Agricultural University : ‘या’ 9 पिकांना अन् 4 फळांच्या वाणांना मान्यता, कोणत्या कृषी विद्यापीठाचे योगदान? वाचा सविस्तर

| Updated on: Jan 03, 2022 | 3:16 PM

मध्यंतरी राज्यातील 4 कृषी विद्यापीठांची बैठक ही राज्य कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी घेतली होती. या दरम्यान, कृषी विद्यापीठाचे शेतीसाठी किती योगदान आहे हे पटवून सांगण्यात आले होते. शिवाय संशोधन हे केवळ प्रयोगशाळेपूरतेच मर्यादित न राहता त्याचा वापर शेतकऱ्यांना होणे किती महत्वाचे आहे हे देखील पटवून देण्यात आले आहे.

Agricultural University : या 9 पिकांना अन् 4 फळांच्या वाणांना मान्यता, कोणत्या कृषी विद्यापीठाचे योगदान? वाचा सविस्तर
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

पुणे : कृषी क्षेत्रातील बदलात कृषी विद्यापीठांची मोठी भूमिका राहिलेली आहे. विद्यापीठाच्या माध्यमातून होत असलेले संशोधन थेट बांधावर काम करणाऱ्या शेतकऱ्यास उपयोगी पडत आहे. मध्यंतरी राज्यातील 4 कृषी विद्यापीठांची बैठक ही राज्य कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी घेतली होती. या दरम्यान, कृषी विद्यापीठाचे शेतीसाठी किती योगदान आहे हे पटवून सांगण्यात आले होते. शिवाय संशोधन हे केवळ प्रयोगशाळेपूरतेच मर्यादित न राहता त्याचा वापर शेतकऱ्यांना होणे किती महत्वाचे आहे हे देखील पटवून देण्यात आले आहे. राज्यातील चार कृषी विद्यापीठाने विविध पिकांच्या आणि फळांच्या वाणाचा शोध लावलेला आहे. नव्याने भर पडलेल्या पिकांचा आणि फळांची माहिती आपण घेणार आहोत.

वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठातील पिकाचे वाण

रब्बी ज्वारी हुरडा – परभणी वसंत (पीव्हीआरएसजी-101) : रब्बी ज्वारीचा हुरडा वाण इतर वाणांपेक्षा हिरवा, उत्पादनात सरस, दाणे मऊ गोड असून, कणसातून सहज वेगळे होतात. खोडमाशी, खोडकिडा प्रतिकारक आहे.

सोयाबीन – एमएयूएस-725 : हा वाण स्थानिक व राष्ट्रीय पातळीवरील तुल्यबळ वाणांपेक्षा उत्पादनात सरस, विविध कीड रोगास मध्यम प्रतिकारक आढळून आला.

करडई – परभणी सुवर्णा (पीबीएनएस-154) : हा वाण पीबीएनएस 12 व शारदा वाणापेक्षा अधिक उत्पादन देणारा. मर रोग, पानावरील ठिपके, मावा किडीस सहनशील आढळून आला. ही नव्याने निर्माण करण्यात आलेली वाण ही केवळ मराठवाडा विभागात लागवड करण्याची शिफारस आहे.

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांचे नवीन वाण

भात – पीडीकेव्ही साधना (एसकेएल 3-1-41-8-33-15) : कमी कालावधीत अधिक उत्पादन देणारा आणि लांब दाण्याचा भात. विदर्भात खरीप हंगामात रोवणी पद्धतीने लावडीसाठी शिफारस.

रब्बी ज्वारी हुरडा – ट्रॉम्बे अकोला सुरूची (टी ए केपीएस-5) : ट्रॉम्बे अकोला सुरूची हा अधिक उत्पादन देणारा, गोड चवीचा, उत्कृष्ट स्वाद, मळणीस सुलभ वाण, विदर्भातील कोरडवाहू क्षेत्रात लागवडीसाठी शिफारस.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

रब्बी ज्वारी – फुले यशोमती : ज्वारीचा हा वाण पश्‍चिम महाराष्ट्रासाठी हलक्या जमिनी आणि कोरडवाहू क्षेत्रासाठी प्रसारित करण्याची शिफारस.

उडीद – फुले वसू (पीयु 0609-43) : अधिक उत्पादन देणाऱ्या या वाणाची पश्‍चिम महाराष्ट्रातील उडीद पिकविणाऱ्या भागात लागडीसाठी शिफारस.

तीळ – फुले पुर्णा (जेएलटी-408-2): उन्हाळी हंगामात अधिक उत्पादन, प्रचलित वाणांपेक्षा सरस, राज्यातील खानदेश, मराठवाडा विभागात लागवडीसाठी शिफारस.

महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी

पेरू – फुले अमृत : चमकदार हिरवट, पिवळसर फळे, लाल रंगाचा, मध्यम बियांची संख्या, मध्यम मऊ बी, अधिक उत्पादन देणारा वाण महाराष्ट्रासाठी शिफारस.

चिंच – फुले श्रावणी : फळांचा आकर्षक तपिकिरी रंग, किंचित वक्र, चवीला मध्यम गोड, गराचे प्रमाण अधिक असलेला वाण महाराष्ट्र राज्यात लागवडीसाठी शिफारस.

द्राक्ष – मांजरी किशमिश : बेदाण्याचा एक सारखा आकार, रंग, अधिक उतारा, चांगली प्रत, आणि अधिक उत्पादन देणारा वैशिष्ट्यपूर्ण वाण महाराष्ट्र राज्यामध्ये लागवडीसाठी शिफारस.

डाळिंब – सोलापूर लाल : कमी दिवसांमध्ये तयार होणार, अधिक उत्पादन देणारे वाण. महाराष्ट्रात शिफारस.

ऊस – फुले – (कोएम -11082): उसाचा लवकर परिपक्व होणारा वाण, महाराष्ट्रात सुरू आणि पूर्वहंगामात लागवडीसाठीची शिफारस.

संबंधित बातम्या :

नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजारपेठेत असं काय घडलं ? ऐन हंगामात हळदीचे व्यवहार बंद पडले

Market Price : नववर्षात सोयाबीनच्या वाढत्या दराने शेतकऱ्यांना दिलासा, विक्री की साठवणूक ! वाचा सविस्तर

निसर्गाचा लहरीपणा त्यात सरकारच्या धोरणांचा फटका, शेतकरीही एक पाऊल पुढेच, वाचा सविस्तर