पुणे : शेती व्यवसयामध्ये अमूलाग्र बदल होत असले तरी राज्यात कोरडवाहू क्षेत्र हे अधिक आहे. त्यामुळे कोरडवाहू शेती क्षेत्रात या बदलत्या हवामानानुसार संशोधन होणे आवश्यक आहे. त्यानुसार पीक पध्दती, मशागत, तंत्रज्ञान आणि नविन वाणाची सुधारणा शक्य होणार असल्याचे मत राज्य कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केले आहे. दोन दिवस त्यांनी सांगोला आणि सोलापूर येथील शेतकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर महाराष्ट्र राज्य कृषी परिषदेच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
कृषी विद्यापीठातून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लागणे आवश्यक आहे. याकरिता जमिनीचा कस कसा आहे. कोणत्या पिकाची लागवड शेतकऱ्यांच्या फायद्याची राहणार आहे याचा अभ्यास होणे गरजेचे आहे. शेतकऱ्यांना येणाऱ्या समस्यांचे निरसण येथील संशोधनातून होणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्य कृषी परिषदेची 105 वी बैठक पार पडली असून या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कृषीमंत्री दादाजी भुसे हे उपस्थित होते.
कृषी विद्यापीठातील उपलब्ध सर्व साधनसामुग्रीचा आढावा घेऊन त्यानुसार त्याचा वापर प्रभावीपणे करण्यावर भर द्यावा. कृषि अभ्यासक्रमात ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांशी संवाद साधून शेतकऱ्यांच्या अडचणी संदर्भात मार्गदर्शन करणे तसेच इतर समस्यांचे संशोधनासाठी विषय सूचविणे याबाबत कृषि विद्यापीठाच्या कुलगुरुंनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही भुसे यांनी यावेळी केले.
कृषी विद्यापीठ व केंद्र शासनाच्या विविध पिकांच्या संशोधन केंद्रांचे संशोधन कार्य प्रभावीपणे शेतकऱ्यांच्या उपयोगी पडेल या दृष्टीने विस्तार कार्य हाती घेणे गरजेचे आहे. या संदर्भात सोलापूर व नाशिक जिल्ह्यातील डाळींब पिकांच्या संदर्भात निर्माण झालेल्या गंभीर समस्यासंदर्भात राहुरी कृषि विद्यापीठाने भरीव कार्य करण्याची आवश्यकताही कृषीमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.
शेतकऱ्यांना पिकावरील किडीबाबत योग्य मार्गदर्शन होणे आवश्यक आहे. मात्र, माहितीचा आभाव असल्याने पीक लागवडीपासून काढणीपर्यंत चुकीची प्रक्रीया होत असल्याने त्याचा परिणाम शेती उत्पादनावर होत आहे. त्यामुळे कृषी विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा आणि शेतकऱ्यांचा संवाद होणे आवश्यक आहे. शिवाय संशोधन कार्यही प्रभावीपणे झाले तर त्याचा अधिकचा फायदा हा उत्पादनासाठी होणार आहे. त्यामुळे कृषी विद्यापीठांची भुमिका ही महत्वाची आहे.
दरम्यान, कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी सांगोला येथील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांशी संवाद साधलेला होता. यावेळी बदलत्या वातावरणामुळे या फळावद किडीचा प्रादुर्भाव पडला होता. त्यामुळे शेती व्यवसयात अमुलाग्र बदल करणाऱ्या शेतकऱ्यांना कृषी विद्यापाठाच्या माध्यमातून मार्गदर्शन होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
एफआरपी रकमेच्या तील तुकड्यावरून सध्या मतमतांतर आहे. पण सरकार हे शेतऱ्यांच्याच हीताचा निर्णय घेईल. एफआरपी बद्दल मंत्रीमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी योग्य त्या सुचना केलेल्या आहेत. साखर कारखानदारांनी त्या सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे. अखेर सरकार शेतकऱ्यांच्याच हीताचा निर्णय घेणार आहे. त्यामुळे कारखानदारांनी थकीत एफआरपी रक्कम त्वरीत देणे आवश्यक आहे. (Research is the need of the hour according to the changing environment)
उस्मानाबाद : पुनर्वसनाची मागणी करीत इर्ला ग्रामस्थांनी अडविले पालकमंत्र्यांना
अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील 70 टक्के सोयाबीन मातीत.. लातूर, औरंगाबादेत सर्वाधिक नुकसान
Nashik Rain | नाशिकमध्ये दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत पाणी, सराफ बाजारही पाण्याखाली जाण्याची भीती