नाशिक: काद्याच्या उत्पादनात नाशिक जिल्हा आग्रस्थानी आहे. (Nashik) या जिल्ह्यात कांद्याचे उत्पादन वाढविण्याच्या दृष्टीने वेगवेगळे प्रयोग केले जातात. यंदा तर प्रतिकूल परस्थितीमध्ये चांदवड (Onion तालु्क्यातील शेतकऱ्याने खरीपात पेरणी केलेला कांदा हा बाजारात देखील आणला आहे. एकीकडे मराठवाड्यात हिवाळा कांदा लागवडीची लगबग सुरु असताना तिकडे लाल कांदा हा बाजारात आला असून त्यास चांगला दरही मिळालेला आहे.
नाशिक जिल्ह्यातील चांदवड, मालेगाव, येवला, देवळा व सिन्नर तालु्क्यात कांद्याचे विक्रमी उत्पन्न घतले जाते. खरीपात लागवड केलेल्या कांद्याची ऑक्टोंबरमध्ये आवक सुरु होते. यंदा मात्र, चांदवड तालुक्यातील दरेगाव येथील शेतकरी यांचा लाल कांदा हा दोन आठवडे आगोदरच देवळा येथील बाजारात दाखल झाला आहे. मुहुर्ताचा कांदा म्हणून याची खरेदी करण्यात आली.
कौतिक जाधव यांच्या या कांद्याला 3131 रुपये असा दरही मिळाला. हा मुहुर्त दर असला तरी भविष्यातही दर हे चढेच राहणार असल्याचे सांगितले जात आहे. कौतिक जाधव यांनी जूनच्या पहिल्या आठवड्यातच दोन एकरावर या कांद्याची पेरणी केली होती. कांदा पेरणी करण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती. कांदा हा मध्यम स्वरुपाचा असताना त्याला योग्य दर मिळाला नसल्याने त्यांनी कांद्याची काढणी ही केलीच नाही.
त्यामुळे जाधव यांनी तीन वेळा फवारणी केली शिवाय कोंबडी खत आणि युरियाची मात्रा दिल्याने कांद्यात सुधारणा झाली. आता दोन एकरातील कांद्याची काढणी ही झाली आहे. मध्यंतरीच्या पावसामुळे थोड्याप्रमाणात नुकसान झाले असले तरी आता या लाल कांद्याली 3131 दर मिळाला आहे.
दरेगाव येथील कौतिक जाधव यांना 25 क्विंटल 40 किलो कांदा हा दोन एकरामध्ये झाला होता. शिवाय काढणीच्या प्रसंगी पावसामुळे कांद्याचे नुकसान झाले होते. मात्र, चांगल्या अवस्थेतील कांद्याला 3131 रुपयांचा दर मिळाला. हा मुहुर्ताचा दर असला तरी चांगल्या प्रतिच्या कांद्याला दर कायम राहणार असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणने आहे. या काद्यातूनच जाधव यांना 78 हजार रुपये पदरी पडलेले आहेत.
कांद्याचे उत्पादन वाढण्यासाठी नाशिक जिल्ह्यात वेगवेगळे प्रयोग हे केले जातात. पेरणी प्रयोग ही जुनी पध्दत असली तरी कौतिक जाधव यांनी यंदा पहिल्याच वेळी कांद्याची पेरणी केली होती. योग्य जोपासना केल्याने कांद्याची वाढ झाली परंतु, अंतिम टप्प्यात पावसाने नुकसान झाल्याचे जाधव यांनी सांगितले. (Red onion in Nashik market, onion prices are also good)
भाजीपाल्याचे उत्पादन 60 दिवसांच्या आत पदरात, भरघोस कमाईही
आता नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांची आंदोलने, हेक्टरी 50 हजार मदतीची मागणी