Cow Dung: गाईच्या शेणापासून तयार केल्या टाईल्स, घराच्या तापमानात इतकी होते घट

| Updated on: Jun 08, 2023 | 3:04 PM

उन्हाचा पारा वाढत असल्याने शेणापासून टाईल्स तयार करण्याची मागणी वाढत आहे. घरी शेणापासून तयार केलेली टाईल्स वापल्याने तापमान ७ ते ८ डिग्री कमी होतो.

Cow Dung: गाईच्या शेणापासून तयार केल्या टाईल्स, घराच्या तापमानात इतकी होते घट
Follow us on

पशुपालन करणाऱ्यांच्या कामाची बातमी आहे. आतापर्यंत ते दूध, दही, ताक आणि पनीर विकून पैसे कमवत होते. आता शेणापासून चांगली कमाई करू शकतात. शेणाच्या टाईल्सपासून व्यवसाय सुरू करू शकता. या व्यवसायात खूप पैसे खर्च करावे लागणार नाही. शिवाय कमी खर्चात चांगला नफा मिळेल. छत्तीसगडच्या महिला शेणापासून टाईल्स तयार करून चांगला नफा मिळवत आहेत.

उन्हाळ्यात गायीच्या शेणापासून तयार केलेल्या टाईल्सला मागणी मोठी आहे. घरी शेणाची टाईल्स लावून खोलीचे तापमान ७ ते ८ डिग्री कमी करता येते. गाव असो की, शहर शेणापासून तयार केलेल्या टाईल्सची मागणी वाढत आहे. कित्तेक टुरिस्ट प्लेस आणि फार्म हाऊसमध्ये शेणाची टाईल्स लावली जाते. एक दिवस थांबण्यासाठी मोठी रक्कम मोजावी लागते.

 

टाईल्सला चांगल्या पद्धतीने उन्हात वाळवले जाते

तुम्ही शेणापासून टाईल्स सुरू करू इच्छित असाल तर काही आवश्यक साहित्य तुम्हाला खरेदी करावे लागेल. त्यात शेण, चुण्याचे मिश्रण, जिप्सम, टाईल्स तयार करण्याचा साचा आणि मिश्रणासाठी मशीन. टाईल्स बनवण्यापू्र्वी तुम्ही शेणाला वाळवा. त्यानंतर मशीनमध्ये त्याचा चुरा बनवा. त्यानंतर तिथं जिप्सम आणि चुन्याचे मिश्रण तयार करा. मिश्रणाला चुऱ्यासोबत मिळवून साच्यात टाका. वेगवेगळ्या आकाराच्या टाईल्स बनवल्या जातात. टाईल्सला चांगल्या पद्धतीने उन्हात वाळवावे लागते.

 

पाणी, आघीचा टाईल्सवर परिणाम नाही

टाईल्स उन्हात वाळवली जाते. तिला मजबूत करण्यासाठी पाण्यात भिजवून ठेवावे लागते. त्यानंतर पुन्हा उन्हात वाळवावे लागते. त्यानंतर ही टाईल्स तयार होते. ही टाईल्स खूप हलकी असते. त्यावर पाण्याचा कोणताही परिणाम होत नाही. आगीचाही या टाईल्सवर कोणताही परिणाम होत नाही. तीन-चार लाख रुपये खर्च करून हा व्यवसाय सुरू करता येतो. काही महिन्यांत तुमचे उत्पन्न दुप्पट होते.