्ये (Jackfruit) फणसाची विक्रमी आवक झाली आहे. मात्र, अवकाळी पाऊस आणि त्यानंतरचे कडाक्याचे ऊन यामुळे फणसाचे मोठे नुकसान झाले आहे. बाजार समितीमध्ये तब्बल 800 टनाहून अधिकचे फणस दाखल झाले आहे. फणसाला समाधानकारक दर सोडाच पण यापैकी 30 ते 40 टक्के फणस हे खराब झाल्याने फेकून देण्याची नामुष्की शेतकऱ्यांवर ओढावली आहे. अवकाळीचा सर्वाधिक परिणाम हा फळबागांवर झाला होता. आता वटपोर्णिमेच्या निमित्ताने फणसाची आवक झाली होती. पण दोन दिवसानंतरही खराब फणस फेकून देण्यातच बाजार समितीमधील कर्मचारी हे व्यस्त असल्याचे चित्र आहे.

विक्रीत घट व्यापाऱ्यांचेही नुकसान

नवी मुंबईच्या मार्केटमध्ये वटपोर्णिमेमुळे फणसाची आवक मोठ्या प्रमाणात झाली होती. चार दिवसांमध्ये तब्बल 800 टन आवक झाल्याने दर घटले तर होतेच पण दाखल झालेल्या फणसाचा दर्जाही ढासळला होता. मात्र, सणामुळे विक्री वाढेल या उद्देशाने व्यापाऱ्यांनी फणसाची खरेदी केली पण अपेक्षेप्रमाणे मागणी नसल्याने नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांनी कवडीमोल दरात विक्री केली पण ढासळलेला दर्जा आणि घटलेली मागणी यामुळे व्यापाऱ्यांना तर फणस हे फेकून द्यावे लागले होते.

अवकाळीची अवकृपा त्यात उन्हाचा कहर

गेल्या वर्षभरात अवकाळी पावसामुळे फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यामधून फणसाचीही सुटका झाली नाही. अगोदर अवकाळी पाऊस आणि तोडणीच्या दरम्यान कडाक्याचे ऊन यामुळे फणस हे नासले होते. बाजारपेठेत आवक वाढताच हे चित्र समोर आले होते. त्यामुळे नियमित पिकांतून तर शेतकऱ्यांचे नुकसान झालेच आहे पण फळबागांमधूनही शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच पडली आहे.

हे सुद्धा वाचा

बाजारपेठेत नेमके काय चित्र?

नवी मुंबईच्या बाजार समितीमध्ये गेल्या चार दिवसांमध्ये 800 टन फणस दाखल झाले होते. सणामुळे याची विक्री होईल असा अंदाज पण खराब माल आणि रिमझिम पावसाचा परिणाम विक्रीवर झाला. यातच मध्यंतरीच्या अवकाळीमुळे फणसाचा दर्जाही ढासळला होता. त्यामुळे दाखल झालेल्या मालापैकी 30 ते 40 टक्के फणस हे हातावेगळे केले जात असल्याचे चित्र बाजार समितीमध्ये आहे.