नाशिक : यंदाच्या हंगामात ज्याच्यावर संकट नाही असे पीकच नाही. (HeavyRain) अतिवृष्टी, अवकाळी आणि त्यानंतर करपा रोगाचा प्रादुर्भाव अशा अनेक संकटाचा सामना करीत (Kharif Season) खरीप हंगामातील लाल कांद्याने आपले (Lasalgaon Market) लासलगाव या मुख्य बाजारपेठेचे आगार गाठलेच आहे. रोप अवस्थेत असतानाच या कांद्यावर अवकाळी पावसाचा मारा झाला होता. त्यामुळे उत्पादनात घट झाली असली तरी गेल्या पाच दिवसांपासून लासलगाव बाजार समितीमध्ये (Red Oinion) लाल कांद्याचीच चलती आहे. आवक वाढली तरी दर हे टिकून असून शेतकऱ्यांना काहीशा प्रमाणात का होईना दिलासा मिळालेला आहे. सबंध राज्यभरातून लाल कांदा हा बाजारपेठेत दाखल होत आहे. प्रतिक्विंटलला सरासरी 2100 रुपये दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमधूनही सामाधान व्यक्त होत आहे.
यंदा ओढावलेल्या परस्थितीमुळे उत्पादनात घट होणार असा अंदाज बांधला जात होता. उत्पादनात घट होईलही मात्र, सध्या लासलगाव बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात आवक सुरु झाली आहे. दोन महिन्यापूर्वी येथील बाजार समितीमध्ये केवळ 20 क्विंटलने आवक सुरु झाली होती. ती आता 22 हजार क्विंटलवर गेली आहे. कांद्याची आवक वाढताच दर लागलीच कमी होतात पण लाल कांद्याने शेतकऱ्यांची अद्यापपर्यंत तर निराशा केलेले नाही. 21 रुपये प्रति किलोचा दर शेतकऱ्यांना मिळत आहे. कांद्याच्या दराबाबत सर्वकाही बेभरवश्याचे असते म्हणून छाटणी झाली की विक्रीवर शेतकऱ्यांचा भर राहिलेला आहे.
ज्याचा कांदा योग्य वेळी बाजारपेठेत दाखल झाला त्यांनाच योग्य दर असेच काहीशे सध्याचे चित्र आहे. कारण आता खरीप कांदा छाटणीची प्रक्रिया अधिक गतीने सुरु झाली आहे. त्यामुळे दिवसागणिक कांद्याची आवक ही 5 हजार क्विंटलने वाढत आहे. त्यामुळे त्याचा परिणाम हा दरावर होणारच आहे. छाटणी झाली की थेट बाजारपेठेत कांदा दाखल केला जात आहे. पण लागवडीचे क्षेत्र वाढल्याने आवक कायम राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे. आतापर्यंत तर शेतकऱ्यांना समाधानकारक दर मिळालेले आहेत. आवक कायम राहिली तर दरावर परिणाम होईल असेही व्यापारी सांगत आहेत.
सध्या काढणी -छाटणी आणि बाजारपेठेत विक्री असाच शेतकऱ्यांचा कार्यक्रम सुरु आहे. आवक वाढीचा परिणाम थेट दरावर होत आहे. गुरुवारी अचानक 150 रुपयांनी दर घसरले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सावध पवित्रा घेत कांद्याची टप्प्याटप्प्याने विक्री केली तर अधिकचा फायदा होणार आहे. पण कांद्याची सोयाबीन, कापसाप्रमाणे साठवणूक करता येत नाही. कांदा नाशवंत असल्याने लागलीच त्याची विक्री केली जाते. त्यामुळे जेवढ्या लवकर कांदा बाजारपेठेत दाखल होईल तेवढा फायदा शेतकऱ्यांना होणार आहे.